आवळा ज्यूस पिल्यावर शरीरात पुढच्या मिनिटात काय झाले.! शरीरावर होतात असे जबरदस्त बदल.!

आरोग्य

मित्रांनो शीर्षक वाचून तुमच्या लक्षात आले असेलच, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशा आयुर्वेदिक अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या फळा बद्दलची माहिती. आवळा.. याचे नियमित सेवन याचे फायदे जाणून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य..! आपल्या आरोग्यासाठी तसेच आपल्या सौंदर्यासाठी देखील आवळा अत्यंत फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आवळे बाजारात दिसू लागतात.

आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नियमित रोज एका आवळ्याचे तरी सेवन अवश्य केले पाहिजे. आवळा ज्यूस, कॅंडी, चटणी, लोणचं अथवा पावडर अगदी कोणत्याही स्वरूपात..! अनेक जण घरी आवळ्याचा मुरंबा तसेच सुपारी देखील बनवतात. आवळ्याचे सेवन केल्याने अनेक आजारांचा नाश होतो. निसर्गाचा खजिना आहे आवळा.

आवळा विटामिन सी ने संपन्न असतो यामुळेच आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते. आपण लवकर आजारी पडत नाही तसेच सर्दी खोकला आणि पोट दुखी मध्ये आराम देतो आवळा. आवळ्याचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि जेव्हा आपले पोट साफ असते त्यावेळेस सहाजिकच अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. यामुळे बद्धकोष्टता देखील दूर होते.

हे वाचा:   दात काढण्यापूर्वी एकदा हा रस लावा, मरेपर्यंत एकही दात हलणार सुद्धा नाही.!

आवळ्या मध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ज्या लोकांना रक्ताची कमतरता आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, ऍनिमिया आहे अशांनी नियमित स्वरूपात आवळ्याचे सेवन अवश्य केले पाहिजे. तुम्ही किसणीच्या मदतीने आवळा किसून घेऊ शकता. त्याचा रस काढून, एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचा आवळा चा रस असे सेवन करू शकता. रक्तदाब नसलेल्यांनी यामध्ये चिमुटभर काळे मीठ अथवा सैंधव मीठ घालून याचा सेवन केले तरीही चालेल.

आवळ्याचा पुढील महत्त्वाचा फायदा होतो तो म्हणजे आपल्या डोळ्यांचे दृष्टी! ज्या लोकांना मोठ्या नंबरचा चष्मा आहे त्यांनी तर आवळ्याचे सेवन अवश्य करा. डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी येणे कोणत्याही प्रकारच्या डोळ्या संबंधीच्या तक्रारी असतील तर त्यामध्ये नियमित आवळ्याचे सेवन एक रामबाण उपाय आहे. आपले हृदय निरोगी ठेवून शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी आवळा मदत करतो. आवळा सेवन केल्याने आपले रक्त देखील साफ होते.

आपल्या चेहऱ्यावर चमक येते तसेच गळणाऱ्या केसांचे प्रमाण कमी होऊन ते थांबते. केसांच्या आणि त्वचेच्या सर्व प्रकारच्या विकारांमध्ये आवळा सारखा दुसरा कोणताच चमत्कार नाही. केस मजबूत होऊन चमकू लागतील तसेच अकाली केस पांढरे होणार नाहीत. अनेक लोकांना लघवी मध्ये जळजळते त्यावर देखील खूप फायदेशीर आहे आवळा. यामुळे आपलं डोकं देखील शांत होते. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि anti-inflammatory गुणधर्म असतात.

हे वाचा:   आयुर्वेदातील आजपर्यंतची सर्वात ताकतवान वनस्पती.! ही वनस्पती तुम्हाला मिळाली तर समजून जा अमृतच मिळाले आहे, कारण या वनस्पतीचे आहे इतके धक्कादायक फायदे.!

आवळ्याचे पानं वाटून त्वचेवर लावल्याने देखील त्वचेच्या सर्व प्रकारच्या तक्रारी दूर होतात. मधुमेहावर वरदान आहे आवळा. महिलांच्या मासिक तक्रारी मध्ये तर आवळा सेवन म्हणजे संजीवनीच.. अशा या बहुगुणी एक तरी आवळ्याचे सेवन तुम्ही नियमित करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *