नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदातील पुस्तक अष्टांग हृदयम यातील सांगितलेल्या माहितीनुसार अशा तीन भाज्या बद्दल सांगणार आहोत की ज्याच्या सेवनाने तुमच्या शरीराला अत्यंत पौष्टिक घटक मिळतील. या बाजा अत्यंत पौष्टिक न्यूट्रिशन घटक असलेल्या ताकद देणाऱ्या असतात. जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे, रक्त कमी आहे, नेहमी तुम्हाला थकवा येतो, चेहऱ्यावर ग्लो नसतो, डोळ्याचे दृष्टी कमजोर होत असल्यास.
व्यायामाचा अभाव असेल तसेच खाणेपिणे व्यवस्थित नसेल यामुळे अशक्तपणा येतो. अशा मध्ये तुम्ही आपल्या आहारात या तीन भाज्यांचा प्रयोग अवश्य करून बघावा. किती प्रमाणात कशाप्रकारे या भाज्या सेवन कराव्यात याबद्दल पाहूया सविस्तर माहिती. यामध्ये सर्वप्रथम येते ती भाजी म्हणजे ब्रोकोली. हिरव्या रंगाच्या फ्लावर प्रमाणे दिसणारी ब्रोकोली यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये उच्च दर्जाचे फायबर आणि प्रोटीन असते.
अशा पद्धतीचे प्रोटीन सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील सेल्स लवकर मरत नाहीत. म्हणजेच तुम्ही लवकर एजिंग होत नाही. म्हणजे यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात म्हणायला हरकत नाही. तुम्हाला तरुण ठेवण्यात मदत करते ब्रोकोली. यामध्ये अँटिऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात असतात. आठवड्या मधून दोन वेळेस ब्रोकोलीचे सेवन अवश्य करा. ब्रोकली नेहमीच्या भाजी प्रमाणे जास्त शिजवून सेवन करू नका. कमी शिजवावी.
यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. यामध्ये विटामिन ए, विटामिन ई, बिटा केरोटीन, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. केस गळती च्या समस्या देखील होतील दूर. थकवा येणे कॅल्शियमची कमतरता असल्यास या भाज्यांचे सेवन करणे उत्तम होय. गॅस एसिडिटी ची समस्या असेल तर या भाजीचा प्रयोग कमी प्रमाणात करावा. यानंतर नंबर येतो तो दुधी भोपळ्याच्या भाजीचा.
अनेकजणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही परंतु याचे फायदे जाणून तुम्ही देखील आजच ही भाजी खायला सुरुवात कराल. आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी मधुमेह अथवा रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असतात. तर काही जणांना हृदय, मेंदू, पॅरलेस एस असून या अशा प्रकारच्या समस्या असतात. अशामध्ये दुधी भोपळ्याच्या भाजीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे.
यामुळे शरीरातील रक्त पातळ व साफ होते. कमी वयापासूनच दुधी भोपळ्याची भाजी सेवन करण्याची सवय ठेवा. यामुळे रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. दुधी भोपळ्याची भाजी म्हणजे उत्तम ब्लड प्युरिफायर होय. ताजा दुधी भोपळा धुवून बारीक कापून यासोबत पुदिन्याची काही पाने घालून, आलं, काळी मिरी, लिंबू मिक्सर मधून स्मुदी बनवा. एक ग्लास पिल्याने सर्व समस्या होतील दूर. हृदय राहिल एकदम तंदुरुस्त.
तिसरी भाजी म्हणजे मटार. मटार मध्ये देखील अनेक उत्तम प्रकारचे गुणधर्म असतात ज्यामध्ये हाय प्रोटीन पहिल्या नंबर वर येते. कॅल्शियम फायबर यांसारखे गुण देखील मटार मध्ये असतात. आपण मटार भाजी मधून भातामधून अनेक प्रकारे आवडीने खातो. मटारच्या उसळी तसेच अनेक वेगळे पदार्थ देखील बनवले जातात. मटारची भाजी जर तुम्ही खात असाल तर तुमच्या शरीराला कॅल्शियमची कमतरता कधीच जाणवणार नाही.
परंतु दररोज मटार खाऊ नका. लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नेहमी नुकसानच देते. तेव्हा योग्य प्रमाणाचे भान असू द्या. वेगवेगळ्या भाज्या अदलून बदलून सेवन कराव्यात. नेहमी भाज्या तेल तसेच चपाती बनवण्यासाठी लागणारे धान्य देखील बदलले पाहिजे. फळे देखील बदलून बदलून खाल्ली पाहिजेत. मटार ही सिझनल भाजी आहे. या सगळ्या सोबत योग व प्राणायाम करा तुमचे शरीर राहील एकदम तंदुरुस्त.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.