दुधात टाका हा एक पदार्थ.! गुडघे दुखी, कंबर दुखी, रक्ताची कमतरता तसेच डोळ्याचा चष्मा देखील होईल दूर आणि शरीर बनेल आणखी मजबूत.!

आरोग्य

मित्रांनो आज-काल आपल्यापैकी अनेक जणांना कंबर दुखी गुडघे दुखी तसेच अशक्तपणा जाणवणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही जणांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आढळते तर काही जणांना डोळ्यांच्या दृष्टीचा त्रास असतो. अशा प्रकारचे आजार आधी वय झालेल्या लोकांना व्हायचे परंतु आजकाल अगदी तरुण वयात देखील अशी समस्या भेडसावत असताना आपल्याला दिसत आहे.

यासाठी आज आम्ही तुमच्या तब्येतीची काळजी करत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास उपाय. आपल्यापैकी अनेक जणांना प्लेन दूध पिणे आवडत नाही. काहीजण बोर्नविटा होरलिक्स कॉफी पावडर असे फ्लेवर मिक्स करून दूध घेतात. अनेक जणांना चहा कॉफी पिण्याची सवय असते. पण तुम्हाला हे माहित आहे का असं केल्यामुळे दुधातील पौष्टिक घटक आपल्याला मिळत नाहीत. आणि दूध पिण्याचा मूळ उद्दिष्ट सफल होत नाही.

त्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत दूध बनवायची खास पद्धत. अशाप्रकारे दूध बनवून पिल्याने तुमच्या शरीराला होतील कमालीचे प्रचंड फायदे ज्याची तुम्ही कल्पनादेखील केली नसेल. असे स्पेशल दूध बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे मखाने. हे कोणत्याही ड्रायफ्रूट च्या दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होतील. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक असते.

हे वाचा:   सध्याच्या सं'क्र'मण काळात नेमकी कोणते पाणी प्यावे, जेणेकरून भयंकर आजारापासून तुम्ही राहाल दूर...!

भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांचे दुखणे देखील होते दूर. यासोबत यामध्ये आपल्याला लागणार आहे खसखस. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील होत नाही. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते खसखस. तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे सफेद तीळ. कोणत्याही प्रकारच्या दुखण्या मध्ये तीळ म्हणजे आपल्या शरीरासाठी वरदानच आहेत.

या तीनही वस्तू अगदी सहज उपलब्ध होतात. गोडी साठी गुळ वापरा. मखाने गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या. यामध्ये तीन चमचे तीळ देखील भाजून घ्यावेत. मधुमेह, रक्तदाब यामध्ये देखील वरदान आहेत मखाने. गार झाल्यानंतर भाजून घेतलेले मखाने व खसखस मिक्सर मध्ये घालून त्याची पावडर बनवा. ही पावडर तुम्ही जास्त बनवून देखील साठवू शकता. दूध याठिकाणी गायीचे वापरण्याचा आणि सल्ला देऊ.

वजन वाढवायचे आहे त्या लोकांनी म्हशीचे दूध वापरावे. दुधाची साय मात्र बाजूला करावी. अर्धा चमचा तुपामध्ये एक मोठा चमचा खसखस भाजून घ्या. खसखशीच्या सेवनाने झोपदेखील शांत लागते. यामध्ये एक ग्लास दूध घालून उकळायला ठेवा. दूध उकळत आल्यावर यामध्ये दोन चमचे मखाना व तिळाची पावडर घाला. दूध व्यवस्थित उकळून पिण्याजोगे कोमट करा.

हे वाचा:   जर महिनाभर चेहऱ्यावर लावला अद्रकाचा तुकडा तर काय होईल?

त्यामध्ये चवीनुसार गूळ घालावा. गरम दुधामध्ये गूळ घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते. चमच्याने हे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि शक्यतो रात्री झोपताना असे दूध सलग सात दिवस पिऊन बघा. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढून थकवा होईल दूर… होतील आश्चर्यजनक फायदे! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *