मित्रांनो आपल्या सर्व आरोग्याचे मूळ हे आपल्या पोटात असते आपण जे खातो पितो आपल्या दैनंदिन सवयी हालचाली जीवनशैली यामुळे आपल्या जीवनावर आणि पर्यायाने आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो. आज-काल पोट साफ न होणे ही समस्या तर कॉमन झाली आहे. परंतु याचे रुपांतर मुळव्याध अल्सर बद्धकोष्टता यामध्ये होऊन भविष्यात अनेक भयानक रोगांना निमंत्रण मिळते. तेव्हा अशा प्रकारच्या समस्यांचा वेळीच नायनाट केला पाहिजे.
काहीही अन्न खाताना अन्न नलिकेमध्ये जळजळ होणे वेदना होणे हे लक्षण आहे अल्सर असण्याचे. आतड्यांमध्ये, अन्न मालिकेमध्ये घाव तयार झाल्यास काहीही खाताना पिताना खूप त्रास होतो तीव्र वेदना होतात. शरीरातील ॲसिड वाढल्यामुळे हा आजार उद्भवतो. याच मूळ आहे चमचमीत गरम मसालेदार पदार्थ खाणे. अति प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान, मानसिक ताण तणाव हे देखील अल्सर ला कारणीभूत असते.
तेव्हा आजच आपला आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, डाळी प्रथिनयुक्त, सॅलेड तसेच त्या त्या दिवसात उपलब्ध असणारी फळे यांचा समावेश करावा. अशाच चुकीचा आहार विहाराच्या सवयीमुळे मूळव्याधीची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. रात्रीचे अकारण जागरण पडू शकते महागात. वेळीच लक्ष न दिल्याने पुढे जाऊन गंभीर समस्या उद्भवू शकते. गुलकंद व डाळिंबाच्या सेवनाने हा त्रास कमी होण्यास मदत होते.
जिभेचे चोचले पुरवण्याचे च्या नादात आपण पोटाच्या पर्यायाने पूर्ण शरीराच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. यामध्ये आहारात जास्त प्रमाणात फायबर युक्त अन्नपदार्थ असावेत. नियमितपणे आपले पोट साफ राहणे हे अत्यंत महत्वाचे आहे. हे बद्धकोष्ठता झाल्याशिवाय लक्षात येत नाही. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा. आहारामध्ये तेलकट मसाल्याचे पदार्थ टाळा. सतत एकाच जागी बसून राहू नका.
संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित पोट साफ न झाल्यामुळे मेटाबोलिजम रेट वर परिणाम होऊन अकारण वजन वाढते. पोट दुखी होत असल्यास पेनकिलर गोळ्या खाऊ नका. यामुळे केस व त्वचा तसेच आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. तेव्हा वेळीच लगाम घाला अशा प्रकारच्या भयानक रोगांना ज्यामुळे तुमचे शरीर होऊ शकते कमजोर.
यासाठी आम्ही काही उपाय आणि टिप्स सुचवत आहोत ते पुढील प्रमाणे: रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा मध टाकून प्यावे. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढून पोट निरोगी राहते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस व सैंधव मीठ घालून प्यावे. पोटाच्या तक्रारी दूर राहतात. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घालून प्या. त्यामुळे कोठा साफ राहतो.
भिजवलेले अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. सर्व फळांमध्ये पपई खाणे हे पोट साफ करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कितीही व्यस्त जीवनशैली असले तरी देखील दिवसातून पंचेचाळीस मिनिटे व्यायाम करावा. सायकलिंग, पोहणे अथवा चालणे. रिकाम्या पोटी कोऱ्या कॉफीमध्ये एरंडेल तेल घालून पिल्याने देखील पोट व्यवस्थित साफ होते. आहारात नियमित सुरणाची भाजी खाल्ल्यास मुळव्याध कमी होते.
जेवल्यानंतर विड्याचे पान किंवा बडीशेप खाणे यामुळे अन्न चांगल्यारितीने पचते. मित्रांनो सांगितलेली माहिती व टिप्स तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे ..!
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.