मित्रांनो तसं तर वरवर बघायला गेलो गेलो तर सर्दी-पडसे नाक गळणे या अगदी सामान्य तक्रारी आहेत आणि सर्व वयाच्या सर्व प्रकारच्या कोणाही व्यक्तीला सर्दी होऊ शकते. हवामानातील बदलामुळे अनेकांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो. काही विशिष्ट प्रकारच्या जंतूंमुळे श्वासावाटे एकाकडून दुसऱ्याकडे हे सहज पसरले जातात. अशा प्रकारचे रोग उत्पन्न होण्याचे कारण म्हणजे आपल्या शरीरात असणारे कमी रोगप्रतिकारक्षमता..!
सर्दी पडसं मध्ये आपल्या नाकाचा बाहेरील त्वचेचा दाह होतो सूज येते नाकातून पाणी वाहते. नाक चोंदले गेल्यामुळे नीट श्वासोच्छ्वास करता येत नाही. काहीजणांना नाकाप्रमाणे तसेच कानात देखील त्रास होतो. वावड्या प्रकारच्या सर्दी मध्ये खूप शिंका येतात डोळ्यातून देखील सारखे पाणी येते. नाक डोळे यांना खाज येते. काही लोकांना डोकेदुखीचा त्रास देखील जाणवतो.
व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे याचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा दिसून येतो. बाजारात यावर अनेक प्रकारच्या गोळ्या औषधे उपलब्ध आहेत. परंतु शरीराला दीर्घकाळासाठी अशा गोळ्या हानिकारक असतात. यासाठी सुरुवातीला आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय करायचा प्रयत्न करा. धूळ धूर यामुळे देखील काही जणांना सर्दीचा त्रास होतो त्यांनी हे टाळण्याचा प्रयत्न करा. अनेक लोकांना रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवय असते यामुळे देखील सर्दी-पडसे होते.
याबाबत फार कमी लोकांना माहिती असते. दिवसातून तीन ते चार वेळेस एक चमचा मधाचे सेवन करावे. तहान लागेल तेव्हा कोमट पाणी प्यावे. कफ पडत असेल तर अशा वेळी दूध पिऊ नये. घसा देखील दुखत असल्यास तोंडात लवंग धरुन चघळावी. मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा व विक्स ने वाफ घ्या हे अत्यंत लाभदायक ठरते. यामुळे बंद नाक, डोके दुखी कमी होण्यास मदत होते. रुमालावर निलगिरीचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण लावून सतत अधून-मधून वास घेत रहा.
आलं,सुंठ गवतीचहा, लवंग, तुळस, वेलची यांचा चहा मध्ये उकळून वापर करावा. याने देखील बऱ्याच अंशी फरक पडतो. सुंठ पावडर, काळी मिरी, विलायची, धागेवाली खढीसाखर घ्या. या चारही वस्तू प्रत्येकी दहा ग्रॅम घ्याव्यात. या चारही वस्तूंचे मिक्सर मध्ये घालून पावडर बनवून घ्या. यामध्ये विलायची सालासकटच बारीक करावी. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस तुळशीचे वाळलेली पाने देखील लागणार आहेत. ही पान देखील मिक्सरवर बारीक करा. मनुका पन्नास ग्रॅम घ्या.
हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत व रात्री झोपताना असे एक चमचा दिवसातून दोन वेळेस असच सेवन करावे. खूप प्रमाणात नाक गळत असल्यास दररोज मोहरीचे तेल किंवा शुद्ध गाईचे साजूक तूप नाकपुड्या मध्ये दोन थेंब घालावे. वर दिलेल्या उपायांचा आणि टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
हे उपाय तुम्ही गरजू लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवाल, अशी आम्हाला खात्री आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.