सांधे दुखत असेल तर हा एकच उपाय पुरेसा आहे.! फक्त दोन मिनिटात सर्व दुखणे होईल गायब.! जालीम उपाय.!

आरोग्य

मित्रांनो आज-काल साधारण वयाची चाळिशी उलटली की मग हळूहळू सुरू होतात सांधे दुखी मणक्याचे आजार स्नायू दुखावणे इत्यादी.. याचे प्रमुख कारण म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि शरीरामध्ये इतर पोषक तत्वांची कमतरता असणे. गुडघेदुखी, खांदे झिजणे, सायटिका असे नाना आजार जडतात आणि आपल्याला जीवन नको नको करून सोडतात.

मग वेगवेगळे औषध व डॉक्टर यांच्याकडे परिक्रमा चालू होते. हे आपण वेळीच काळजी घेतली तर टाळू शकतो. सांध्यामध्ये वंगण कमी झाल्याने, दोन मणके एकमेकावर घासल्याने सांधे दुखी मनका दुखी असे आजार होतात. यामुळे पुढे जाऊन हाता पायाला मुंग्या येणे,पायाच्या बाजूने कमरेपर्यंत शिरा दुखणे, मांडी घालता न येणे, उठताना बसताना, पायऱ्या चढताना हाडांचा आवाज येणे असे अनेक दैनंदिन छोट्यामोठ्या कार्यांमध्ये अडथळा येतो.

वेदना तीव्रतेने होते. अशामध्ये काळजी कशी घ्यावी काय उपाय करावेत हे आपण बघू या. यासाठी आपल्याला आहार बदलण्याची गरज आहे. एक चमचा जवस, एक चमचा तीळ आणि एक चमचा आवळा पावडर असे एकत्र करून त्याची पावडर बनवा. सकाळी रिकाम्यापोटी ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. कच्ची मेथी दाण्याची पावडर, अश्वगंधा पावडर हे एक ग्लास कोमट दुधामध्ये घालून यामध्ये साजूक तूप घालून असे दूध सेवन केल्याने स्नायूंना बळ मिळते.

हे वाचा:   लाखो रुपयांच्या औषधाला जे नाही जमले ते ह्या एका वनस्पती ने करून दाखवले.!

रोज रिकाम्यापोटी सकाळी एक चमचा रात्री भिजत घातलेले आळीव, एक चमचा साजूक तूप, दोन चमचे गुळ व काही ड्रायफूट तसेच थोडीशी विलायची पावडर घालून खीर बनवा. यामुळेदेखील सांधेदुखी बरी होण्यास मदत होते. दररोजच्या जेवणामध्ये गव्हा एवढा चुना वरण भात कालवून घ्या यामुळे तुम्हाला कॅल्शिअमची कमतरता भासणार नाही. दिवसातून दोन वेळेस बाभळीच्या शेंगांचे चूर्ण मधात मिसळून चाटण करावे.

रात्री कोमट पाण्यामध्ये त्रिफळाचूर्ण घेतल्याने सकाळी कोठा साफ होतो यामुळे वाद विकार होत नाही. व सांधेदुखी देखील कमी होते. दररोजच्या जेवणामध्ये एक चमचा साजूक तूप अवश्य असाव. जवस, तीळ, लसूण, खोबरे यांची सुकी चटणी असावी. जेवणामध्ये उडदाच्या डाळीचे प्रमाण वाढवा. हिंग खाल्याने देखील सांधेदुखी कमी होते.

तीळ तेल कोमट करून त्यामध्ये लसूण शिजवून सिद्ध केलेले तेल घरी बनवा आणि याने नियमितपणे सांध्यांची मालिश करा. निरगुडीचा पाला तेलात काळा होईपर्यंत शिजवून या तेलाने मसाज करा. त्यानंतर तव्यावर रुईचे पान गरम करून तेल लावलेल्या जागेवर फडक्याने बांधा. यामुळे सांधेदुखी त्वरित थांबते. दररोज 40 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा. आंबट फळे खाणे टाळा.

हे वाचा:   मरे'पर्यंत कंबरदुखी होणार नाही, गुडघेदुखी साठी याहून सोपा उपाय नाही, लाखो रुपये वाचवू शकतो हा उपाय.!

गार थंड पदार्थ देखील सेवन करू नका. नेहमीच्या भाज्यांमध्ये दुधी भोपळा कारले पडवळ घोसाळी भेंडी विशेषतः शेवगा अवश्य वापरा. अशा प्रकारे काळजी घेतल्याने व सोबत हलका योग प्राणायाम सूर्यनमस्कार केल्याने तुमची कितीही जुनी सांधेदुखी असल्यास ती होईल त्वरित बरी..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *