नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आम्ही तुम्हाला नेहमीच वेगवेगळा वनस्पती बद्दल माहिती देत असतो. हीच माहिती शृंखला पुढे नेत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशीच एक अनोखी वनस्पती जिचे नाव आहे दुधी अथवा नायटी.. या वनस्पतीचे संस्कृत नाव नागार्जुन असेही आहे. या वनस्पतीमध्ये लहान दुधी आणि मोठी दुधी असे दोन प्रकार पडतात.
हे प्रकार प्रामुख्याने त्यांच्या पानांच्या आकारावरून पडले असावेत. अन्यथा अगदी औषधी गुणधर्माच्या बाबतीत दोन्ही वनस्पती सर्वसामान्यपणे सारख्याच आहेत. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने पोटात संबंधित सर्व विकारांवर केला जातो. खूप मोठ्या प्रमाणात खोकला येत असेल तरीदेखील ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे. पोटात मुरडा होऊन आव पडत असेल तर याचा ताजा पाला अत्यंत गुणकारी आहे.
ही वनस्पती अगदी रस्त्याच्या कडेला कुठेही सहज आढळून येते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिले देखील असेल परंतु या वनस्पती चे गुणधर्म आपल्याला माहित नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी प्रामुख्याने भारतात आढळते. काहीशी गोड, तिखट, पचायला जड अशी ही वनस्पती असते जी पोटात घेतल्याने कृमी जंत सर्व प्रकाराचा नाश करते.
तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर अत्यंत उपयुक्त आहे. अगदी पोटात गेलेले विष देखील बाहेर काढण्याचे क्षमता या वनस्पतीमध्ये आहे. शु’क्र’जंतू वाढवणारी, ताकद वर्धक, धातू पुष्टी वर्धक अशी ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे. इतकेच काय तर केसांच्या प्रत्येक तक्रारींमध्ये ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे त्याच सोबत आपल्या त्वचेसाठी देखील.
या वनस्पतीच्या पानांचा रसामध्ये थोडेसे कच्चे दूध घालून कल्प बनवा. तो केसांच्या मुळांशी नियमित चोळा. यामुळे केस गळती त्वरित थांबते. या वनस्पतीच्या मुळ्या चावून खाल्ल्यास तुम्हाला दातांचा कुठलाही रोग होत नाही तसेच हिरड्या देखील राहतात मजबूत. बऱ्याच लहान मुलांना लहानपणापासूनच अडखळत तोतरे बोलण्याची सवय असते अशा विकारांमध्ये ही वनस्पती वरदानच आहे.
या वनस्पतीची पानं सावलीत वाळवून त्याचे चूर्ण बनवावे. हे चूर्ण मधासह सोबत दोन ते तीन ग्रॅम इतके घेऊन चाटण करावे. हळू हळू तो तरी बोलणारी व्यक्ती देखील स्पष्ट बोलू लागेल. या वनस्पतीच्या पानांचा काढा नियमितपणे घेतल्यास अनेक जणांना असणारा दमा, श्वास कोंडणे, धाप लागणे, हृदयरोग यांसारख्या विकारात काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. बऱ्याच जणांना सतत लघवी होण्याचा त्रास असतो यासाठी दुधीचे चूर्ण एक ग्राम, त्यामध्ये पाच ग्रॅम गूळ व पाच ग्रॅम जिरे एकत्र करून सेवन केल्याने अशी समस्या दूर होते.
शिवाय मा’सि’क तक्रारींमध्ये देखील हा उपाय महिलांनी अवश्य करावा. दुधीचे एक ते दोन ग्रॅम चूर्ण व खडीसाखर सोबत सेवन केल्याने शरीरातील शक्ती वाढते. लक्षात घ्या दुधी वनस्पती म्हणजे दुधी भोपळा नव्हे. आशा आहे मित्रांनो आम्ही दिलेली अनोखी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. ही माहिती गरजू आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत अवश्य शेअर करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.