नमस्कार मित्रांनो, मुळव्याध अल्सर यावर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत फायदेशीर असा घरगुती रामबाण उपाय. सामान्यतः मुळव्याध दोन प्रकारची असते. एका मध्ये रक्त पडते एका मध्ये रक्त पडत नाही परंतु दोन्हीमध्ये प्रचंड प्रमाणात त्रास होतो. अवघड जागेचे दुखणे असल्यामुळे बहुतांश डॉक्टरांकडे जायला देखील शरमतात.
मुळव्याधी सोबतच्या लोकांना अल्सरचा त्रास आहे किंवा काविळ झाली आहे त्या लोकांना देखील या उपायात अत्यंत फायदेशीर ठरेल. या उपायासाठी सर्वप्रथम लागणारे घटक आहे तो म्हणजे तुरटी. होय तुरटी, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु याचे अनेक फायदे आहेत. फार पूर्वी पासून आपण पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यामध्ये तुरटीचा खडा फिरवतो.
या उपायामध्ये तुम्हाला कच्ची तुरटी वापरायची नाही तर गरम लोखंडाच्या तव्यावर छोटा तुरटी चा तुकडा तुम्हाला पाच ते सात मिनिटं शिजवायचा आहे. त्यानंतर ज्याला हा व्यवस्थित थंड होऊन द्या व त्याची पावडर बनवून घ्या. गरम पाण्यामध्ये तुरटीची पावडर घालून गुळण्या केल्याने तोंड येण्याची समस्या देखील जाते. किंवा बाजारामध्ये शिजवलेली तुरटीची पावडर तुरटी भस्म या नावाने मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता.
तुम्ही घरी जास्त प्रमाणात देखील बनवून ठेवू शकता. या उपायासाठी दुसरा लागणारा घटक म्हणजे एक केळ. एक पिकलेले केळ घ्या. त्याचे साल पूर्ण काढा. सुरी च्या मदतीने उभ्याने केळ्यामध्ये चिर पाडा. दुसरीकडे दोन चिमूट शिजवून बारीक केलेल्या तुरटीची पावडर घ्या. त्यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे मध. मध आपल्या शरीराला मूळव्याधीमध्ये आलेल्या कोंबावर अत्यंत फायदेशीर असतो.
जळजळ होणे, सूज येणे यामध्ये मध अत्यंत फायदेशीर आहे. एक चमचा मध आणि दोन चिमूट बारीक केलेली तुरटीची पावडर एकत्र करून घ्या. हा उपाय केल्याने मूळव्याधीमध्ये पडणारे रक्त देखील बंद होईल. हे मिश्रण चमचा च्या मदतीने कापलेल्या केळा मध्ये घाला. असे हे केळ तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खावे. दीर्घ जुनी समस्या असल्यास दिवसातून दोन वेळेस हा उपाय करा.
अन्यथा एक वेळेस पुरेसा आहे. हा उपाय केल्यानंतर सुमारे एक तास काही खाऊ अथवा पिऊ नका. सलग तीन दिवस हा उपाय नक्की करून बघा. असे जमत नसल्यास एक पिकलेले केळ खाल्ल्यानंतर त्वरित मध व तुरटी पावडर सांगितलेल्या प्रमाणात एकत्र करून त्याचे चाटण करा. मुळव्याध, अल्सर यासारखा पोटाच्या रोगांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी कडे आणि अन्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या.
लक्षात घ्या अति दीर्घकाळ पाईल्स सारखे समस्या राहिल्याने पुढे जाऊन कर्करोगाचा देखील धोका असतो. तेव्हा याची वेळीच काळजी घ्या दुर्लक्ष करू नका. यासोबत बाहेरचे सतत फास्ट फूड जंक फूड तसेच घरातील देखील तेलकट मसालेदार चमचमीत खाऊ नका. खूप रात्री जेवण करू नका यामुळे अपचनाची समस्या वाढते. मल त्यागण्यामध्ये त्रास होतो. यासाठी आहार सात्विक असावा.
पुरेशा प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स व अशी पोषकतत्वे शरीराला मिळतील याची काळजी घ्या. अन्नपदार्थात फायबरयुक्त अन्नाचे सेवन वाढवावं. हिरव्या पालेभाज्या सॅलेड आणि फळे भरपूर प्रमाणात खा. अनेक लोक असे सर्वकाही करतात परंतु योग्य मुबलक प्रमाणात पाणीच पीत नाहीत. तेव्हा प्रमाणात पाणी प्या. वर दिलेल्या उपाय यासोबतच तुम्ही अशा प्रकारे तुमचे काळजी घेतल्यास तुम्हाला पाईल्स ची समस्या मुळापासून नष्ट होईल याशिवाय तुमचे पोट देखील नियमित साफ होण्याकडे अवश्य लक्ष द्या.
ते म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.. त्यामुळे स्वस्थ खा आणि तुमचा आरोग्याची काळजी घ्या.. उपाय आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..!
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.