कुंडीत असे लावा टोमॅटो चे झाड.! झाडाला १००% टोमॅटो लागणार.! घरच्या कुंडीत असा करा जुगाड.!

आरोग्य

हल्ली अनेकजण घरातच वेगवेगळी झाडे लावतात. आणि रासायनिक खते वापरलेल्या फळ आणि भाज्यांपासून लांब राहतात. यालाच हल्ली किचन गार्डन असेही म्हणतात. किचन गार्डनचे अनेक फायदे आहेत. यामुळे आपला बागकामाचा छंदही पूर्ण होतो याशिवाय घरीच ताज्या भाज्या, फळंही मिळवता येतात. जर तुमच्याकडे पुरेशी जागा नसेल, तर तुम्ही कुंडीतही काही गोष्टी चांगल्या प्रकारे काही रोपं वाढवू शकता.

यापैकी एक टोमॅटो आहे. टोमॅटोचा वापर सॅलडमध्ये, डाळ, भाज्या अशा बहुतेक पदार्थांमध्ये केला जातो. अनेकांना प्रत्येक भाजीत टोमॅटो घालण्याची सवय असते. टोमॅटो जसे दिसायला छान, टपोरे दिसतात तसेच त्यांचा सौंदर्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. टॅनिंग निघण्यास मदत टोमॅटो त्वचेवर सनस्क्रीन म्हणून कार्य करते. हे सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

दररोज चेहर्‍यावर लावल्यानंतर काळपटपणा निघून जातो. टोमॅटो एक लिंबूवर्गीय फळ आहे. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. अँटीऑक्सिंडंटचे भरपूर प्रमाण असलेल्या टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी आणि ए असते. टोमॅटो चे झाड घरी लावण्यासाठी आपल्याला प्रथम एक टोमॅटो घ्यावा लागेल आणि त्याचा देठाकडचा भाग कापून काढून टाकून दयावा.

हे वाचा:   एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधांचे सेवन केल्यास काय होत असते? अनेकांना हे माहिती नाही.!

आता टोमॅटोचे गोल आकाराचे तुकडे करावे. यात तुम्हाला अख्या बिया आढळतील. आता एका कुंडीत छिद्र करून घ्यावीत किंवा तुमच्याकडे कोणतेही जुने प्लास्टिकचे भांडे असेल तर त्याला खालच्या बाजूने छिद्र करावीत. या बिया आपल्याला रुजत घालाव्या लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला बागेतील माती, थोडी वाळू आणि गांडूळ खत लागणार आहे. हे तिन्ही शक्यतो समप्रमाणात असावेत. आता याचे मिश्रण करून कुंडीत भरून ठेवावे.

कुंडी मातीने अर्धी भरल्यानंतर त्यात हे टोमॅटोचे काप ठेवावेत आणि त्याच्यावर पुन्हा हि मिश्रित माती टाकावी. आणि वरून पाणी टाकावे. माती भिजेल एवढेच पाणी टाकावे. ज्या कुंडीला तुम्ही छिद्र केले आहे त्या छिद्रांवर आतील बाजूने छोटे दगड ठेवावेत जेणेकरून त्या छिद्रांमधून माती पाण्यासोबत वाहून जाणार नाही. ही कुंडी थोडे दिवस घरातच ठेवावी याला जास्त उन्हात ठेऊ नये.

हे वाचा:   तोंडात टाकताच दात दुखी संपणार, पुन्हा दाढ कधीच दुखणार नाही, दाताची कुठलीही समस्या असल्यास ही वनस्पती वपरा.!

20 ते 25 दिवसात तुम्हाला 1 ते 2 इंच इतकी रोपं आलेली दिसतील. आता ही छोटी छोटी रोप त्या कुंडीतून काढून तुम्हाला मोकळ्या जागेत किंवा दुसऱ्या कुंडीत थोडी अंतर ठेवून लावावी लागतील. एका कुंडीत जास्त झाडे असल्यास रोपाच्या वाढीवर परिणाम होतो आणि टोमॅटोही कमी निघतात. हिवाळ्यात दिवसातून फक्त एकदाच झाडाला पाणी द्यावे. पण उन्हाळ्यात दोन्ही वेळी पाणी द्यावे.

त्याच वेळी, लक्षात ठेवा की झाडाची वेळोवेळी छाटणी करत रहा. कोरडी पाने आणि फांद्या कापून पुन्हा भांड्यात ठेवा. त्यामुळे जमिनीचे पोषणमूल्य वाढते. असं केल्यानं  झाडावर जास्त टोमॅटो येण्यास मदत होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *