आज आपण अश्या एका घरगुती उपायाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन कायमच्या नाहीशा होतील. अनेकदा वय झाल्यावर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येतात. आज कालच्या बदलत्या वातावरणामुळे खाण्यामध्ये झालेल्या बदलामुळे आपल्या चेहऱ्यावर वय होण्याच्या आधीच सुरकुत्या दिसू लागतात. कोणत्याही प्रकारच्या सुरकुत्या किंवा फाईन लाईन या घरगुती उपायांमुळे कायमच्या नष्ट होतील.
आपला चेहरा वयाच्या आधीच सुकून जातो तसेच आपण तरुण दिसण्याऐवजी म्हातारी दिसू लागतो. जर तुम्हाला सुद्धा या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर अजिबात चिंता करू नका. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे त्याबद्दल.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला दोन ते तीन चमचे तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्यानंतर एका पात्रांमध्ये दोन ते तीन चमचे धुतलेले तांदूळ टाकून एक ग्लास पाण्यामध्ये किंवा त्यापेक्षा देखील जास्त पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहे. हे तांदूळ उकळण्यापूर्वी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे.
या तांदळाची पेस्ट शिजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचे आहे. एक गाळणी घेऊन या मिश्रणामध्ये एक बारीक क्रीम सारखी पेस्ट करून घ्यायची आहे. ही पेस्ट गाळणीमध्ये बारीक करून झाल्यावर तुम्हाला क्रीम सारखी पेस्ट तयार झालेली दिसून येईल. आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये दोन चमचे कॉफी पावडर घ्यायची आहे. त्यामध्ये चार चमचे दूध टाकायचे आहे. या दोन्ही गोष्टी मिक्स करून घ्यायचे आहे.
या मिश्रणामध्ये कॉर्न फ्लार म्हणजेच मक्याचे पीठ टाकून हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करायचे आहे. त्यानंतर एक पातेले गॅस वरती ठेऊन हे तयार केलेले मिश्रण मंद आचेवर दहा मिनिटे गरम करून घ्यायचे आहे. हे मिश्रण तयार झाल्यावर थंड करून झाल्यावर त्यामध्ये यापूर्वी केलेले तांदळाचे मिश्रण टाकून एकत्र करून हे देखील मिक्स करून घ्यायचे. आता ही तयार झालेली क्रीम आपण कोणत्याही पात्रामध्ये किंवा कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
या क्रीम चा वापर तुम्हाला सात दिवसांपेक्षा जास्त करायचा नाही आहे. आता आपण जाणून घेणार आहोत या उपायाचा वापर कसा करायचा आहे. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स आल्यामुळे चेहऱ्यावरी एचींग देखील जाणवते. त्यासाठी ही बनवलेली क्रीम अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरल्या गेलेल्या तांदळाचा वापर चेहऱ्याला मुलायम ठेवण्यास मदत करतो. कॉफी आपल्या चेहऱ्याला उजळ करायला मदत करते.
कॉफीमुळे चेहऱ्यावर एक चमक येते. दुधामध्ये असलेल्या विटामिन्स मुळे चेहरा ताजा व टवटवीत राहायला मदत होतो. आजच्या उपायामध्ये वापरल्या गेलेल्या गोष्टी घरगुती असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचे काहीच साईड इफेक्ट जाणवत नाहीत. चेहऱ्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. या क्रीमचा वापर सतत सात दिवस केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या व फाईन लाईन्स कायमच्या नाहीशा होतील.
या क्रीमचा वापर झोपण्यापूर्वी करायचा आहे. ही क्रीम चेहऱ्यावर लावून मसाज करायचा आहे. त्यामुळे या क्रीम मधील सर्व गुणधर्म आपल्या चेहरांमध्ये त्वचेत जाऊन काम करतील. ही क्रीम लावून तुम्ही रात्रभर तसेच ठेवू शकता. आणि सकाळी उठल्यावर थंड पाणी आणि साबणाने चेहरा स्वच्छ धुऊन घेऊ शकता. तुम्ही या क्रीम चा वापर फेस पॅक देखील करू शकता.
तीस मिनिटे चेहर्यावर ठेऊन नंतर तुम्ही हा फेसपॅक धुवून टाकू शकता. हा उपाय सलग सात दिवस केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्या मध्ये फरक झालेला दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.