काहीही खा झटपट पचन होत जाईल.! अपचन चा त्रास असणारे एकदा नक्की करून बघा हे उपाय.!

आरोग्य

आपली पचनक्रिया तेव्हाच बिघडते जेव्हा आपले खाणे वेळेवर नसते किंवा आपल्या खाण्यामध्ये आपण योग्य पद्धत वापरत नाही . आपण तेलकट-तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खातो. आपल्यापैकी अनेकजण चमचमीत बाहेरचे खाणे जास्त प्रमाणावर खाल्ल्यास आपल्या पोटाचे आजार वाढतात. अपचन, गॅस असे आजार वाढू लागतात. आपण दिवसभर अयोग्य गोष्टींचे सेवन करत असतो.

जसे की दररोज सकाळी उठल्यावर साखरेने बनलेले पदार्थ खाणे किंवा पिणे. जसे की बिस्किट, कॉफी, दूध, चहा यासारखे अनेक पदार्थ. जे आपल्या शरीरामध्ये गेल्यावरती गॅस तयार करतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या लिव्हर आणि किडनी यांवर होतो. त्यामुळे आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात नैसर्गिक गोष्टी खाऊन केली पाहिजे.

जसे की फळे किंवा कच्चे दूध अशा गोष्टींचे सेवन केल्यास आपली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यानंतर दुसरी चूक जी आपण काही प्रमाणामध्ये करतो ती म्हणजे खाल्ल्यानंतर लगेच अंघोळ करणे. जेव्हा आपण जेवतो किंवा काही खातो त्यावेळेस र’क्ता’चा प्रवाह पोटाच्या दिशेने जास्त प्रमाणात होत असतो. आणि आपण थेट अंघोळ केल्यानंतर आपले शरीर थंड पडते.

आणि ते नॉर्मल टेंपरेचर वर आणण्यासाठी र’क्ताचा प्रवाह इतर शरीराच्या भागांमध्ये जास्त प्रमाणात होऊ लागतो. आणि त्याच मुळे आपली पचनक्रिया हळू हळू व्हायला लागते. त्यानंतर आपली अजून एक चूक म्हणजे आपण कोणतेही पदार्थ खाताना घाईने खात असतो. कोणतेच पदार्थ किंवा जेवताना देखील आपल्याला हळूहळूच तो पदार्थ खाणे अत्यंत गरजेचे असते नाहीतर आपण लवकरात लवकर खाण्याच्या घाई मध्ये कितीतरी प्रमाणात खातो.

हे वाचा:   या तीन वाईट सवयीमुळे मेंदू होत असतो आणखी कमजोर; आजच्या आज सोडून द्या ह्या तीन वाईट सवयी.!

त्यानंतर थोड्या वेळाने ते खाल्लेले जेवण आपल्या पोटामध्ये फुगते आणि त्याच मुळे ऍसिडिटी सारखे त्रास होतात. अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच झोपणे देखील शरीरासाठी अयोग्य असते. खाल्ल्यानंतर लगेच झोपल्यामुळे खाल्लेले जेवण वर यायला लागते आणि ऍसिडिटी आणि गॅस सारखे त्रास होतात. त्यानंतर सर्वात मोठी चूक म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे. यामुळे आपल्या पोटात असलेले अन्न फुटते आणि त्यामधील पाचक तत्त्वे बाहेर निघायला मदत होत नाही.

त्यामुळे अन्न पचायला कठीण जाते. त्यामुळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर एका तासाने पाणी प्यावे. पण जर तुम्हाला पाणी प्यावेसे वाटत असेल तर तुम्ही एक किंवा दोन घोट पाणी पिऊ शकता. त्यानंतरचे महत्त्वाचे कारण म्हणजे अन्न व्यवस्थित रित्या चावून न खाणे. आपण अनेक वेळा घाई घाई मध्ये व्यवस्थित चावून अन्न खात नाही आणि ते पचायला कठीण जाते त्यामुळे पचनसंस्थेमध्ये अनेक अडथळे येतात.

सर्वात मोठी चूक म्हणजे जेवल्यानंतर लगेच सलाड खाणे. सलाड मध्ये पाण्याची मात्रा जास्त असल्यामुळे जेवणानंतर खाल्ल्यास पचायला कठीण जाते. त्यामुळे कधीही सलाड जेवणाबरोबर किंवा जेवणाअगोदर एक तास खाल्ले पाहिजे. त्यानंतर कमी पाणी पिऊ नये. त्यामुळे सामान्य माणसाला दिवसा मधून कमीत कमी दहा ते अकरा ग्लास पाणी प्यायला पाहिजे. त्यानंतरची चूक म्हणजे जेवणानंतर लगेचच चालणे.

हे वाचा:   माशाचे डोके खाणारे एकदा नक्की वाचा.! यामुळे शरीरात काय होतात बदल.? अनेक लोकांना याबाबतची नाही माहिती.!

जेवल्यानंतर फेऱ्या मारणे हे आपल्यासाठी फायदेशीर असतेच पण जेवल्यानंतर लगेच फेऱ्या मारणे हे शरीरासाठी फायद्याचे नसते. कारण चालण्याने आपले ब्ल’ड सर्कुलेशन होते. त्याचबरोबर फॅट असलेल्या गोष्टी देखील कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजे. त्याचबरोबर तेलकट-तुपकट पदार्थ देखील कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे. सोबतच जे लोक दिवसभर बसून असतात त्या लोकांना देखील प्रचंड क्रियेमध्ये समस्या येऊ शकतात.

कारण आपण दिवसभर बसून असल्यामुळे आपले ब्ल’ड सर्कुलेशन कमी प्रमाणात होऊ लागते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. जेवण केल्यानंतरची चूक म्हणजे जेवल्यानंतर लगेच दूध पिणे. जेवल्यानंतर लगेचच दूध पिणे अयोग्य आहे. कारण दूध हे स्वतःमध्येच एक पूर्ण आहार असल्याने. जेवणानंतर लगेचच प्यायल्यामुळे पदार्थ पचायला अवघड जाते. त्यामुळे जेवल्यानंतर कमीत कमी दोन तासानंतर तुम्ही दूध पिऊ शकता.

त्यानंतर झोपेची कमतरता माणसाला कमीत कमी सहा ते आठ तास झोपले पाहिजे. या सर्व गोष्टी जर तुम्ही लक्षात घेऊन त्यांच्यावर काम केले तर तुमची पचनसंस्था योग्य प्रकारे काम करू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *