चेहऱ्यावर ना दिसेल पिंपल्स ना दिसेल फोड, चेहऱ्याला पूर्ण सॉफ्ट बनवा.! फक्त एकदा करा हा दोन रुपयाचा साधा उपाय.!

आरोग्य

आपले सौंदर्य खुलवण्यासाठी आपला चेहरा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपला चेहरा टवटवीत व डाग रहित असायला हवा यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आजचा आपला उपाय केल्याने त्वचेवर असलेल्या सर्व प्रकारच्या आजारानं नाहीसा करणारा असणारं आहे. आता बदलत्या वातावरणामुळे आपल्या चेहऱ्यावर बारीक पुरळ, पिंपल्स, काळे डाग, डार्क सर्कल, धूळ, माती असा प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अश्या वेळी आपल्याला चेहऱ्याची खूप काळजी घ्यावी लागते. पण कधी कधी आपण ती काळजी घेत नाही. आपण अनेक प्रकारच्या बाजारामध्ये उपलब्ध असलेले क्रीम वापरतो. पार्लर मध्ये गेल्यावर चेहऱ्यासाठी अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट करतो. यामध्ये आपले बरेचसे पैसे खर्च होतात. पण आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक जाणून येईल.

यासाठी लागणारी सामग्री आपल्या रोजच्या वापरातील असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे कच्चे दूध. आपल्याला दोन छोटे चमचे कच्चे दूध घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यात एक चमचा गव्हाचे पीठ टाकायचे आहे. दुधामुळे आपल्या चेहर्‍यावर एक चमक यायला मदत होते. दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.

त्यामुळे दूध आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किनला चमकदार बनवण्यासाठी मदत करते. त्या नंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप टोमॅटो चा रस टाकायचा आहे. या रसामध्ये टोमॅटोच्या बिया देखील असल्या तरीही चालेल. हा रस तुम्ही टोमॅटो मिक्सरमध्ये टाकून देखील बनवू शकता. किंवा हाताने पिळून देखील त्याचा वापर करू शकता. दोन ते तीन चमचे आपल्याला टोमॅटो चा रस वापरायचा आहे. आता या घेतलेल्या सर्व घटकांना एकत्रित पणे मिक्स करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   दुधात हा एक पदार्थ टाकून पिल्यास हे सात आजार कायमचे दूर जातात, महिलांनी तर एकदा वाचायलाच हवे.!

आता हे मिक्स झालेले मिश्रण कापसाच्या मदतीने किंवा टिशू च्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करत लावू शकता. तुम्हाला हवा असेल तर ह्या मिश्रणाचा उपयोग फेस पॅक म्हणून देखील करू शकता.हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनिटे तसेच ठेवून त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ साबणाने धुवून घ्यायचे आहे.

दहा ते पंधरा मिनिटे चेहर्‍यावर या मिश्रणाने मसाज देखील करू शकता. दोन्ही प्रकारे या मिश्रणाचा वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक दिसून येईल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन दिवस देखील करू शकता. आजचा उपाय करण्यासाठी वापरलेल्या सर्व गोष्टी घरगुती असल्यामुळे याचा तुमच्या चेहऱ्यावर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही.

हा उपाय करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे हा उपाय तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवू नका. यामध्ये वापरले जाणारे सर्व घटक ताजेच असावे. तरच या उपायाचा तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसून येईल. या उपायाच्या पहिल्याच वापराने तुम्हाला खूप जास्त फरक दिसून येईल. दुसरा उपाय बनविण्यासाठी आपल्याला येथे लागणार आहे बाजारात प्रसिद्ध असणारी कोणतीही टूथपेस्ट. तर एका वाटीमध्ये आपल्याला सर्वप्रथम एक चमचा टूथपेस्ट घ्यायची आहे.

हे वाचा:   रात्री उशिरा किंवा लवकर झोपल्याने मेंदूत होत असतात हे बदल.! अनेक लोकांना वाटू शकेल नवल नाहीतर चमत्कार.!

यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. आता या दोन्ही घटकांना मिक्स करून घ्यायचे आहे. हे झालेले मिश्रण तुम्हाला कापसाने किंवा कोणत्याही टिशु ने चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करत लावायचे आहे. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून फक्त दोन वेळाच करायचा आहे. हा उपाय वापरायच्या आधी तुम्ही पॅच टेस्ट करून नक्की पहा. म्हणजेच हा उपाय चेहऱ्यावर लावायच्या आधी तुम्ही चेहऱ्याच्या कोणत्याही एका छोट्या भागावर लावून बघू शकता.

जर तुम्हाला जळण किंवा खाज खात असेल तर तुम्ही हा उपाय वापरू नये. हे दोन्ही उपाय लाभदायी आहेत. या उपायानं तर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील. आणि पिंपल्स किंवा ॲकने सारखा त्रास परत होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *