आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत यामुळे पिं’पल्स, रिं’कल्स, काळे डाग, चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमचे दूर होतील. उन्हाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर हे प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येते त्यामुळे हा उपाय केल्याने आपल्या शरीराला तसेच चेहऱ्याला थंडपणा देखील जाणवेल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय आपल्याला कसा बनवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे.
सर्वप्रथम आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी बटाटा घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. बटाटा हाइपर पीगमेंटेशन ला कमी करतो. चेहऱ्यावर चमक आणायचे काम करतो. ज्यांची त्वचा खूपच निस्तेज झाली आहे त्यांच्यासाठी बटाटा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम बटाटा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्याची साले काढून घ्यायची आहेत.
त्यानंतर बटाटे छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कापायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याची बारीक पेस्ट बनवायला मदत होईल. आपल्याला बटाटा बारीक ठेचुन घ्यायचा आहे आपल्याला याची खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कापूर. आयुर्वेदामध्ये कापूर हा खूप औषधी गुणधर्मांचा भंडार मानला जातो.
कापूर शरीराला थंडावा देण्याचे काम करतो. चेहऱ्यावर कुठेही बारीक जखम झाली असेल तर त्यासाठी देखील कापूर खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे आपल्याला इथे एक कापूर या बटाट्याच्या पेस्ट मध्ये टाकायचा आहे. तिसरी आणि शेवटची गोष्ट आपल्याला इथे घ्यायचे आहे ती म्हणजे गुलाब जल. गुलाब जल हे आपल्या चेहऱ्यावर चमक आणायला मदत करते.
त्यामुळे एक चमचा गुलाब जल आपल्याला या पेस्टमध्ये टाकायचे आहे. आता ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा आपल्याला स्वच्छ पुसून किंवा धुऊन घ्यायचा आहे. आपल्या चेहऱ्यावर असणारी धूळ निघून जाईल. आणि चेहऱ्यावरील पोल ओपन होतील आणि आपला उपाय आपले काम करेल. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर दहा ते वीस मिनिटे लावून ठेवायची आहे.
वीस मिनिटांनी पेस्ट सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग,पिंपल्स, सुरकुत्या लवकरच निघून जातील. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.