घरातल्या माशा, उंदिर, मच्छर घरातून पळून जातील.! एकही कीटक घरात दिसला तर बोला.! असा धूर घरात फक्त दहा मिनिटे ठेवा.!

आरोग्य

गरमीचे दिवस असल्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक डास येत असतात. हे डास आपल्याला चावले तर त्यामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. डें’ग्यू, म’ले’रि’या यासारख्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यासाठी योग्य ते उपाय करून या डासांना नाहीसे करणे गरजेचे असते. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या अगरबत्त्या, कॉईल उपलब्ध असतात पण त्यांच्या वासामुळे आपल्याला अजून त्रास होतो किंवा कधी कधी ते आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकतो.

त्यासाठीच आज आपण असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. उलट डास पळून जायला मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. हा घरगुती उपाय असल्यामुळे आपण घरामध्ये रोजच्या वापरात जे सामान वापरतो त्या सामाना मधील काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत.

सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचे आहे ती म्हणजे दालचिनी. ही पाने सगळ्यांच्या घरांमध्ये सहजपणे उपलब्ध होऊन जातात. येथे आपल्याला तीन ते चार पानांचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाच ते सहा वड्या कापून घ्यायचा आहे. आपल्या घरी देवघरामध्ये देवासाठी कापराचा वापर केला जातो. पण सोबतच आयुर्वेदामध्ये देखील कापराचा वापर केला जातो. कापूर औषधी मांनला जातो.

म्हणूनच आपल्याला इथे कापराचा वापर करायचा आहे. सर्वात शेवटी आपल्याला लिंबाचे तेल. लिंबाच्या तेलाचा वापर आयुर्वेदामध्ये देखील केला जातो. मला एका विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो त्यामुळे मच्छर कधीच आपल्या घरा जवळ येत नाहीत म्हणून आपण येथे लिंबाच्या तेलाचा वापर करनार आहोत. उपाय कसा बनवायचा आहे तर आपण जाणून घेणार आहोत.

त्याच बरोबर आपल्याला असा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेणेकरून डास, कीटक, उंदीर आपल्या घरामध्ये येऊ शकणार नाहीत. मुख्यत्वे आपल्याला आपल्या स्वयंपाक घराची स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे जोपर्यंत आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ ठेवत नाही तो पर्यंत आपल्या घरी हे असे डास किंवा उंदीर येत राहतील. आपले जेवण बनवून झाल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरातील प्लॅटफॉर्म स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

हे वाचा:   दवाखान्यात जाणारे लाखो रुपये वाचले जातील.! यापुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल आहे.! याचे असे फायदे वाचून तुम्हीच चक्रावून जाल.!

त्या बरोबरच घेऊन घेतलेली भांडी आपल्याला ओलीच्या ओली ट्रॉलीमध्ये न ठेवता वाळत ठेवून झाल्यानंतर ती ट्रॉली मध्ये ठेवायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनवायचा कसा त्याबद्दल.. सर्वप्रथम आपल्याला कापूर ची पावडर बनवून घ्यायची आहे आता ही पावडर बनविण्यासाठी आपल्याला घरातील कोणत्याही भांड्याचा वापर करायचा नाही आहे. आपण कागदामध्ये किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या सहाय्याने ही पावडर तयार करून घ्यायची आहे.

कारण जर आपण स्टील किंवा काचेच्या वस्तू चा वापर केला तर कापूर चा वास खूप दिवस त्या भांड्याला लागुन राहिल म्हणून कागदाच्या मदतीने आपल्याला ही पावडर बनवून तयार करायचे आहे. आता या पावडर मध्ये आपल्याला लिंबाच्या तेलामध्ये टाकायची आहे.या दोन घटकांना एकत्रित पणे मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला एक असे पात्र घ्यायचे आहे, जे आपण पूजेसाठी किंवा घरामध्ये धूप टाकून धूर करण्यासाठी वापरत असतो.

मग ते पात्र मातीचे पितळाचे किंवा स्टीलचे देखील असू शकते. आपल्याला चे भांडे रोज तसेच ठेवायचे आहे कारण हा उपाय आपल्याला रोज करावा लागणार आहे. त्या पात्रांमध्ये तेजपत्ताच्या पानांचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि या तुकड्यांवर बनवून घेतलेले तेल आपल्याला टाकायचे आहे. आता या पानांना आग लावायची आहे. आग लावून झाल्यानंतर ते आपोआप विझेल आणि त्याचा धूर होईल आणि तो सर्वत्र घरांमध्ये पसरेल.

या धुरामुळे आपल्या घरामध्ये मच्छर किंवा माशा येणार नाहीत. हा उपाय दररोज संध्याकाळी केल्यास तुमच्या घरात मच्छर येणार नाहीत. वापरले गेलेले सर्व गोष्टी घरगुती असल्यामुळे त्याचा आपल्याला काही त्रास देखील होणार नाही. आता आपण जाणून घेणार आहोत उंदीर हाकलून लावण्यासाठी दुसरा उपाय. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे स्प्रे बॉटल घ्यायची आहे. या बॉटल मध्ये एक ग्लास पाणी टाकायचे आहे.

हे वाचा:   त्वचारोग कसाही असू द्या व कितीही जुना असू द्या या पानांच्या उपायाने फक्त तीनच दिवसात सर्व गायब होईल...!

या पाण्यामध्ये एक चमचा मीठ, एक चमचा कापूर ची पावडर, एक चमचा डेटॉल आणि एक चमचा विनेगर टाकायचे आहे. आता या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचे आहे. ह्या मिश्रणामुळे आपल्या घरातील उंदीर कायमचे घराबाहेर निघून जातील आणि आपला घरात परत उंदीर येणार नाहीत. या उपायांमुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी तर निघून जाईल. असे म्हटले जाते की मीठामुळे घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते. त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी देखील बाहेर जाण्यास मदत होईल.

सोबतच डेटॉल वापरला असल्यामुळे त्याच्या वासामुळे आपल्या घरामध्ये कीटक किंवा उंदीर परत येणार नाहीत. जिथे उंदीर येत असतील तिथे या मिश्रणाचा वापर करा. याचा एकच वापराने उंदीर कायमचे घरातून निघून जातील. बरोबरच जर तुमच्या बेसिनमध्ये किंवा अशा ठिकाणी जिथे झुरळ येत असतील. तर तिथे तुम्ही एका कापसामध्ये लिक्विड टाकून गोळा करून ठेवल्यास त्या जागेवरील झुरळे मरतील आणि नवीन झुरळ येणार नाहीत.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *