काही आजार असे असतात जे काही केल्याने जात नाही. असाच एक आजार म्हणजे त्वचाविकार. त्वचा विकारांमध्ये खरुज, नायटा, गजकर्ण इत्यादी प्रकार येतात. यांचा त्रास इतका भयंकर असतो की यामुळे शरीरामध्ये खूपच त्रास होत असतो. याच्या त्रासामुळे लोक खूपच कंटाळून गेली आहेत. कारण यामुळे इतकी भयंकर खाज येत असते की थेट त्वचेतून रक्त बाहेर येते.
या समस्येवर अनेक उपाय केले जातात परंतु हे त्वचा विकार इतक्या सहजरीत्या बरे होत नाही. अनेकांना कित्येक वर्षांपासून गजकर्ण खरूज नायटा अशा प्रकारच्या त्वचा विकारांची समस्या आहे. अशा प्रकारचे हे त्वचा विकार हे ज्या ठिकाणी अंग झाकलेली असते किंवा जेथून खूपच जास्त प्रमाणात उष्णता येत असते म्हणजेच घाम येत असतो अशा ठिकाणी हे जास्त प्रमाणात निर्माण होत असतात.
याचे अनेक कारणे सांगितली जातात. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे शरीराची चांगल्याप्रकारे स्वच्छता न ठेवणे. जर शरीर स्वच्छ नसेल तर अशा प्रकारचे अनेक त्वचाविकार निर्माण होण्याची शक्यता असते. अनेक लोक दररोज आंघोळ करत नाही अशा लोकांमध्ये हा विकार जास्त प्रमाणात बघायला मिळत असतो. त्यामुळे दररोज शरीर स्वच्छ ठेवावे नियमित स्वरूपात स्वच्छ अशी आंघोळ करावी, सैल कपडे परिधान करावे.
जास्त मांसाहार केल्यामुळे देखील हा आजार आणखी वाढला जाऊ शकतो. अच्छा या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच सोपा असा उपाय सांगणार आहे. यामुळे खरूज नायटा गजकर्ण काही दिवसातच गायब झालेले दिसेल. तुम्ही यासाठी जे औषध लागेल ते अगदी घरगुती पद्धतीने घरीच बनवू शकता व तुमच्या गजकर्ण, खरूज, नायटा यांना बरे करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करावा.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वनस्पतीचे पाने लागेल ही वनस्पती आहे कडुलिंब. कडुलिंब आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत असते. कडुलिंबाचा पाला मध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात जे अशा प्रकारच्या त्वचा विकारांना दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असतात. यासाठी आणखी एक वस्तू लागेल ती म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेल या प्रकारच्या विकारांना पसरू न देण्याचे काम करते.
यासाठी तुम्हाला थोडीशी हळद देखील लागेल. सर्वप्रथम गॅस वर एका कढईमध्ये हे खोबरेल तेल टाकावे व त्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकावे. थोड्या वेळ याला चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यावे व त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकावी. चांगल्याप्रकारे गरम झालेले हे तेल नंतर एका वाटीमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर हे थंड होऊ द्यावे व ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी हे तेल दिवसातून एक ते दोन वेळेस लावावे.
हा उपाय तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस करत राहायचा आहे. तुम्हाला फक्त तीनच दिवसात याचा इफेक्ट दिसून येईल. हळूहळू तुमचे फंगल इन्फेक्शन कमी झालेले दिसेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.