कोलगेटच्या अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी नाही सांगणार.! फक्त दातच नाही तर असाही होऊ शकतो कोलगेटचा वापर.!

आरोग्य

आपल्या सर्वांच्या घरी अनेक प्रकारचे टूथपेस्ट आपण वापरत असतो पण जर तुम्ही पांढऱ्या रंगाची टूथपेस्ट वापरत असाल तर आपल्याला अनेक ठिकाणी कामी येते म्हणजेच तिचे भरपुर फायदे आपल्याला मिळतात. तेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जर तुमच्या घरी पांढरे शूज असतील किंवा चप्पल सॅंडल आपल्याला साफ करण्यास कठीण जातात कितीही साफ केले तरी ते पांढरेशुभ्र होत नाहीत.

आपण त्यासाठी अनेक उपाय वापरतो पण कोलगेटचा एका वापराने आपले पांढरे शूज, पांढरी चप्पल सॅंडल पांढरीशुभ्र करू शकतो आणि यासाठी, देखील आपल्याला नवीन टूथपेस्ट ची गरज नाही. आपल्या घरी संपलेले टूथपेस्ट आपण फेकून देतो इथे तसं न करता आपण तास टूथपेस्ट चा वापर करून आपले शूज किंवा चप्पल पांढरेशुभ्र करू शकतो. जिथे पांढरी जागा आहे तिथे टूथपेस्ट लावून ब्रश ने घासायचे आहे आणि घासून झाल्यावर कपड्याने पुसून घ्यायचं आहे.

तुम्ही पाहून थक्क राहाल की एका वापराने आपली शूज पांढरेशुभ्र दिसू लागणार आहेत. त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येक खोली मध्ये पांढऱ्या कलरचे लाईट बोर्ड असतात आणि त्यांच्यावर देखील सारखे हात लावून ते काळपट झालेले असतात. आपण टूथपेस्टचा वापर या बोर्डवर देखील करू शकतो मेन स्विच बंद करून आपण बोर्डवर टूथपेस्ट लावून ब्रशने घासून त्यानंतर पुसून घ्यायचे आहे. आपले आपले बोर्ड पहिल्यासारखे पांढरेशुभ्र होऊन जातील.

त्याबरोबर घरातील प्लग,मिक्सर,चार्जर, लाईट, बोर्ड, इस्त्री, टीव्ही यासाठी आपण घराघरांमध्ये प्लग लावलेले असतात आणि हे प्लग सुद्धा काही काळानंतर काळपट होऊ लागतात त्यांना शुभ्र करण्यासाठी देखील आपण येथे टूथपेस्ट चा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्या बाथरूममधील किंवा बेसिन मधील नळ पाण्यामुळे जाड होतात किंवा स्टेन लागते.या स्त्रियांना देखील या गोष्टी साफ करण्यासाठी अडचण येते.

हे वाचा:   मॅगी आवडीने खाणाऱ्या लोकांना एकदा ती बनते कशी हे सांगा.! मॅगी चांगली परंतु ती बनते कशी हेही बघत जा.!

हे सगळे डाग दूर करण्यासाठी आपण टूथपेस्ट चा वापर करू शकतो. महिन्यातून एकदा उरलेल्या टूथपेस्ट ने नळ साफ केले तरीदेखील महिनाभरात ते तसेच राहतात. म्हणजे आपण फेकून देणार आहोत ती टूथपेस्ट आपल्याला नळ साफ करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्याच बरोबर आपल्या घरामध्ये आपण पाहुण्यांसाठी किंवा आपल्या दररोजच्या वापरासाठी काचेची भांडी वापरत असतो पण आपण या भांडणांचा देखील वापर खूपच कमी प्रमाणात करत असतो.

भरपूर दिवस ती बंद असल्यामुळे त्यावर देखील स्टेन लागू शकतो म्हणजेच पांढऱ्या कलर चा एक थर येतो आणि तो सहसा निघून जात नाही यासाठी देखील आपण टूथपेस्टचा वापर करू शकतो. तूच पेक्षा एका वापराने काचेच्या भांड्यावरील सर्व पांढरा थर निघून जाईल. आपल्या बाथरूममधील किंवा आपल्या बेडरूम मधील आरसा देखील आठवड्यामध्ये खराब होतच असतो.

तो साफ करण्यासाठी आपण अनेक लिक्विड वापरत असतो पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य होईल की, टूथपेस्टच्या मदतीने देखील आपण हे आरसे स्वच्छ साफ आणि चकचकीत करू शकतो. त्याचबरोबर आपल्या रोजच्या वापरातील इस्त्री. आपण इस्त्री करताना एखादा कपडा जाळतो आणि तो जाळ आपल्या तिसरीला लागलेला असतो आणि जेव्हा आपण त्याच इस्त्री ने दुसरे कपडे प्रेस करायला जातो तेव्हा भीती असते की इस्त्रीला असलेला काळपटपणा आपल्या नवीन कपड्यांना लागेल.

त्यामुळे इस्त्री वरील हा काळपटपणा देखील टूथपेस्ट द्वारे आपण काढून टाकू शकतो. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की कांदा कापल्यानंतर आपल्या हाताने एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि तो वास नष्ट करण्यासाठी आपण आपले हात धुतले तर हा वास कायमचा नष्ट होतो. सोबतच ज्यांना ज्यांना चष्मा असेल आणि त्या आपला चष्मा साफ करण्यासाठी महाग स्प्रे वापरत असतील तर तसे न करता टूथपेस्ट ने देखील आपला चष्मा आपण साफ करू शकतो टूथपेस्ट एक अशी गोष्ट आहे.

हे वाचा:   दररोज फक्त या तीन गोष्टीचे सेवन करा, डोळ्यावर चष्मा राहणारच नाही; आजपर्यंत असा उपाय ऐकला नसेल.!

त्याचे आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक फायदे आहेत त्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करतो ते काम फक्त तूच द्वारे होऊ शकते सोबतच जर आपले ओठ थंडीमुळे फाटले असतील तर त्यावर देखील आपण टूथपेस्ट लावून पाच मिनिटाने धुऊन टाकल्यास आपले ओठ पूर्वीसारखे मुलायम होतात सोबतच अनेकदा आपल्या लादीवर एक काळपट थर येतो. तो थर घालविण्यासाठी देखील आपण टूथपेस्ट वापर करू शकतो.

त्याचबरोबर चांदीच्या मुर्त्या देखील साफ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर केला जातो. असे किंवा यासारखे अनेक फायदे या छोट्याश्या टूथपेस्ट ने होऊ शकतात. आणि यासाठी आपल्याला नवीन टूथपेस्ट घेण्याची देखील गरज भासत नाही. जी संपलेली टूथपेस्ट असते ती टुटपेस्ट कापून त्यामधील पेस्टचा वापर आपण करू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *