आपल्या कित्येक जणांच्या घरामध्ये कोंबड्याचा रस्सा बनतच असेल. पण तो रसा बनवायची पद्धत मात्र वेगळी असेल.आज आपण अशी एक पद्धत जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपला रस्सा एकदम झणझणीत आणि चविष्ट होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोणती सामग्री लागणार आहे आणि हा रस्सा बनवण्यासाठी ची प्रक्रिया कशी असणार आहे.
हा चविष्ट आणि झणझणीत रस्सा बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे चिकन. हे चिकन आपण स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांना मीठ आणि हळद लावून व्यवस्थित लावून दहा ते पंधरा मिनिटांसाठी वेगळे ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर चिकन मध्ये टाकायचा मसाला देखील आपल्याला बनवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा, एक टोमॅटो, थोडीशी कोशिंबीर, थोडा पुदिना.
जर पुदिना नसेल तर तुम्ही पुदिना नाही घेतला तरीही चालेल. दहा ते पंधरा लसूनच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला सुके खोबरे देखील भाजून घ्यायचे आहे. सोबतच आपण जो कांदा घेतलेला आहे त्याला देखील आपण गॅस वर जाळी टाकून भाजून घ्यायचा आहे. हा कांदा तुम्हाला आख्खा भाजायचा आहे. पण भाजायच्या आधी त्याच्या वरच्या पाकळ्या काढून घ्यायचे आहेत.
त्यानंतर इथे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे. आणि या टोमॅटोला देखील भाजून घ्यायचे आहे.
आता या भाजून घेतलेल्या गोष्टींना आपल्याला वेगवेगळे पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजेच वाटून घ्यायचे आहे. सर्वप्रथम एका खलबत्त्यामध्ये लसुनच्या पाच ते सहा पाकळ्या, थोडे कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि सुके खोबरे टाकून त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे.
उरलेले बाकी सर्व गोष्टी किंवा राहिलेले सामान आपल्याला एका मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. पेस्ट तयार करून झाल्यानंतर गॅस वर एक पात्र गरम होण्यासाठी ठेवायचे आहे त्यानंतर त्या पात्रामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे. तेलामध्ये थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरून घेऊन एक कांदा टाकायचा आहे आणि हळद आणि मीठ लावून घेतलेले चिकन त्यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहे.
त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून त्यावर थोडेसे पाणी ठेवायचे आहे आणि या चिकन मध्ये पाणी टाकायचे नाही आहे कारण चिकन आपल्यामध्येच पाणी सोडत असते त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवायचे आहे आणि मंद आचेवर हे चिकन शिजू द्यायचे आहे. पाच मिनिटांनी परत झाकण काढून पाहायचे आहे की चिकन शिजत आहे. आता ते पाणी आपण काढणार आहोत तेव्हा झाकणा वरील सर्व पाणी चिकन मध्ये टाकायचे आहे.
तुम्हाला जे वडा रस्सा हवा असेल तेवढे पाणी तुम्ही त्यामध्ये टाक शकता. जेव्हा आपल्याला वाटेल की चिकन शिजले आहे तेव्हा एका वेगळ्या भांड्यामध्ये हे चिकन आपल्याला काढून घ्यायचे आहे. चिकन काढून झाल्यानंतर जे पात्रामध्ये आपण चिकन सजवले होते ते मात्र परत गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे. तेल टाकुन झाल्यावर ते थोडेसे गरम करून झाल्यावर यामध्ये आपण बनवून घेतलेला ठेचा टाकायचा आहे आणि तो थोडासा शिजू द्यायचं आहे.
हा ठेचा थोडा शिजल्यावर आपल्याला बारीक वाटून घेतलेली चटणी टाकायचे आहे आणि ती देखील शिजू द्यायचे आहे. पूर्ण एक मिनिट हे मिश्रण शिजून झाल्यानंतर याबद्दल दुसऱ्या शिजवून घेतलेला चिकन टाकायचे आहे आणि आता या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे.आपल्याला मसाला आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि परत एकदा उकळी येऊन द्यायची आहे.
त्यानंतर तुम्ही या चवदार आणि झणझणीत चिकनचा आस्वाद घेवू शकता. अशाप्रकारे घरच्या घरी चविष्ट आणि झणझणीत चिकन बनवून संपूर्ण कुटुंबीयांना आनंद द्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.