काळेभोर केस हवे असतील तर बाहेरचे शाम्पू आजच फेकून द्या आणि घरीच बनवा असा शाम्पू.! केस वाढतच जातील.!

आरोग्य

आपल्या केसांचे आरोग्य उत्तम व मजबूत राहण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण केसांना शाम्पू कंडिशनर लावत असतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे शाम्पू कंडिशनर सहजरीत्या उपलब्ध होत असतात. प्रत्येक जण आपल्या केसांची काळजी मनापासून करत असतो कारण जर आपले केस जर सुंदर असतील तर आपले व्यक्तिमत्व देखिल सुंदर दिसते.

केस गळण्याची समस्या, केस तुटणे,अकाली केसांना पांढरे पण येणे यासारख्या समस्या पासून त्रस्त असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या केसांची काळजी अवश्य करायला पाहिजे.आजच्या लेखामध्ये आपण घरच्या घरी तयार करता येणारा एक शाम्पू कंडिशनर जाणून घेणार आहोत. हा शाम्पू तुम्ही बनवल्याने तुमच्या केसांचे आरोग्य अगदी मजबूत राहणार आहे.

तुमचे केस भविष्यात कधीच गळणार नाही. केसांची मुळे अगदी घट्ट होणार आहे, त्याचबरोबर तुमच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असतील तर ते सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे.तुमच्या केसांचा रंग अगदी नैसर्गिक रित्या काळाभोर होणार आहे. पांढरे झालेले केस काही दिवसांमध्ये नैसर्गिक रित्या चमकणार आहेत आणि काळे देखील होणार आहे.

अशा प्रकारे हा उपाय तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा सुधारण्यासाठी एकदम महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. या पदार्थाने तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला आवळा लागणार आहे. जर तुमच्याकडे आवळा असेल तर उत्तम जर आवळा नसेल तर बाजारामध्ये आवळ्याची पावडर सहजरीत्या उपलब्ध होते. आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते. या विटामिन सी मुळे आपले केस मजबूत बनतात. आपले केस गळत नाही, केस तुटत नाही, केसांना अकाली पांढरे पण देखील येत नाही.

हे वाचा:   निसर्गाचा चमत्कार.! ही वनस्पती आयुर्वेदात सोण्या समान मानली जाते.! याच्या फक्त एका पनानेच माणूस पूर्ण बरा होतो.! अशा लोकांनी हात पण लावू नये.! पण का.?

शाम्पू केल्यानंतर तुमचे केस भरपूर प्रमाणामध्ये गळत असतील तर आजच्या लेखामध्ये सांगितलेले उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला परत परत जाणवेल त्याच बरोबर आपण हा शाम्पू तयार करत असताना जी काही प्रक्रिया सांगितली आहे ती प्रक्रिया तसेच आपल्याला फोलो करायचे आहे,यामुळे केसांना लवकरच परिणाम झालेला दिसून येईल.

आपल्याला आपल्या घरात केसांच्या लांबीनुसार आवळा पावडर घ्यायची आहे आणि म्हणूनच अशा वेळी एक ते दोन कप तुम्ही आवळा पावडर सहजरीत्या घेऊ शकता त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ वापरायचा आहे ती म्हणजे रीठा शिकाकाई पावडर. रीठा शिकाकाई पावडर आपल्याला बाजारांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते.

आपल्या केसांना नैसर्गिक रित्या चमक देण्याचे कार्य रीठा शिकाकाई करत असते, त्याच बरोबर जर तुमच्या केसांच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल तर हे फंगल इन्फेक्शन दूर करण्याची क्षमता रीठा शिकाकाई मध्ये असते. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला रीठा शिकाकाई पावडर लागणार आहे.

ही पावडर बाजारामध्ये तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहजरीत्या उपलब्ध होते.या रीठा शिकाकाई मध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याच बरोबर जर तुमच्या केसांचे आरोग्य बिघडले असेल तर आपले केस मजबूत बनवण्यासाठी याचा वापर केला जातो तसेच आपले केस लांबसडक होण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रिठा शिकाकाई वापरले जाते.

हे वाचा:   दातांना मोत्यांप्रमाणे चमकदार बनवा, फक्त करावा लागेल हा छोटासा उपाय.!

आता आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि या पातेल्यामध्ये एक दीड चमचा आवळा पावडर , एक चमचा रिठा पावडर एक चमचा शिकाकाई पावडर घ्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचे आहे. मिश्रण व्यवस्थित उकडून झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यायचे आहे.

जर तुम्हाला जास्त फेस हवा असेल तर यामध्ये तुम्ही जास्त रिठा पावडर मिक्स करू शकतात. हे मिश्रण थोडेसे घट्ट झाल्यावर किंवा थोडेसे पातळ तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तयार करू शकतात त्या नंतर आपल्याला हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे आहे, जेव्हा तुम्ही केस धुवायला जाणार आहात तेव्हा आपल्याला हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे आहे. असे केल्याने तुमचे केस काळेभोर होणार आहे.

केसांची लांबी वाढणार आहे. जर अकाली पांढरे पण आले असेल तर ते देखील दूर होऊन जाणार आहे म्हणून अशावेळी केसांचे आरोग्य नैसर्गिक रित्या मजबूत बनवण्यासाठी आजचा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *