दोन रुपयाच्या तुरटीला साधारण समजू नका.! ह्या वीस रोगांचा काळ बनून उभी राहते तुरटी.! थक्क करून टाकेल एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

आपण सगळ्यांना तुरटी म्हणजे काय हे माहीतच असेल.तुरटी अनेक कामासाठी वापरली जाते. तुरटी, जवळजवळ प्रत्येक घरात आढळते. अनेक वर्षांपासून हेअर स्टायलिस्ट दाढी केल्यानंतर तुरटीला चेहऱ्यावर लावतात. जर कधी तुम्ही देशी सलूनमध्ये शेव्हिंग केली असेल तर तुम्ही शेव्हिंग केल्यानंतर तुरटी लावल्याने होणाऱ्या जळजळीशी परिचित असाल. परंतु ​त्वचेवर तुरटी उगाच नाही लावली जात. तुरटी खूप उपयुक्त अँटिसेप्टिक आहे.

ती त्वचा कापल्यावर रक्ताचे वाहणे सहज थांबवू शकते. याशिवाय यामुळे जखम होण्याची शक्यताही कमी होऊन जाते. तुरटीचे फायदे फक्त एवढेच मर्यादित नाहीत. त्यामुळे आज आपण तुरटीचे अनेक फायदे जाणून घेणार आहोत. तुरटीला पोटॅश ऍलम वा पोटॅशियम एल्युमिनियम सल्फेटही म्हटले जाते. पुरुषांचे सौंदर्य उजळवण्यात तुरटी दीर्घ काळापासून आपले योगदान देत आली आहे.

हे रंगहीन, तुरट संयुग आहे जे एल्युमिनियम आणि पोटॅशियमचे हायड्रेटेड डबल सल्फेट आहे. तुरटीचा डाय आणि टॅनिंगच्या कामातही वापर केला जातो. तुरटी जवळजवळ प्रत्येक बाजारात सहजरीत्या उपलब्ध होते. याशिवाय जवळजवळ प्रत्येक पारंपरिक ब्युटी प्रॉडक्टमध्ये याचा वापर कोणत्या ना कोणत्या रूपात केला जातो. अनेकांच्या त्वचेवर मुरूम निघणे सामान्य त्रास आहे.

मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांच्या शिवाय तुरटीही खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. आम्ही हे उगाच म्हणत नाही, कारण तुरटीमध्ये त्वचेला संकुचित वा आक्रसवण्याचा गुण आढळतो. याच्या वापरामुळे त्वचेचे रोमछिद्र स्वच्छ होण्यासोबतच आक्रसूनही जातात, ज्यामुळे मुरूम बरे होतात. त्याचबारोबर जर तुमच्या तोंडामध्ये छाले आले असतील तर ते देखील बरे होण्यास मदत होते त्यासाठी आपल्याला तुरटीची पावडर बनवून घ्यायचे आहे.

हे वाचा:   रात्रभर खोकत बसाल पण, सकाळी करायचे हे एक काम.! खोकला कायमचा दूर होईल.! खोकला आला की दीड मिनिटात हा एक उपाय करून टाकायचा.!

या पावडर मध्ये एक चमचा मध टाकायचे आहे. मध टाकल्यानंतर तोंडामध्ये जिथे जिथे छाले झाले आहेत तिथे लावायचे आहे. हे केल्यावर तोंडामध्ये आलेली लाळ गिळायची नसून ती बाहेर टाकून द्यायची आहे. केवळ तीन ते चार दिवसांमध्ये छाले कायमचे निघून जातील. जर शरीरावर कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल, र’क्त येत असेल तर त्यावर तुरटीने ती जागा साफ केल्यास हळूहळू ती जखम भरू लागते. दातांचे आजार देखील कमी होतात.

पायांना पडलेल्या भेगा देखील तुरटीच्या वापराने चांगले होतात त्या सोबतच पाय देखील मऊ राहतात हे करण्यासाठी गरम पाण्यामध्ये तुरटी फिरवून त्यामध्ये पाच ते दहा मिनिटे पाय ठेवणे गरजेचे असते. असे केल्यास पायांमधील पडलेल्या भेगा हळूहळू भरू लागतील व पाय पूर्वीसारखे मुलायम होण्यास मदत होईल. सोबतच गढूळ पाण्याला स्वच्छ करणे हे काम देखील तुरटी करते. विहिरी मध्ये असलेले पाणी किंवा आपल्या घरात देखील असलेले पाणी आपण तुरटी सहाय्याने स्वच्छ करू शकतो.

हे वाचा:   महागतले महाग औषधे सुद्धा यापुढे फेल आहेत, आयुषयभरासाठी खूप उपयोगी पडेल ही वनस्पती.!

तुरटी कशाच्या तरी सहाय्याने आपल्याला पाण्यामध्ये फिरवायची आहे.हे केल्यामुळे पाण्यामध्ये असलेली सर्व दूषित घटक पाण्याच्या खाली बसतात व स्वच्छ पाणी मिळते. त्यासोबतच लहान मुलांच्या केसांमध्ये उवा झाल्या असतील त्या देखील तुरटीच्या मदतीने आपण कायमच्या नष्ट करू शकतो. थोड्या पाण्यामध्ये तुरटीची पावडर टाकून हे पाणी केसांच्या मुळापर्यंत लावायचे आहे आणि अर्ध्या तासासाठी ते तसेच ठेवायचे आहे.

अर्धा तासानंतर केस धुवायचे आहेत तुम्हाला एका वापरा मध्येच केसांमध्ये बराच फरक झालेला दिसून येईल. सर्व उवा मरून जातील सोबतच केसांमधील कोंडा देखील नाहीसा होईल. त्याचबरोबर चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या देखील तुरटीच्या वापराने नाहीशा होतात. सोबतच काखे मधून येणारा वास देखील तुरटीच्या मदतीने नाहीसा करता येतो. अशा प्रकारचे अनेक फायदे तुरटी मुळे होतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *