3 दिवसात चेहरा इतका गोरा होईल की प्रत्येकजण तुमच्याकडे पाहतच राहतील.. फक्त या तुकड्याचा करा असा उपयोग.!

आरोग्य

आपल्या चेहरा सुंदर दिसावा यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. अनेकदा आपला चेहरा आपल्या जगण्याला बळ देत असतो. आपली त्वचा काळी असो की गोरी असो याने काही फरक पडत नाही परंतु आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेचा रंग हा नैसर्गिक असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव अजिबात करायला नाही पाहिजे.

प्रत्येकाच्या त्वचेचा रंग हा नैसर्गिक रित्या जरी असला तरी आपल्या शरीरातील मेलॅनिन असते, त्या मेलेनिन मुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचा उजळून दिसत असते.काही व्यक्तींच्या त्वचेमध्ये मेलॅनिन चे प्रमाण कमी असते आणि म्हणूनच अनेकदा त्यांच्या त्वचेचा रंग फिका असतो किंवा काही व्यक्तींच्या शरीरामध्ये मेलॅनिनचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच त्यांची त्वचा गडद असते आपली त्वचा जर पिंपल रहित असली तर आपला चेहरा सुंदर दिसतो.

सध्या प्रत्येकाला सुंदर व्हावेसे वाटते आणि म्हणूनच अनेकदा आपण बाजारामध्ये उपलब्ध असणारे वेगवेगळे उत्पादन वापरत असतो परंतु हे सगळे उत्पादन वापरल्यामुळे त्वचा चांगली निरोगी दिसण्याची आपल्या त्वचेवर काळे डाग पिंपल, वांग येतात अशावेळी आपल्या चिंतेमध्ये भर होते. जर तुमच्या सुद्धा चेहऱ्यावर काळे डाग पिंपल आले असतील तर या सगळ्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.आज आपण एक महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत ते अगदी नैसर्गिक व घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत. हा उपाय केल्याने टवाचवउजळून निघणार आहे,चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दल..

हे वाचा:   चमचाभर मोहरी अशी वापरा, गजकर्ण बघायला सुध्दा उरणार नाही.!

आपली त्वचा नैसर्गिक दृष्ट्या व घरच्या घरी चमकवायची असेल तर यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहेत ते घरी सहज उपलब्ध होतात. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे ओली हळद. हळद जरी आपल्याला दिसायला आल्यासारखी असले तरी याचे औषधी गुणधर्म खूपच उपयुक्त असतात की हळद बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होते.

जर ओली हळद तुम्हाला मिळाली नाही तर अशावेळी तुम्ही हळकुंड द्वारे घरच्या घरी बनवलेली हळद देखील हा उपाय करण्यासाठी वापरू शकता परंतु बाजारातून आणलेली हळद हा उपाय करण्यासाठी वापरू नका. बहुतेक वेळा बाजारातून आणलेली हळदीमध्ये भेसळीचे प्रमाण अधिक असते, यामुळे तुमची त्वचा सुंदर बनण्याऐवजी खराब देखील होऊ शकते त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे वेखंड.

वेखंड आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. जर लहान मुलांना पोट दुखत असेल त्यांना झोप लागत नसेल तर अशा वेळीदेखील वेखंडाचा उपयोग केला जातो परंतु आपल्या चेहऱ्याच्या उपयोगासाठी व त्वचा चमकवण्यासाठी चेहऱ्यावरील मृतपेशी दूर करण्यासाठी वेखंड उपयुक्त ठरते, हे अनेकांना माहिती नसते. त्यानंतर तिसरा पदार्थ लागणार आहे गुलाबजल. गुलाबजल मध्ये अनेक असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेवरील विषारी घटक दूर करतात.

हे वाचा:   कोलगेटच्या अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी नाही सांगणार.! फक्त दातच नाही तर असाही होऊ शकतो कोलगेटचा वापर.!

जर आपली त्वचा निर्जीव झाली असेल तर त्वचेला टवटवीत बनवण्याचे कार्य गुलाबजल करते, आता आपल्याला सान वर वेखंड ची काडी उगाळून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे सान नसेल तर अशा वेळी स्वच्छ दगडावर तुम्ही वेखंड ची काडी उगाळू शकता त्यानंतर आपल्याला ओली हळद उगळायची आहे.हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव करून काही थेंब गुलाबजल चे टाकायचे आहे अशा प्रकारे आपली पेस्ट तयार होईल.

आता आपल्याला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहेत आणि आपल्या चेहऱ्यावर ही पेस्ट लावायची आहे, असे केल्याने काही दिवसातच तुमच्या त्वचेवरील जे काही मृतपेशी आहेत त्या दूर होऊन जातील आणि घरच्या घरी तुमचा चेहरा टवटवीत दिसू लागेल. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्याला कोणत्याच प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि नैसर्गिक रित्या आपल्या त्वचेची काळजी घ्या.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.