आज आम्ही तुम्हाला मयूर शिखा या वनस्पती बद्दल आयुर्वेदिक माहिती देणार आहोत. या वनस्पतीचे संस्कृत नाव रुद्र जटा, हिंदी नाव मुर्ग केश, लाल मुर्गा, जटाधारी, गुजराती मध्ये मोर शिखा अशी अनेक नावे आहेत. संपूर्ण भारतामध्ये हे झाड सजावटीसाठी घराच्या बाहेर तसेच बगीच्यामध्ये लावले जाते. याची फुले अत्यंत सुंदर आणि आकर्षक असतात.
जे कोंबड्याच्या तुर्या सारखे दिसतात. म्हणूनच याला मुर्ग केश व लाल तुरा म्हणतात. याची फुले पिवळी, गुलाबी, वांगी, अथवा लाल रंगाची, मखमली आणि चपटी असतात. बिया कृष्णवर्ण चपट्या आणि मऊ छोट्या असतात. रुद्रजटा मधुर, तुरट, अम्ल, कटु, शीत, लघु आणि पित्तशामक असतात. ही वनस्पती श्वास, हृदय, मूत्र विकारामध्ये अत्यंत फायदेशीर असते.
याची फुले नाकातून होणारा रक्तस्राव, मूत्ररक्त
स्त्राव, अतिसार, रक्तार्श, गर्भाशयातील रक्तस्राव, श्वेत पदर तसेच महिलांच्या मासिक तक्रारी यात वापरले जाते. याच्या बिया मूत्ररोग, डोळ्यांची समस्या, यामध्ये फायदेशीर ठरतात. खोकला आला असता 500mg रुद्र जटा बीज चूर्ण मधामध्ये मिक्स खाल्ल्याने खोकला मध्ये आराम मिळतो.
2-3ग्रॅम पानांची पेस्ट बनवून पाण्यासोबत पिल्याने श्वसन रोगात लाभ होतो. रुद्र जटा पेस्टमध्ये अर्जुन साल मिसळून पाण्यासोबत पिल्याने हृदयविकारात लाभ होतो. याच्या फुलांची पेस्ट बनवून 10-15 मिली प्रमाणात पाण्यासोबत घेतल्याने अतिसारामध्ये फायदा होतो. या वनस्पतीच्या बियांची पेस्ट 10-15मिली पाण्यासोबत पिल्याने मूत्र विकारांमध्ये लांब होतो.
तसेच यकृत स्वस्थ राहते. मुतखड्या मध्ये 500ग्रॅम मुळं चूर्ण हे तांदूळ धुतलेले पाणी सोबत पिल्याने काही दिवसातच मुतखडा गळून पडतो. यामध्ये पथ्य रूपात दुग्ध सेवन केले पाहिजे. रुद्रजटा चे एक ग्राम चूर्ण पाच ग्राम खडीसाखर मिक्स करून दुधासोबत घेतल्याने कामशक्ती वाढते. 2-3मिली पानाचा रस, खडीसाखर आणि पाणी मिसळून सरबत बनवून पिल्याने अति रक्तस्राव आणि रक्तपदर मध्ये लाभ होतो.
प्रमाण : चूर्ण 500mg-1ग्रॅम, फुलं /बीज पेस्ट 10-15ml किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार. आशा आहे तुम्हाला दिलेली अनोखी माहिती आवडली असेल. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. ही माहिती तुमच्या आवडत्या व्यक्ती सोबत नक्की शेअर करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.