तुमची केस गळत असेल, केसांमध्ये रुक्ष पणा आलेला असेल, केस पातळ झालेले असतील, केसांमध्ये कोंडा झालेला असेल,केसांमध्ये जीवा लिखा झाल्या असतील तर या सर्व कारणांमुळे देखील आपले केस गळू लागतात परंतु आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही काही दिवस केला तर तुमच्या केसांचे आरोग्य सुधारणार आहे, तसेच केस गळती देखील थांबणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण जी काही वनस्पती वापरणार आहोत, ती वनस्पती अत्यंत लाभदायक मानली गेलेले आहे.
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तर या वनस्पतीला अमृत समान मानले गेलेले आहेत.या वनस्पतीच्या उपयोगाने आपल्या शरीरातील हजारो समस्या दूर होतात तसेच तुमचे शरीर निरोगी करण्याचे कार्य ही वनस्पती करते. या वनस्पतीचे नाव आहे कडुलिंब. कडुलिंब आपल्या सर्वांना माहिती आहे. या वनस्पतीचे पान, फुल, खोड, साल सारे अंग मानवी शरीरासाठी लाभदायक मानले गेले आहे. जर आपण नियमितपणे सकाळी उपाशीपोटी एक ते दोन पान कडुलिंबाचे पान सेवन केले तर आपले पोट वेळेवर स्वच्छ होते तसेच पोटामध्ये जमा असलेले विषारी घटक देखील लवकरच बाहेर पडतात.
जर तुम्ही कडुलिंबाच्या पानाचा रस बनवून आपल्या चेहऱ्यावर लावला तर तुमची त्वचा उजळून जाते त्याचबरोबर त्वचेवर असलेले काळे डाग, वांग, पिंपल्स सगळे निघून जातात. त्वचेवरील समस्या दूर होतात. कडुलिंबाचे पान अँटीबॅक्टरियल,अँटी फंगल व अँटिसेप्टिक मानले जाते आणि म्हणूनच जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झाला असेल तर हा त्वचा विकार देखील कडुलिंबाच्या पानांमुळे लवकरच दूर होतो.
कडुलिंबाच्या पानाचे इतके फायदे आहेत की, तुम्ही विचार देखील करणार नाहीत. याच कडुलिंबाचा आपल्याला केसांच्या आरोग्यासाठी देखील उपयोग करायचा आहे. आपल्यापैकी अनेकांच्या केसांच्या मुळाशी इन्फेक्शन झालेले असते,कोंडा झालेला असतो आणि यामुळे आपल्या केसांचे मूळ कमकुवत बनते. परिणामी काही दिवसानंतर केस गळती सुरू होते. अनेकांना तर टक्कल देखील पडते. जर तुमच्या बाबतीत देखील या सगळ्या समस्या घडत असतील तर आजच्या आज कडुलिंबाचा वापर करायला सुरुवात करा.
कडुलिंबाच्या पानाचा उपयोग केल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आपल्या केसांची गळती थांबवण्यासाठी व आपल्या केसांना मजबुती देण्यासाठी आज जो आपण उपाय करणार आहोत,त्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पाने लागणार आहेत. हे कडुलिंबाची पाने आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचे आहे जेणेकरून त्याची पेस्ट बनवता येईल त्याचबरोबर ही पाने आपल्याला एका वाटीमध्ये आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत.
यांच्यावर कोणताही प्रकारची धूळ जमा झाली असेल तर पूर्णपणे निघून जाईल. यानंतर आपल्याला कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कोरफड. कोरफड ही आपल्याकडे सहजरित्या उपलब्ध होते. कोरफडच्या अंगी आणि औषधी गुणधर्म असतात तसेच आपल्या केसांच्या मुळाशी कोणतेही इन्फेक्शन झाले असेल किंवा केस गळत असतील तर त्या सगळ्या समस्या दूर करण्याचे कार्य कोरफड करते म्हणून आपल्याला एक ते दोन फांदी कोरफड घ्यायची आहे.
कोरफडच्या आजूबाजूचे काटेरी जे भाग असतात, ते कापून घ्यायचे आहे आणि पिवळा तर आपल्याला थोडासा निघेपर्यंत तशीच फांदी ठेवायची आहे. पिवळसर थर चा उपयोग आपल्याला करायचा नाही. हा पिवळा थर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी घातक मानला जातो त्यानंतर कोरफडचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे. आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे, त्या कढईमध्ये खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे.
हे दोन्ही तेल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक मानले जातात. जर तुमचे केस गळत असेल, केसांची वाढ जर होत नसेल तर अशावेळी या दोन्ही तेलांच्या मदतीने तुमची केसांची वाढ सहजरीत्या होऊ शकते. आजचा उपाय करण्यासाठी आपण येथे मोहरीचे तेल वापरणार आहे त्यामुळे आपल्याला कापलेले कोरफड चे तुकडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर कडूलिंबाची पेस्ट टाकायची आहे. हे मिश्रण एकजीव करायचे आहे आणि व्यवस्थित उकळू द्यायचे आहे.
जोपर्यंत या दोन्ही पदार्थांचे अर्क तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर गाळणीच्या साह्याने आपल्याला हे तेल गाळून घ्यायचे आहे, अशा प्रकारे हे तेल तुम्ही एका बॉटलमध्ये सहजरित्या भरून ठेवू शकता. हे तेल रात्री झोपताना केसांच्या मुळाशी आपल्यालाही तेल लावायचे आहे. जर आपण आठवड्यावर हे तेल लावले तर तुम्हाला फरक जाणून येईल. तुमच्या केसांची गळती लवकर थांबेल.
एकही केस कंगव्यामध्ये दिसणार नाही. केसांची लांबी वाढणार आहे. केस मजबूत बनणार आहे. केसांमधील कोंडा देखील त्वरित निघून जाणार आहे आणि म्हणूनच रासायनिक पदार्थांचा वापर करण्याऐवजी घरगुती पद्धतीने बनवलेले तेल अवश्य आपल्या केसांना लावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.