जिमला जाणाऱ्या मुलांनी एकदा नक्की वाचा.! प्रोटीनचा खरा खजाना कशाला म्हटले जाते.? आज दूर होईल सर्वात मोठा गैरसमज.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या बऱ्याच जणांचे अनेक गैरसमज असतात परंतु कालांतराने ते दूर केले जात असतात. बऱ्याच जणांचा असा विचार असतो कि फक्त जिम जाणाऱ्या लोकांनाच प्रोटीन्स ची आवश्यकता असते. तुम्ही पण असा विचार करत असाल तर हा तुमचा एक मोठा गैरसमज आहे. जस आपल्या शरीराला खाणंपिण्याची गरज असते तसेच प्रोटीन्स ची पण गरज असते. मग आपण कसरत करत असू किंवा नसू. प्रोटीन्स फक्त आपली तब्येतच चांगली करत नाही तर आपल्या त्वचा आणि केसांना पण सुदंर बनवते.

पण आता प्रश्न हा येतो कि अशा कोणत्या गोष्टी खाव्यात ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटीन्स मिळेल. चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला याबद्दलच विस्तृत माहिती शेयर करणार आहोत. प्रोटीन्स चा सगळ्यात महत्वाचा स्रोत बद्दल बोलायचं झालं तर नाव येते पनीर चे! कच्च पनीर प्रोटीन्सचा खूप चांगला स्रोत असतो. कदाचित म्हणूनच भारतातील अनेक पहिलवान जिम मधून बाहेर पडले कि पहिले पनीर खातात.

कारण याचे दोन फायदे असतात एक तर त्यांच्या शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण होते आणि दुसरा फायदा म्हणजे त्यांच्या पैशांची बचत होते. कारण हा प्रोटीन्स चा चांगला आणि स्वस्त स्रोत आहे. १०० ग्रॅम प्रोटीन्स चे सेवन केले तर शरीरात १८ ग्रॅम प्रोटीन्स जात. जे तुमच्या दैनंदिन गरज भागवण्यासाठी पुरेसे आहे. यात २० ग्रॅम फॅट्स देखील असते. फॅट्स खायचे नसल्यास तुम्ही लो फॅट्स दुधाने बनवलेले पनीर चे सेवन करा. ज्यामुळे तुम्हाला प्रोटीन्स जास्त मिळून फॅट्स नसल्यात जमा असतील.

हे वाचा:   सलग तीस दिवस उकडलेले अंडी खाल्ल्याने काय झाले हे तुम्हीच बघा.! उकडलेले अंडी खाणारे एकदा नक्की वाचा.!

प्रोटीन्स चा पुढचा स्रोत दुसरं काही नसून अंड आहे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, हे तुम्ही ऐकलेच असेल. कारण अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असते. परंतु लक्षात घ्या, अंड्यातील सफेद भागात खूप सारे प्रोटीन्स असतात पण यातील पिवळा बलक असतो यात फॅट्स असतात. जर तुम्हाला प्रथिनांची गरज पूर्ण करायची आहे पण फॅट्स पासून दूर राहायचे आहे तर अंडी उकडून त्याचा सफेद भाग सेवन करा.

कारण यामध्ये प्रोटीन्स सोडून जरा पण फॅट्स नसतात. एका अंड्याच्या सफेद भागात ४ ग्रॅम प्रोटीन्स असते. आता क्रमांक येतो तो कडधान्या चा. भारतातील बरेच जण जिम जाऊ लागले कि कडधान्यातील चने, छोले, मूग, राजमा, चवळी, मका इत्यादी त्यांच्या आहारातील प्रमुख घटक बनतात. यात भरपूर प्रोटीन्स असतात. १०० ग्रॅम कडधान्यात १५ ग्रॅम प्रोटीन्स असतात.

यासोबतच ४० ग्रॅम कारबोहायड्रेट देखील मिळते. मांसाहारात चिकन प्रोटीन्स चा उत्तम स्रोत आहे. चिकन ब्रेस्ट हा भाग प्रोटीन्स साठी उत्तम मानला जातो. १०० ग्रॅम चिकन ब्रेस्ट मध्ये २५ ग्रॅम प्रोटीन्स असतात. ज्यामुळे स्नायू ताकदवान तर होतातच पण फॅट्स सुद्धा घटतात. डाळी… अनेक प्रकारच्या डाळी बाजरात उपलब्ध आहेत. त्यातून भरगोस प्रथिनं आपल्याला मिळतात. कोणत्या एका अशा डाळीने प्रोटीन्स ची कमतरता भरून निघत नाही.

हे वाचा:   सकाळ संध्याकाळ लसणाच्या फक्त दोन पाकळ्या खाल्या..!आणि शरीरात झाले असे काही बदल जे वाचताच तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.! गुडघे सांधेदुखी तर गायबच समजा.!

म्हणूनच तज्ञ सांगतात मिक्स डाळी खाल्ल्या पाहिजेत. मिक्स डाळी पूर्ण प्रोटीन्स चा स्रोत बनतात. एका वेळेस १०० ग्रॅम डाळीचे सेवन केले पाहिजे. यामुळे आपल्याला १८ ग्रॅम प्रोटीन्स मिळते. मासे.. माशांना प्रोटीन्स चा मुख्य स्रोत मानले जाते. एका सर्व्हेनुसार एका माणसाला एका आठवड्यातून कमीतकमी दोन वेळेस मासे खाल्ले पाहिजेत. यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रोटीन्स तर मिळतातच याशिवाय यात असणारे कॅल्शियम, फॉसफरस देखील अनेक प्रकारे आपल्या शरीराला फायदे देतात.

१०० मशांत २५ ग्रॅम प्रोटीन्स असते. सफेद रंगाचा मासा जास्त फायदेशीर ठरतो कारण यात फॅट्स नसतात. शेंगदाणे.. अनेक खेळाडू शरीरात प्रोटीन्स मिळवण्यासाठी पिनट्स बटर च्या माध्यमातून शेंगदाणे खातात. शरीरातील प्रोटीन्स ची गरज भागवण्यासाठी कमीतकमी ३० ग्रॅम दाणे खाल्ले पाहिजेत. कारण यात ७ ग्रॅम प्रोटीन्स असते.

सोयाबीन.. हे स्वस्त आणि मस्त भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असलेला स्रोत आहे. हे खाल्याने तुमचे वजन देखील नियंत्रणात राहते. ५० ग्रॅम सोयाचंक्स खाल्याने २५ ग्रॅम प्रोटीन्स मिळतील. हे आपल्या हृदयाला देखील निरोगी ठेवते. स्तनांचा कर्करोग यासारखी समस्या दूर ठेवतो. हे होते काही स्रोत ज्यांचे सेवन तुम्ही सहज करू शकता. जास्त महागही नाहीत.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.