आपल्यापैकी अनेकांच्या घरांमध्ये एक व्यक्ती तरी अशी असेल ज्यांना गुडघ्यांचे दुखणे असेल, खूप वेळेपासून हे दुखणे कायमचे तसेच असेल आणि काही केल्या ते बरे होत नसेल तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी आहे. आज आपण एक असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे कितीही जुने गुडघ्याचे दुखणे या घरगुती उपायांमुळे बरे होणार आहे.
गुडघ्याच्या दुखण्यावर आपण अनेक उपाय करतो जसे की डॉक्टर जवळ जाणे, इंजेक्शन घेणे भरपूर औषधे घेणे अशा प्रकारचा अनेक खर्च आपण करत असतो थेरेपी घेणे आणि या सर्वांमध्ये आपले अनेक पैसे खर्च होतात त्यामुळे आज आपण असा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत उपाय बनविण्यासाठी आपल्याला घरातील काही छोट्या-मोठ्या सामग्री लागणार आहेत.
चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला येथे घ्यायचा आहे ते म्हणजे खोबरे. इथे आपल्याला सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे.त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी, कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरे तेलाचा उपयोग होतो. खोबऱ्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे संधिवाताच्या समस्या टाळण्यासाठी याचा उपयोग होतो.
सुके खोबरे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. ते रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला व्हायरल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते. र’क्तप्रवाह चांगला राहतो.सुक्या खोबऱ्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो. नारळात फिनोलिक संयुगे असतात, जी अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. त्यामुळे आपल्याला या खोबराचे पाच ते सहा तुकडे दररोज सकाळी दुधामध्ये टाकून ते दूध प्यायचे आहे.
जर तुम्हाला सकाळी पिलेले दूध पचायला कठीण जात असेल तर हे दूध तुम्ही रात्री देखील पिऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर गुडघेदुखी सारखा त्रास बरा होण्यास मदत होते. दुसऱ्या उपायासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहेत ते म्हणजे खजूर इथे आपल्याला सूख्या खजूर चा वापर करायचा आहे. खजूर खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.
खजुरात असणाऱ्या अँटी-ऑक्सिडंटमुळे डायबेटीस, अल्झायमर डिसीज आणि विविध प्रकारचे कँसर होण्याचा धोका कमी होतो. सोबतच आपली हाडे मजबूत राहण्यासाठी देखील खजूरचा वापर केला पाहिजे. तर रात्री आपल्याला पाच ते सहा सुखे खजुर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर त्यांचे सेवन करायचे आहे.
जर तुम्हाला हवे असेल तर यांचे सेवन दुधातून देखील करू शकता दुधातून करायचे नसेल तर असेच देखील हे खजूर खाऊ शकता पण दररोज सकाळी उठून भिजलेले खजूर खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. व त्यामुळे लवकरात लवकर आपली गुडघेदुखी बरी होण्यास मदत होते. त्यानंतरचा उपाय बनविण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे ते म्हणजे मखाने. मखाना मध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात.
मखाना आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि उपयोगी असतो.सकाळी रिकाम्या पोटी मखना खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल, फॅट आणि सोडियमचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि हाडे मजबूत होतात याशिवाय रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी ४-५ माखणे खाल्ले तर शरीराला खूप फायदा होतो.
मखणामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे हृदयासाठी फायदेशीर मानले जातात.हृदयाच्या समस्यांमध्ये, जर तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये मखणा खात असाल तर ते फायदेशीर आहे.त्यामुळे बीपीही नियंत्रणात राहतो. अशाप्रकारे मखाने आपल्या शरीराला फायदेशीर असतात त्यामुळे आपल्याला एक वाटी मखाने घ्यायचे आहेत.
त्यानंतर एक तवा किंवा पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून हलक्या आचेवर हे मखाने आपल्याला हळुवार भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेले चणे टाकायचे आहेत. भाजलेले चणे देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. मुख्यतः आपल्या हाडांसाठी आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. त्यामुळे यामध्ये चण्यांचा वापर करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला सुटलेला कडीपत्ता देखील यामध्ये टाकायचा आहे सुकलेला कढीपत्ता देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो त्यामध्ये असे औषधी गुणधर्म असतात जी आपल्या हाडांना अधिक मजबूत करण्यास मदत करतात. जर तुम्हाला हवे असेल तर आपण प्रथम घेतलेले थोडेसे सुके खोबरे देखील यामध्ये टाकू शकतो आता या सर्व गोष्टींना आपल्याला एकत्रितपणे थोडेसे भाजून घ्यायचे आहे.
या सर्व गोष्टींचे सेवन आपल्याला दररोज सकाळी एक चमचा असे करायचे आहे हे केल्यामुळे एका आठवड्यामध्ये तुमच्या हाडांचे दुखणे मध्ये फरक जाणून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.