प्रत्येक व्यक्तीला आपले आरोग्य चांगले रहावे असे वाटत असते. प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करून बघत असतो. यासाठी आपण आरोग्यदायी असे वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेत असतो. तसेच असे काही उपाय सांगितले जातात यांचे देखील आपण पालन करून आरोग्याला निरोगी ठेवण्याचे काम करत असतो.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत. एक असे पाणी जे तुम्ही सकाळच्या वेळी करून प्यायला तर यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. हे पाणी बनवण्यासाठी आपल्याला एका फळाची आवश्यकता भासणार आहे. हे फळ म्हणजे आवळा. आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.
तुम्हाला हे माहिती नसेल परंतु आवळ्याला सुपरफुड देखील म्हटले जाते. आवळ्या मध्ये विटामिन सी आणि अन्य पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या मुळापासून नष्ट होत असतात. आवळ्याला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते. अनेक आळ्याची चटणी बनवून खातात तर काही लोक मुरांबा, लोणचे, ज्यूस देखील बनवून खातात.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आवळा पाणी पिल्यानंतर आपल्या शरीराला किती जबरदस्त फायदे होत असतात याबाबत माहिती सांगणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम आवळा पाणी बनवण्याची विधी पाहूया. सर्वप्रथम बाजारामधून काही हिरवेगार आवळे विकत आणावे. या आवळ्यांना सर्वप्रथम चांगल्या प्रकारे धुऊन घ्यावे. त्यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करुन घ्यावे.
या तुकड्यांना काही दिवसांकरिता उन्हामध्ये वाळवू घालावे. हे चांगल्या प्रकारे वाळल्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने याची पावडर बनवून घ्यावी. आता आवळा पाणी बनवण्यासाठी लागणारे घरगुती आवळा पावडर तयार आहे. सकाळच्या वेळी काहीही न खाता म्हणजे रिकाम्या पोटी ही पावडर ग्लासभर पाण्यामध्ये चमचा भर टाकावी. त्यानंतर याला चांगल्या प्रकारे एकत्र करून हे पाणी प्यावे.
हे अशा प्रकारचे आवळापाणी पिल्यामुळे, शरीरामध्ये जमा झालेली चरबी कमी होत असते. वजन कमी करण्यासाठी देखील याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. आवळ्यामध्ये क्रोमियम देखील चांगल्या प्रमाणात असते. यामुळे ब्लड शुगर चा स्तर देखील नियंत्रणात येत असतो. डायबिटीज असणाऱ्या रुग्णांसाठी देखील हे पाणी पिणे अतिशय योग्य आहे.
यामुळे अशा प्रकारचे अनेक फायदे होत असतात. याबरोबरच यामुळे त्वचा देखील हेल्दी राहण्यास मदत होत असते. पचन संस्था देखील यामुळे सुधारली जाते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.