पोटावरची चरबी भरभर आतमध्ये जाईल.! लठ्ठपणाला कंटाळलेल्या लोकांसाठी अतिशय सोपा उपाय.! वाढलेली चरबी विरघळून जाईल.!

आरोग्य

आजकाल पोटाची चरबी वाढणे ही एक मोठी समस्या आपल्या समोर निर्माण झालेली आहे आणि ही अतिरीक्त चरबी कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पोटाची चरबी वाढण्याची कारणे अनेक आहेत. हार्मोनल बदलांमुळे शरीरातील चरबी एकाठिकाणी साठू न देण्यात हार्मोन्सची मोठी भूमिका असते. हार्मोनल असंतुलनामुळे भूक वाढू शकते, चयापचय क्रिया मंद होऊ शकते आणि तणावाची पातळी वाढू शकते, ज्यामुळे पोटावर चरबी जमा होऊ शकते.

तसेच एकदा का शरीरावर जमा झालेली चरबी चयापचय मुळे इतकी वाढते की चरबी कमी करणे अनेकदा आपल्यासाठी कठीण होते त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला आपल्या पोटाची चरबी घरबसल्या कमी करण्यास मदत होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोणती एक सामग्री लागणार आहे.

हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मेथी. मेथीचा आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मेथीचे दाणे हे अनेक प्रकारच्या अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात म्हणूनच ते वैकल्पिक म्हणजेच पर्यायी औषधांमध्ये देखील याचा वापर केला जातो. मेथीच्या दाण्यांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. हृदयरोगांपासून संरक्षण होते त्यामुळे मेथी आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर घटक आहे.

हे वाचा:   काळी पडलेली मान दोनच मिनिटात होईल गोरीपान.! वर्षानुवर्ष साचलेला मानेचा काळा थर दोन मिनिटात जाईल.! त्यासाठी आंघोळीपूर्वी फक्त करायचे हे एक सोपे काम.!

मेथीचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत जसे चेहऱ्यावर जर सुरकुत्या आल्या असतील तर मेथीचे पाणी प्यायल्याने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावल्याने आपल्या केसांमधील कोंडा कमी होतो त्याचप्रमाणे आपले केस देखील वाढू लागतात. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते.

त्याचबरोबर संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होते. तेवढेच फायदेशीर मेथी आपल्या पोटासाठी देखील असते पोटाची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला मेथीचा वापर होणार आहे. आता आपण जाणून घेऊया मेथीचा वापर आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि पूर्ण रात्रभर हे पाणी असेच त्या ग्लास मध्ये झाकून ठेवायचे आहे जेणेकरून मेथी मध्ये असणारे सर्व औषधी गुणधर्म या पाण्यामध्ये येतील आणि असे झाल्यावर आपण या पाण्याचा वापर सहज रित्या करू शकतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पाणी एका दुसऱ्या ग्लासमध्ये गाळून घ्यायचे आहे जेणेकरून मेथी दाणे आणि पाणी वेगळे होईल. सकाळी तुम्हाला हे पाणी पिवळे झालेले दिसून येईल म्हणजेच यामध्ये मेथीचे सर्व गुणधर्म आलेले असतील. त्याचबरोबर हे पाणी पिण्या अगोदर आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे म्हणजेच कोमट पाणी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी प्यायचे आहे, जेणेकरून हे पाणी आपल्या शरीराला तेवढे फायदेशीर राहील.

हे वाचा:   स्वतः चे पिवळे दात आता दुसऱ्यांना दाखवणे बंद करा.! मोत्या सारखे दात चमकवायचे असतील तर हा आहे सोपा उपाय.!

सकाळी उपाशीपोटी या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. हे पाणी प्यायल्यामुळे चरबी तर कमी होईलच पण सोबतच हृ’दय’वि’काराचे धोके देखील कळतील म्हणजेच हृदयासंदर्भातील जेवढे आजार आहे तेवढे देखील दूर होण्यास मदत होईल. पाणी पिऊन झाल्यानंतर जी मेथी आपण वेगळी करून घेतली होती, ती मेथी देखील आपल्याला चावून चावून खायची आहे म्हणजे हा उपाय अधिक फायदेशीर ठरेल सोबतच महिलांनी हा उपाय केल्यामुळे मा’सि’क पा’ळी वेळेवर येण्यास देखील मदत होईल आणि वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.

हा औषधी उपाय आपल्याला दररोज करायचा आहे यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही किंवा हा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी देखील होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.