दररोज चुकीच्या पद्धतीने झोपत असाल तर तुम्ही व्हाल आजाराची चालती फिरती फॅक्टरी.! आजारांना निमंत्रण देऊ नका, योग्य कसे झोपावे आजच जाणून घ्या.!

आरोग्य

आज आपण आपल्या जीवनशैली मधल्या तीन गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. त्या तीन गोष्टी अशा आहेत की पहिलं आपली झोपायची स्थिती ही कशाप्रकारे असावी? दुसरा लवकर झोप येण्यासाठी काय करावे? तिसरा म्हणजे किती वेळ माणसांनी झोपले पाहिजे? हे पाहणार आहोत. चला तर मग आता पण या तीन गोष्टींचा अभ्यास जाणून घेऊया. त्यातलं सर्वात पहिल झोपायची स्थिती कशी असावी. झोपेचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, मानली जाते.

परंतु झोपेची प्रत्येक स्थिती ही योग्यच आहे असे नाही कारण अनेक झोपायच्या स्थितीमुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या येऊ शकतात. जसे की उजव्या कडावर झोपल्याने आपल्या शरीराला घातक ठरू शकते. कारण उजव्या कडावर झोपल्यास आपल्या पोटातले ऍसिड हे छातीपर्यंत तर सहज पोचले जाते त्यामुळे आपली छाती ही जळजळ करायला लागते आणि हृदयविकार सारखे झटके हे येण्यास मदत होते.

उजव्या कड्यावर झोपल्यास जेवण न जिरल्याने ॲसिडिटीचा त्रास देखील व्हायला सुरुवात होते. डाव्या कड्यावर झोपल्याने आपल्या पोटातले ॲसिड हे छातीपर्यंत वर पोहोचू शकत नाही त्यामुळे अनेक समस्या टाळल्या जातात. त्यामुळे डाव्या कड्यावर झोपणे हे आपल्या शरीराला चांगले ठरू शकते. एका कडेवर गुडघे हनुवटीला टेकवून किंवा पोटाजवळ घेऊन झोपणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे मान व पाठीचे दुखणे सुरू होते.

यामुळे मान व पाठ दुखायला लागते. याशिवाय छातीवरही विपरीत परिणाम होतो. जास्त थंडी वाजल्याने लोक या पद्धतीमध्ये झोपताना आढळतात. हात-पाय पसरून झोपणंही आरोग्यासाठी चांगलं असते. यामुळे आपण स्ट्रेस आणि मसल्स पेन पासून दूर राहतो. पाठीवर झोपणे ही सर्वात योग्य आणि शरीराला फायदेशीर अशी झोपण्याची पद्धत आहे.आपले सर्व अवयवही शांत झालेले असतात. अशा वेळी पाठीवर झोपल्याने आपल्या अवयवांवरही कोणताही भर पडत नाही.

हे वाचा:   म्हातारपण आरामात घालवायचे असेल तर हे एक काम कराच.! गुडघेदुखी, हात-पाय, टाचा आणि कंबर दुखी कधीच होणार नाही.!

त्यांची संपूर्ण रात्रभर आपल्या अवयवांची कार्येही अगदी सुरळीतपणे सुरु असतात.तसेच आपल्याला मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखीचा त्रास होत नाही.पोटावर झोपणे ही शरीरासाठी अत्यंत घातक पद्धत आहेत. या स्थितीत आपले मान, पाठीचे हाड योग्य स्थितीत नसते. ज्यामुळे आपल्याला मानदुखी, पाठदुखी आणि परिणामी डोकेदुखीचा त्रास उद्भवतो.
तर आता आपण भव्य शांत झोप येण्यासाठी काय करावे. शांत झोप येण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला शरीरातला दोन हार्मोन्सची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

त्यातला पहिला हार्मोन्स म्हणजे मेलोटोनियन. मेलोटोनियनला शांत झोपेचे हार्मोन्स देखील म्हटले जाते. जेव्हा आपल्या शरीरात अधिक प्रमाणत मेलोटोनियन हार्मोन्स असतात तेव्हा आपल्याला शांत झोप येते. दुसरा म्हणजे हॉर्मोन्स कोर्टीसुल. कोर्टीसुल हार्मोन्स ला ताण तणाव हार्मोन्स देखील म्हटले जाते. जेव्हा आपल्या शरीरात कोर्टीसुल हार्मोन्स जास्त असतात तेव्हा आपल्या शरीरात जास्त ताण तणाव निर्माण झालेला असतो त्यामुळे आपल्याल शांत झोप येत नाही.

म्हणजेच रात्री झोपायच्या वेळेस आपल्या शरीरात मेलोटोनियन हार्मोन्सची पातळी जास्त प्रमाणात असणे गरजेचे आहे आणि कोर्टीसुल हार्मोन्सची पातळी कमी असणे गरजेचे आहे. ज्यांच्या शरीरात रात्रीच्या वेळेस मेलोटोनियन हार्मोन्सची कमतरता असते, त्यावेळेस डॉक्टर त्यांना मेलोटोनियन हार्मोन्सच्या गोळ्या देतात जेणेकरून त्यांना शांत झोप येण्यास मदत व्हावी. परंतु आपल्याला नैसर्गिक पद्धतीने झोप येण्यासाठी दोन गोष्टी करणे गरजेचे आहे.

हे वाचा:   हा उपाय केला आणि केस वाढतच गेले.! केसांच्या आरोग्यासाठी हा उपाय केला नाही म्हणजे खूप मोठी चुकी.! एकदा नक्की वाचा.!

सर्वात पहिला रात्रीच्या वेळेस काळोख करून झोपणे गरजेचे आहे दुसर म्हणजे झोपायची वेळ ही एकच ठेवणे गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही रोज दहा वाजता रात्री झोपत असाल तर त्याच वेळेस रोज झोपणे गरजेचे आहे. आता आपण पाहू या रोज किती वेळ झोपले पाहिजे. जन्मलेले लहान पोरं असतात त्यांनी 14 ते 17 तास तरी झोपले पाहिजे. एक ते दोन वर्षाच्या मुलांना अकरा ते बारा तास तरी झोपले पाहिजे. तीन ते पाच वर्षाच्या मुलांनी दहा तास तरी झोपले पाहिजे.

सहा ते दहा वर्षाच्या मुलांनी नऊ तास तरी झोपले पाहिजे. 14 ते 17 वर्षाच्या मुलांनी आठ ते दहा तास झोपले पाहिजे आणि तरुण माणसांनी सात ते नऊ तास तरी झोपले पाहिजे. तरी ह्या लेखामध्ये आपण तीन गोष्टींचा अभ्यास केला आहे. तर या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला आवडला असेल तर इतरांना हा लेख नक्कीच शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.