स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या कारल्याचा कडूपणा जाणार म्हणजे जाणार.! आता लहान मुले पण आवडीने खातील कारले.! कारले बनवताना फक्त हे एक छोटेसे काम करा.!

आरोग्य

दररोज जेवणामध्ये काहीतरी वेगळे व चमचमीत खाण्याची इच्छा आपल्याला दररोज होत असते पण रोजच्या रोज काहीतरी वेगळे बनवून खाणे आपल्याला शक्य नसते म्हणून जर रोजच्या जीवनामध्ये आपण कोणता तरी एक वेगळा प्रकार तयार करून खाल्ला तर तो चवीला अजून जास्त चांगला लागतो. जर आपल्याला कोणी सांगितले की आपल्याला न आवडणारी भाजी देखील चमचमीत चवदार लागू शकते तर आपल्याला यावर विश्वास बसणार नाही.

हो,अशीच एक भाजी आज आपण वेगळ्या पद्धतीने कशी करायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. ती भाजी म्हणजे कारल्याची भाजी किंवा याला आपण कारल्याचे फ्राय देखील बोलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया ही कारल्याची भाजी किंवा कारल्याची फ्राय बनवायची नवीन पद्धत नेमकी आहे तरी कशी. सर्वप्रथम आपल्याला कारल्याला हवे तसे कापून घ्यायचे आहे.

जर गोलाकार कापायचे आहे तर त्या पद्धतीने देखील आपण कारले कापू शकतो. जर कारले उभे कापायचे असेल तर त्या पद्धतीने देखील आपण कापू शकतो, जसे आपल्याला हवे आहे त्या प्रकारे आपण कारले कापून घ्यायचे आहे आणि याला एक चमचा मीठ लावून थोड्या वेळासाठी तसेच झाकून ठेवायचे आहे. पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवल्यानंतर कारल्याला थोडेसे पाणी सुटलेले असेल त्यानंतर कारले घट्ट पळून घ्यायचे आहे.

हे वाचा:   जगातील सर्वात खतरनाक किडे, यापासून दूर रहा नाहीतर होईल असे काही.!

जेणेकरून त्यामध्ये साचलेले सर्व पाणी आणि कडवटपणा निघून जाईल. कारल्यामधील कडवटपणा पूर्णपणे निघून जाणे शक्य नाही त्यामुळे थोडासा कडवटपणा त्यातून निघून जाण्यास मदत होते म्हणून यामध्ये मिठाचा वापर करतात. कारले काप घट्ट पिळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम लाल तिखट टाकायचे आहे. या कापांमध्ये थोडेसे गरम मसाला टाकून घ्यायचे आहे.

एक चमचा जिरा पावडर, एक चमचा धना पावडर आणि चवीपुरते मीठ टाकून आपल्याला हे मिश्रण नीट मिक्स करायचे आहे. हे मिश्रण मिक्स करून झाल्यावर यामध्ये एक ते दोन चमचे बेसनाचे पीठ टाकून घ्यायचे आहे. आणि या मिश्रणाला देखील थोडा वेळ तसेच झाकून ठेवायचे आहे,जेणेकरून हे सर्व मसाले या कारल्याला व्यवस्थितपणे लागतील. तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे.

किमान चार चमचे तेल एका कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे व त्या तेलात एक चमचा जिरे, एक चमचा ओवा, एक चमचा काळे तीळ टाकून मंद आचेवर या गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत. या गोष्टी भाजल्यानंतर आपण तयार केलेले कारले या तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे आहे. गॅस मिडीयम फ्लेमवर करून म्हणजेच मंद आचेवर हे कारले शिजवून घ्यायचे आहे. पाच मिनिटे मंद आचेवर शिजवून घेतल्यानंतर यामध्ये चार मिरच्या कापून टाकायच्या आहेत.

हे वाचा:   सकाळी भिजवून ठेवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूत नेमके काय होते माहिती आहे का.? मुलांना बदाम खायला देण्याआधी हे नक्की वाचा.!

जेणेकरून कारले ला थोडासा तिखटपणा येईल. त्यानंतर भांड्यावर एखादे झाकण ठेवून थोड्या वेळासाठी परत एकदा या कारल्यांना व्यवस्थितरित्या शिजू द्यायचे आहे जेणेकरून त्यामधील स्वाद अजून वाढेल. हे कारले अजून चमचमीत तिखट आणि चवदार होतील. पाच ते दहा मिनिटांनी गॅस बंद करून आपण याचा स्वाद घेऊ शकतो. हीच कारल्याची भाजी वेगळ्या पद्धतीने तयार करून आपण घरातील लहान मुलांना देखील खाण्यास देऊ शकतो.

शक्यतो लहान मुले ही भाजी खात नाही पण आपण जर या लेखात सांगितल्या प्रमाणे कारल्याची भाजी बनवली तर त्यांना देखील ही भाजी नक्की खायला आवडेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.