लाखो रुपयांच्या औषधाला जे नाही जमले ते ह्या एका वनस्पती ने करून दाखवले.!

आरोग्य

आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या तिन्ही मूलत्तवांचे संतुलन राखले असता,तुम्हाला कोणताही रोग होत नाही. पण जेव्हा ह्यांचं संतुलन बिघडतं, तेव्हा आपल्याला आजार जडतात. म्हणूनच आयुर्वेदात ह्या तिन्ही तत्त्वांचं संतुलन राखलं जातं. यामध्ये सर्वात चांगली वनसप्ती मानली जाते ती गुळवेल. गुळवेल खाण्याचे फायदे अनेक आहेत.

कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुन्हा ताकद देण्यात गुळवेल उपयोगी ठरते. गुळवेलीचा काढा हा अत्यंत परिणामकारक आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला गुळवेल या वनस्पतीच्या फायद्या विषयी माहिती देणार आहोत. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे हे झाडाला मिठी मारून वाढते. त्यामुळे त्या झाडाचे औषधीय गुणही गुळवेलामध्ये येतात.

त्यामुळे जर कडुलिंबाच्या झाडावर गुळवेल वाढवली तर ती अत्यंत लाभदायी आहे अशी मान्यता आहे. या वनस्पतीची फळे गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. आता जाणून घेऊया या वनस्पतीच्या फायद्याविषयी. या वनस्पती मध्ये इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक आढळतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो.

हे वाचा:   जेवणानंतर रोज बडीशेप खात असाल तर नक्की वाचा.! पोटात बडीशेप चे काय होते? आरोग्यासाठी बडीशेप खाणे योग्य की अयोग्य?

10-15 दिवसांनंतरही ताप कमी होत नसेल तर त्याला क्रोनिक फिव्हर/ जुना ताप म्हणतात. यासाठी गुळवेलाची फळं आणि पानांचा वापर करून काढा बनवून त्याचे सेवन करावे. गुळवेलीच्या औषधीय गुणांमध्ये पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्याचे गुण आहेत. अनेक रोगांचे मूळ असते पोट साफ नसणे. तर गुळवेल मुळे ही समस्या दूर होते.

गुळवेलाच्या पावडरचे नियमित रिकाम्यापोटी पाण्यातून सेवन केल्यास, मधुमेह नियंत्रित राहण्यात मदत मिळते. मधुमेहावर उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये असणारे अँटिहायपरग्लायसेमिक (रक्तातील साखरेची पातळी कमी करणारा घटक) गुण आढळतात. मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचे इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुळवेलाचा वापर करता येतो.

त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल फायदेशीर ठरते. दम्याची लक्षणे कमी करण्याची प्रबळ क्षमता गुळवेलामध्ये आहे. त्यासाठी याचा रस मधासोबत मिक्स करून सेवन करावे. गुळवेलामध्ये अँटि इन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारे), अँटिअर्थरायटिक (सांध्याची सूज कमी करणारे घटक) आणि अँटिऑस्टियोपोरोटिक (सांध्याचे दुखणे आणि सूज कमी करणारे घटक) असे गुण आढळतात.

हे वाचा:   एक लिंबू उशीखाली घेऊन झोपल्याने जे होते ते ऐकून डॉक्टर देखील हैराण आहेत, 99 टक्के लोकांना या पासून होणारे फायदे माहिती नाही.!

या तिन्ही गोष्टी कमी करण्यासाठी गुळवेलाचा फायदा मिळतो. डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे अशा समस्यांसाठी तुम्ही गुळवेल पावडर रोज पाण्यातून सेवन केली तर त्यातून सुटका मिळण्यास मदत मिळते. अँटीएजिंग गुणधर्मामुळे त्वचा अधिक चमकदार राखण्यास आणि त्वचेवर सुरकुत्या न येऊ देण्यासाठी याचा उपयोग होतो.

गुळवेलचा काढा बनवण्याची पद्धत: गुळवेलाची काड्या आणून स्वच्छ धुवून घ्या. काढा करण्यासाठी 1 कप गुळवेल घेतल्यास त्याच्या 16 पट पाणी घाला. हे पावपट होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडू लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *