लिंबू पिळल्यानंतर उरलेले लिंबू फेकून देत असाल तर तुम्ही करत आहात खूप मोठी चूक.! पिळलेल्या लिंबाचा अशा भन्नाट पद्धतीने केला जाऊ शकतो उपयोग.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकजण दररोज लिंबाचा वापर करतच असतात पण वापर करून झालेल्या लिंबाच्या सालांचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसते, त्यामुळे ही साल आपण टाकून देतो. या लिंबुच्या साल चा कोणताही उपयोग आपण करत नाही पण खरं तर याचा देखील उपयोग आपण करू शकतो. त्यामुळे यापुढे आपण लिंबाचा वापर करू त्यानंतर त्याच्या सालींचा देखील योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

उन्हाळ्यामध्ये आपण लिंबाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करत असतो. बाहेर ऊन असल्यामुळे गरमीच्या दिवसांमध्ये आपल्याला थंडावा, शरीराला गारवा मिळण्यासाठी लिंबाचा वापर करणे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते आणि त्यासाठी आपण भरपूर लिंबुचा वापर देखील करत असतो. या दिवसांत लिंबु ची किंमत देखील खूप महाग झालेली असते.

भविष्यात आपण लिंबू कसे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. लिंबाचा साठा करून ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जेव्हा लिंबू स्वस्त असतात तेव्हा भरपूर लिंबू घेऊन ठेवायची आहेत आणि त्यावेळी ही लिंबे कापून त्यातून जो येणारा रस आहे त्याचा आपल्याला साठा करून ठेवायचा आहे.

हे लिंबु चे रस आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने साठवून ठेवायचे आहे. सर्वात आधी आपल्याला लिंबू स्वच्छ धुवून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे काढून घेतलेला रस बर्फाच्या ट्रे मध्ये टाकून आपल्याला लिंबाच्या रसाचे बर्फाच्या खड्यांमध्ये रूपांतर करून घ्यायचे आहे आणि एकदा का हे बर्फाचे खडे तयार झाले की त्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे.

हे वाचा:   आजपासून सोडून द्या या तीन सवयी, मरेपर्यंत एकही हाड दुखणार नाही.! हाडांना कमकुवत बनवतात त्या सवयी.!

असे केल्याने आपण लिंबाचा जो रस असतो त्याचा साठा सहजच करून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला भरपूर काळापर्यंत या बर्फाचा वापर करता येईल त्याबरोबरच आपले भरपूर पैसे देखील वाचू शकतील. हा झाला लिंबाच्या रसाचा साठा कसा करायचा याचा उपाय.आता जे लिंबू आपण कापून घेतलेले आहेत त्याच्या सालांचा वापर कसा करायचा तर त्यासाठी त्या सालांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत.

हे तुकडे करून झाल्यानंतर या तुकड्यांना दोन वेगवेगळ्या छोट्या छोट्या काचेच्या बरण्यांमध्ये भरायचे आहे. एका बरणीमध्ये काढून घेतलेला एक चमचा रस टाकायचा आहे आणि एक चमचा मीठ टाकायचे आहे.आता मिठाचा अंदाज घेऊन गरजे नुसार आपल्याला लिंबाच्या सालांवर मीठ टाकायचे आहे. जर जास्त लिंबाची साले असतील तर जास्त मिठाचा वापर करायचा आहे कमी असतील तर कमी करायचा आहे.

दुसऱ्या बरणी मधल्या सालांमध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचे आहे सोबतच दोन चमचे लोणचे मसाला, एक चमचे काळे मीठ, एक चमचा मीठ व एक चमचा साखर टाकायची आहे व मिश्रणाला मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये एक वाटीत गरम केलेले तेल टाकायचे आहे. तुम्हाला जे तेल हवे असेल ते तेल तुम्ही टाकू शकता. हे तेल टाकून झाल्यानंतर दोन्ही बरण्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि या बरण्या आपल्याला पाच ते दहा दिवसांसाठी उन्हामध्ये ठेवायचे आहे.

हे वाचा:   फक्त एक लिंबू तुमच्या चेहऱ्यावरच्या मातीला असे काढून टाकेल.! त्यासाठी लिंबाच्या अर्ध्या फाकेवर टाका हे तीन पदार्थ आणि मग लावा चेहऱ्याला.!

या दिवसांमध्ये या साली हळूहळू पातळ होऊ लागतात अश्या प्रकारे जर आपण साठवणूक केली तर आपले चवदार चमचमीत आंबट व गोड असे लोणचे तयार होते. एकदा का हे लोणचे बनवून तयार झाले की, त्यानंतर तुम्हाला हवे तसे तुम्ही हवे त्या ठिकाणी हे लोणचे स्टोअर करून ठेवू शकता आणि याचा वापर आपण करू शकता. असे केल्याने आपल्याला लिंबाच्या रसाचा देखील फायदा होतो त्यासोबतच आपल्याला त्याच्या सालींचा देखील वापर करता येतो आणि तो आपल्यासाठी फायद्याचाच असतो.

आजच्या लेखामध्ये सांगितलेल्या लिंबूच्या रसाचा व लिंबाच्या सालींचा आपण योग्य पद्धतीने उपयोग केला तर घरच्या घरी आपण वेगवेगळी रेसिपी देखील तयार करू शकतो आणि जे साल आपण फेकून देणार होतो त्याचा आगळावेगळा उपाय करून आपण आपल्या आहारामध्ये एक नवीन पदार्थ देखील समावेश करू शकतो म्हणून भविष्यात लिंबूच्या सालींचा वापर अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.