केस धुण्याची अशी पद्धत माहिती असणारे कधीही जात नाही पार्लर मध्ये.! लाखो रुपये वाचतील, केस दिसतील मोकळे आणि सुंदर.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण असे असतात ज्यांना आपल्या केसांची काळजी घ्यायला खूप आवडते किंवा आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आपण महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन दा ब्युटीपार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करत असतो. आपल्या केसांना सिल्की स्मूथ आणि शायनी बनवत असत पण त्याचबरोबर दररोज किंवा महिन्यातून दोनदा देखील पार्लरला जाणे कधी कधी आपल्याला परवडत नाही.

तेवढा वेळही आपल्याकडे नसतो, अशा वेळी काय करायचे किंवा हेअर स्पा आपण घर बसल्या कसा करायचा हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया घर बसल्या हेअर स्पा कसा करायचा आणि हा हे स्पा बनविण्यासाठी आपल्याला घरगुती कोण कोणती सामग्री लागणार आहे आणि हा बनविण्यासाठी ची प्रक्रिया काय असणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वापरायचा आहे तो म्हणजे तांदूळ.

तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात, जे केसांची वाढ सुधारण्यास उपयुक्त ठरतात. तांदळाच्या पाण्यात कर्बोदक आणि इनोसिटॉल असते. ज्यामुळे केस मजबूत होण्यास तसेच दाट होण्यास मदत होते. त्याचबरोबर केस सिल्की आणि चमकदार होण्यास देखील तांदळामुळे आपल्याला मदत होते त्यामुळे आपण येथे तांदळाचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला तांदूळ वापरायचे नसतील तर आपल्या घरी उपलब्ध असणारे तांदळाचे पीठ देखील आपण वापरू शकतो ते देखील तेवढेच फायदेशीरच ठरणार आहे.

त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला एका पाण्यामध्ये तांदळाचे पीठ टाकायचे आहे किंवा त्या जागेवर तुम्ही तांदूळ देखील टाकू शकता. त्यानंतर ते शिजण्यास गॅस वर ठेवायचे आहे मंद आचेवर हे मिश्रण शिजत ठेवायचे आहे. हे मिश्रण शिजत असताना त्यामध्ये आपल्याला एक चमचा अळशीच्या बिया टाकायच्या आहेत. फ्लेक्ससीड्सच्या म्हणजेच अळशीच्या वापराने केसांची वाढ सुधारते.

हे वाचा:   छातीत जळजळ होऊ लागली रे लागली की पटकन तोंडात टाकायची ही एक वस्तू.! जळजळ, मळमळ, पित्त, गॅस सर्व होईल एकदम ठीक.!

यामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. जवसाच्या बिया आहारात घेतल्यानं केस रेशमी आणि मुलायम होतात. त्यामुळे यामध्ये अळशी चा वापर करायचा आहे आणि या मिश्रणाला आपल्याला जवळ जवळ पाच मिनिटे शिजू द्यायचे आहे. मिश्रण शिजत असताना आपल्याला मध्ये मध्ये चमचा टाकून हे मिश्रण हलवत राहायचे आहे जेणेकरून हे मिश्रण शिजताना जाड किंवा घट्ट होऊ नये.

हे मिश्रण शिजवून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चाळण किंवा गाळण च्या मदतीने आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित रित्या गाळून घ्यायचे आहे जेणेकरून आपण टाकलेल्या अळशीच्या बिया देखील त्या मधून निघून जातील आणि आपल्याला एक क्रीम तांदळाची देखील क्रीम मिळेल. या मिश्रणाला गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचे आहे.

जर आपण थंड होण्याची वाट पाहिली तर हे मिश्रण जाड राहू शकते आणि ते घट्ट झाले की आपल्याला ते काढता येणार नाही त्यामुळे घट्ट होणे आधी गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित रित्या गाळून घ्यायचे आहे. हे मिश्रण गरम असताना गाळून घ्यायचे आहे याचा वापर गरम गरम करायचा नाही. थंड झाल्यावरच आपल्याला या मिश्रणाचा वापर आपल्या केसांवर करायचा आहे.

हे मिश्रण थंड होण्यासाठी थोडासा वेळ घेणार आहे तरीदेखील आपण व्यवस्थित थंड झाल्यावर याचा वापर करायचा आहे जर तुम्हाला लवकरात लवकर वापर करायचा असेल तर हे मिश्रण एका वाटीमध्ये घेऊन खाली थंड पाणी ठेवून आपण हे अशाप्रकारे थंड करू शकतो आणि नंतर त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित आपल्या केसांवर लावायचे आहे जर तुम्हाला स्वतःला हे लावायला जमत नसेल तर कोणाशी तरी मदत घेऊन आपण या मिश्रणाला व्यवस्थित आपल्या केसांवर लावायचे आहे.

हे वाचा:   नाभी सरकने खूपच उपयुक्त असे उपाय.! नाभीचे आरोग्य चांगले बनवण्यासाठी नक्की वाचा.!

त्यानंतर दीड ते दोन तास आपल्याला व आपल्या केसांवर असेच ठेवायचे आहे जेणेकरून यामध्ये आपण वापरले गेलेले सर्व घटक आपल्या केसांमध्ये व्यवस्थित लागतील आणि त्याच्यातील औषधी गुणधर्म आपल्या केसांना मऊ आणि मुलायम आणि चमकदार बनविण्यास मदत होईल. जर तुम्हाला तुमचे केस अजून चमकदार हवे असतील तर या पूर्ण मिश्रणामध्ये एक वाटी आपण दही चा देखील वापर करू शकतो.

दही आणि केसांच्या आरोग्यासंदर्भात आणखी काही विश्वसनीय दाव्यांपैकी एक दावा असा आहे की, दही तुमच्या केसांना ओलावा देते. तसेच केसांना मॉईश्चराईझ देण्याच्या कामात देखील दहीच मदत करते. या दह्याच्या नियमित वापरामुळे तुम्ही विस्कटलेल्या केसांची समस्या देखील कमी करु शकता. त्यामुळे आपण जर यामध्ये दही वापरले तर ते अजून फायदेशीर ठरू शकते.

महिन्या मधून दोन वेळा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा देखिल तुम्ही हा घरगुती उपायाचा वापर करू शकता. या मध्ये वापरले गेलेले सर्व पदार्थ हे घरगुती असल्यामुळे आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे आपल्याला याचा कोणताही हानीकारक परिणाम देखील होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.