ना व्यायाम केला ना कुठले औषधे, तरी आठवड्याभरात कमी झाले दोन किलो वजन.! वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय.!

आरोग्य

मित्रांनो, आपल्याला एकदम फिट आणि शरीराला आकार पाहिजेच असतो. पण आपल्याला जिम साठी सुद्धा वेळ काढावा लागतो. आणि एवढ्या धावपळीच्या जगात कोणाला वेळ मिळत नाही. आणि शरीरयष्टी नीट ठेवण्यासाठी आपल्याला डाएट सुद्धा करावे लागते पण कधी कधी डाएट करता करता आपले शरीर कमजोर होऊ लागते. हे खाऊ नका ते खाऊ नका यात आपण कधी कमजोर आणि अशक्त होऊन जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही.

पोटाची चरबी सहजासहजी कमी होत नाही यासाठीच आज आपण एक उपाय बघणार आहोत. जेणेकरून आपल्याला घरीच पोट कमी करता येईल. या उपायांसाठी आपल्याला लागणार आहे जीरं, काळे मनुका आणि आलं. आजकाल जिऱ्याच्या पावडरचा वापर सलाड, सरबत, उसळ, चटपटीत पदार्थ अशा अनेक गोष्टींमध्ये करण्यात येतो. त्याच प्रकारे जिऱ्यामध्ये पुष्कळसे आरोग्यवर्धक गुण दडलेले आहेत.जिऱ्यामध्ये फायबर, कॉपर, मँगनीज, कॅल्शिअम, पॉटेशिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यांसारखी मिनरल्सही आढळतात.

जिरे पचन तंत्रामध्ये सुधारणा करतात, त्यामुळे पोटा संबंधी समस्या दूर होतात. जिरे पोटातील गॅस आणि वात काढून टाकते. बद्धकोष्ठतेसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. रक्ताच्या अभावामुळे किंवा घाणीमुळे उद्भवणारे मुरुम बरे करते. आपण जो उपाय करणार आहोत त्यात आपल्याला २० ग्राम जिरं लागणार आहे. हे जिरं घेऊन त्याची पूड करून ठेवावी. तसेच काळे मनुका आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मनुका व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सोडियम इत्यादीनी समृद्ध आहे.

हे वाचा:   घरात उंदीर, घुस पुन्हा दिसली तर बोला, हे उपाय त्यांना घरात येऊनच देणार नाही.!

काळे मनुका पचनासाठी अतिशय उपयुक्त आहेत. पचन सुरळीत होण्यासाठी काळ्या मनुका खाव्यात. मनुका पाण्यात अशी जीवनसत्त्वे आढळतात ज्यामुळे शरीरात लाल रक्तपेशी वाढतात. नियमित सेवन केल्यामुळे शरीरात अशक्तपणाचा त्रास होत नाही. आपण एसिडिटीचा बळी घेत असल्यास किंवा आपल्याला आहार पचायला त्रास होत असेल तर आपण नियमितपणे मनुकाचे पाणी घेणे आवश्यक आहे. नियमित सेवन केल्याने मूत्रपिंडही निरोगी रहाते.

म्हणूनच या मनुका एक वाटी घ्या आता त्यात आलं टाका. यासाठी आपल्याला 2 ते 2.5 इंच आल्याचा तुकडा लागणार आहे. याचे छोटे छोटे काप करा. आल्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, फॉलिक ऍसिड, मँगनीज, व्हिटॅमिन बी3 आणि कोलीन आढळतात, ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आलं पोटासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. आलं खाल्ल्यास बद्धकोष्ठतेसोबतच पोटात गॅस तयार होण्याची समस्याही होत नाही.

हे वाचा:   गुलाबजल मध्ये मिसळून एवढी गोष्ट लावा; चेहऱ्यावरील मुरूम , पुटकुळ्यांच्या खड्ड्यांपासून मिळवा सुटका.!

तसेच पोटात सूज किंवा जडपणा जाणवत असेल तर ते देखील कमी होतं. आता जिरं, आलं आणि मनुका एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट एक चमचा नियमित घ्यावी. एक चमचा हे मिश्रण एक ग्लास कोमट पाण्यात मिक्स करावे. आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी घ्यावे. ज्यांच्या पोटाची चरबी वाढलेली आहे त्यांनी हा उपाय नियमित पाच दिवस करावा. नंतर दोन दिवस थांबून पुन्हा पाच दिवस हा उपाय करावा. यामुळे तुम्हाला पोटाची चरबी कमी झाल्याचे दिसून येईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.