कधीही नाक वाहू लागले तर पटकन करायचे यातले एक काम.! सर्दी दोन ते मिनिटात पळून जाईल.! आयुष्यात सर्दीचा त्रास कधी होऊ द्यायचा नसेल तर हा सोपा उपाय करायलाच हवा.!

आरोग्य

हल्ली वातावरण बिघडलेले आहे. अचानक पाऊस पडतो तर अचानक ऊन पडते. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मानवी शरीरावर देखील होत आहे.अनेकदा मानवी शरीराचे तापमान कमी जास्त होते परिणामी अनेकांना व्हायरल इन्फेक्शन म्हणजेच ताप, सर्दी, खोकला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागलेला आहे. या सगळ्या समस्या इतक्या भयंकर आहेत की जराशी देखील चूक आपल्या जीवावर बेतू शकते.

अनेकांना शरीरामध्ये झालेले बदल लवकर कळत नाही आणि परिणामी शरीराचे तापमान अचानकपणे वाढू लागते आणि लगेचच ऍडमिट करावे लागते. खूप सारे औषध एकावेळी सेवन करावे लागतात शरीरातील सर्दी ही हळूहळू कमी होण्यासाठी वेळ लागते परंतु आपल्या आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये असे काही उपाय सांगण्यात आलेले आहे, या उपायाच्या माध्यमातून शरीरातील तापमान नियंत्रणात आणता येऊ शकते. शरीरामध्ये झालेले बदल लवकरच कमी करता येऊ शकते.

आजच्या या लेखांमध्ये जर तुमच्या शरीराचे तापमान कमी झालेले असेल, सर्दी जास्त झालेली असेल तर काळजी करण्यासारखे अजिबात नाही. काही उपायाच्या मदतीने आम्ही तुम्हाला घरच्या घरी सर्दी कशी कमी करायची याबद्दल सांगणार आहोत. वातावरणामध्ये झालेले बदल आणि गारवा यामुळे अचानक पणे सर्दी होते.अनेकांना सर्दी झाल्यावर अंगदुखी, ताप यासारख्या समस्या देखील उद्भवतात.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर सर्दी ही वारंवार होत असते परंतु सर्दी झाल्यावर मेडिकलमधील औषधे वारंवार खाणे हे काही शरीरासाठी चांगले नाही म्हणून आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत या उपायामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होणार आणि जी काही सर्दी झालेली आहे ती लवकर बरी देखील होणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्येष्ठमधाच्या काड्या लागणार आहेत.

हे वाचा:   घशातला कफ पाच मिनीटात बाहेर पडेल.! घसा बरा करायला याहून सोपा उपाय मिळणार नाही.! आज नक्की वाचा खूप म्हणजे खूप उपयोगी पडेल.!

या काड्या आयुर्वेदिक दुकानावर सहजरीत्या उपलब्ध होतात. तीन ते चार ज्येष्ठमधाच्या काडी आपण येथे घेणार आहोत. या काड्यांचा वापर करण्यापूर्वी आपल्याला आधी त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून या काड्या जेव्हा उन्हामध्ये सुकवल्या जातात तेव्हा धूळ माती लागलेली असण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला या काड्या धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक ते दीड ग्लास भर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे.

आता आपल्याला चहा पावडर लागणार आहे. चहा पावडर ही सर्वांच्या घरी सहजच उपलब्ध असते आणि म्हणूनच एक चमचा चहा पावडर आपल्याला लागणार आहे. आता एका पातेल्यामध्ये हे दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि व्यवस्थित रित्या उकळू द्यायचे आहे. ज्येष्ठमधाच्या अंगी जरी शितलता गुणधर्म निर्माण करणारे घटक असले तरी तुमच्या शरीरातील तापमान नियंत्रण करण्यासाठी या काड्या आवश्यक ठरतात तसेच चहा पत्ती पावडर वापरल्यामुळे तुमच्या शरीरामधील उष्णता अजून वाढते.

हे वाचा:   उंची वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करून थकला असाल तर हा शेवटचा उपाय करून बघा.! मुलांची उंची भरभर वाढेल.! एकच चमचा दुधात मिळून खाल्ल्याने असा झाला फायदा.!

आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित उकळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गाळण्याच्या साह्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यावर व गाळण्याच्या आधी आपल्याला तुळशीची पाने देखील टाकायचे आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी घटक असतात, जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी घटक जमा झाले असेल तर ते दूर करण्याची शक्ती तुळशीच्या पानांमध्ये असते.

तुळशीच्या अंगी अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या शरीराला एक सुरक्षा कवच प्राप्त होते. हे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच आपल्याला सेवन करायचे आहे. दिवसभरातून एक किंवा दोन वेळा हे मिश्रण सेवन केले तर तुमची सर्दी कुठच्या कुठे पळून जाईल. ज्या पद्धतीने आपण चहा सेवन करतो त्याच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला सेवन करायचे आहे, यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल आणि परिणामी सर्दी लवकर गायब होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.