श्वास घेताना त्रास होतोय का.? श्वास घेत असताना शिट्टी सारखा आवाज येतो का.? मग हा घरगुती उपायाने बरे होऊ शकता तुम्ही.!

आरोग्य

हल्ली प्रत्येकाला वायरल इन्फेक्शन ची समस्या सतावत आहे. प्रत्येकाला सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, ज्यांना वारंवार चालताना उठताना धाप लागते. थोडे जरी चालले तरी श्वास घ्यायला त्रास होतो आणि मध्येच श्वास घेताना सिटी सारखा आवाज येत असतो. हा आवाज आपल्याला अनेकदा नकोसा वाटतो.

अनेकांना श्वास घ्यायला इतका त्रास होतो की काहीजण पंपिंग देखील करतात परंतु ही सवयच चांगली नाही. श्वास हि आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर या श्वासांच्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. एक वेळ मनुष्य अन्नपाणी शिवाय जगू शकतो परंतु श्वास घेतल्याशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. हल्ली वातावरणात बिगड झाल्याने प्रत्येकाला श्वासाच्या समस्या उद्भवतात.

श्वासाच्या समस्या उद्भवण्यामागील वेगवेगळे कारणे देखील असू शकतात त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरामध्ये जर पोषक तत्वांची कमतरता असेल किंवा फुफुसांची कार्यक्षमता व्यवस्थित नसेल तरी तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये श्वास घेण्याची शक्ती व कार्यशैली सुधारणार आहे व भविष्य तुम्हाला कधीच श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणार नाही.

हे वाचा:   दहा दिवसात कसे झाले केस दुप्पट.! केसांना कंटाळा येईपर्यंत वाढवा.! आता केस कमरेच्या खाली जातील.!

चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला बेहडा व हिरडा लागणार आहे. हे दोन्ही पदार्थ आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. हे आयुर्वेद यातील अत्यंत महत्त्वाचे पदार्थ मानले जातात. आपल्या सर्वांना त्रिफळा चूर्ण माहिती असेल. या त्रिफळा चूर्ण मध्ये आवळा, बेहडा आणि हिरडा या तिन्ही पदार्थांचे मिश्रण असते आणि म्हणूनच त्रिफळा चूर्ण ही आयुर्वेदिक शास्त्रानुसार संजीवनी चूर्ण मानले जाते.

खूप सारे औषधी तत्व असतात जर तुम्हाला बाजारामध्ये अख्खे हे दोन्ही पदार्थ उपलब्ध झाले तर तुम्ही यांची पावडर घरी बनवू शकता परंतु जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अशावेळी बाजारामध्ये उपलब्ध असणारे त्रिफळा चूर्ण तुम्ही सहज वापरून शकता. आता आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी एक ते दोन चमचा त्रिफळा चूर्ण पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दालचिनी लागणार आहे.

अनेकदा सर्दी खोकला झाल्यावर आपल्या छातीमध्ये कफ निर्माण होतो. हा कफ इतका घट्ट असतो की श्वास घ्यायला त्रास होतो. दालचिनीच्या अंगी उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात म्हणून आपण दालचिनीचा उपयोग करणार आहोत त्यानंतर आपल्याला चहा पावडर लागणार आहे. तुमच्या घरामध्ये जी चहा पावडर उपलब्ध असते, ती चहा पावडर आपल्याला एक चमचा घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी या पदार्थांमध्ये ओतायचे आहे.

हे वाचा:   वर्षानुवर्षे छातीत साठलेला कफ, खोकला झटपट काढा बाहेर.! दम्याचा आजार होईल गायब.! फक्त दोन वेळा करा हा उपाय.!

आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचे आहे जेणेकरून यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर गॅस चालू करून गॅसवर एक पातेले ठेवायचे आहे आणि त्यामध्ये हे सारे पदार्थ ओतायचे आहे. हे मिश्रण जोपर्यंत आपल्याला गरम करायचे आहे तोपर्यंत व्यवस्थित रित्या उकळत नाही एकदा का मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या आणि गाळणीच्या साह्याने हे मिश्रण गाळायचे.

हे बनवलेले मिश्रण आपल्याला दिवसभरातून एकदा सेवन करायचे आहे, अशा प्रकारे आपण पंधरा दिवस सेवन केले तर तुमच्या शरीरातील अन्य समस्या दूर तर होणार आहे पण त्याचबरोबर श्वासाची गती सुधारणार आहे. भविष्यात श्वास घ्यायला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही आणि तुमचे फुफुसाचे कार्य देखील सुधारणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.