कडक.! फक्कड.! चहा बनवा असा.! चहा पिणारे तुमच्या चहाचे दिवाने होतील.! दिवसभर जिभेवर राहील चहाची चव.!

आरोग्य

मित्रांनो चहाला धरतीवरचे अमृत म्हटले जाते. आपल्या घरात पाहूणे आले की सर्व प्रथम आपण त्यांचे स्वागत आणि आदरतिथ्य हे चहाच्या प्याल्याने करतो. आज जगभरात लाखो करोडो लोक चहाचे चाहते आहेत. सकाळी उठल्या नंतर चहाचा घोट मिळाला नाही तर अनेकांच्या दिवसाची सुरवात चांगली होत नाही. कोणाला ही कल्पना नव्हती मात्र आता चहा बनवून विकणे हा एक उत्तम व्यवसाय म्हणून केला जातो आणि याद्वारे अनेक लोकं आपले उदर निर्वाह करतात.

जपानमध्ये सहाव्या ते आठव्या शतकांत चीनमधून बौद्ध भिक्षूंमार्फत चहाचा प्रथम प्रसार झाला. प्रथम याचा वापर एक औषधी वनस्पती म्हणून होत असे व तेराव्या शतकापर्यंत तो उत्तेजक पेय म्हणून लोकप्रिय झाला नव्हता. आता त्या देशात प्रत्येक घरात चहापानाच विधी फार महत्त्वाचा समजला जातो. जपानी चहात दूध नसते. चहा पिण्याची सवय चीनमधून मध्य आशियातील देशांत पसरली आणि अठराव्या शतकापर्यंत ती त्या देशांत चांगलीच रूढ झाली होती.

तिबेटमध्ये चहाचा प्रसार चीनमधून सातव्या अगर आठव्या शतकात राजघराण्यामार्फत झाला आणि थोड्याच कालावधीत तेथे राष्ट्रीय पेय म्हणून चहाला मान्यता मिळाली. धार्मिक मठांत त्याचा सर्रास उपयोग होऊ लागला. सुख वस्तू तिबेटी लोक दिवसाकाठी ३० ते ७० कप चहा पितात असे म्हणतात. इराणमध्ये सतराव्या शतकात चहा पिण्याची पद्धत रूढ झाली. चहाने अगदी सगळ्यांनाच वेडे करुन सोडले आहे.

हे वाचा:   अंडी खाणारे जरा हे पण वाचा.! काही ठिकाणी अंडी अशी बनवली जातात.! अंडी गावरान चांगली की हायब्रीड.!

आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला तजेदार व उत्तम चहा कसा बनवावा याची सामग्री व कृती सांगणार आहोत. अगदी सहज दोन मिनिटातच तुम्ही देखील आता चहा बनवू शकता. चला तर वेळ न दवडता पाहूया चहा बनवण्याची कृती. चहा आपल्याला स्फूर्ती देते ऊर्जा देते. कामात कंटाळा अथवा झोप येत असेल तर चहाचा घोट नक्की घ्यावा. तजेदार चहा बनवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम ही सामग्री लागेल. आल्याचे तुकडे, चहापात, साखर, चहा पावडर, दूध आणि पाणी.

ही सगळी सामग्री जमा केल्या नंतर. आता एक पातेले गॅसवर ठेवा त्यात अर्धा लिटर पाणी टाका. पाणी चांगले उकळू लागल्यास त्यात चहा पावडर टाका. आता चहाला चांगला लाल रंग आला की त्यात चहाची पात टाका. मित्रांनो चहाची पात आपल्या घश्यासाठी खूप उपयुक्त असते. ही चहात टाकून प्यायल्यास घश्याचे विकार होत नाहीत. या नंतर या मध्ये आल्याचे बारीक काही तुकडे टाका. आले हा एक बहुगुणी घटक आहे.

आले हे मानवी शरीरासाठी एक नैसर्गिक औषधी आहे. आल्याच्या सेवनाने सर्दी-खोकला दूर पळतो. पित्त तसेच अॅसिडीटीचा त्रास असेल तर तो देखील आल्याच्या सेवनाने कमी होतो. या नंतर चहा मध्ये साखर घाला. साखर तुमच्या चहाला गोडवा देईल. झोप व तणाव घालवण्यासाठी साखर हा एक उत्तम उपाय आहे. साखरेच्या सेवनाने शरीरात उर्जेचा संचार होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. आता चहाला छान उकळी आल्यास त्याचा सुगंध वातावरणात दर्मळू लागतो.

हे वाचा:   घरी बनवलेले असे तेल टकलावर सुद्धा केस उगवेल.!

हा संकेत आहे की तुमचा चहा तयार झाला आहे. या नंतर चहात दूध टाकायचे आहे. दूध न टाकता चहा पिणे उत्तम मानले जाते. दूधाच्या सेवनाने आपल्या पचनक्रियेत बाधा निर्माण होवू शकते. पित्ताचा त्रास होण्याचे मुख्य कारण म्हणजे दूध. म्हणून तुम्ही चहात लिंबाचा रस टाकू शकता. लिंबाचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फयदेशीर आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबाचा रस फार उपयुक्त आहे.

अश्या प्रकारे तुम्ही अगदी काही मिनिटांमध्येच कडक तजेदार चहा बनवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.