कितीही म्हातारे झालात तरी सांधे दुखायचे नाहीत.! डॉक्टरांना नाही जमणार ते हा घरगुती उपाय करून दाखवेल.! आयुष्यात एकदा तरी करावा हा उपाय.!

आरोग्य

वय होत आल की दुखणी वाढत जातात. खास करून हाताची पायाची दुखणी जास्त प्रमाणात वाढतात. अनेकदा चालता येत नाही. कधी कधी हाताने जास्त काम केले जात नाही. उभ राहून कोणतीच कामे होत नाही. कधी कधी एका जागी बसल्याने सुध्दा हात पायाची दुखणी वाढत जातात. वय झालेल्यांनाच नाही तर तरुण स्त्री पुरुषात सुध्दा आता ही हात पायाची दुखणी वाढत आहे.

घरातल्या घरात एका जागे हून दुसऱ्या जागी येजा करता करता उभ राहून स्वयंपाक करताना किंवा जास्त वेळ बसून काम करताना पाठीचा कणा, मणका तसेच खांदा ही दुखतो आणि हात पायाला ही त्रास होतो. सारे अवयव दुखतात. नसांना अकड येते तसेच स्नायू कमजोर होतात ते ही दुखतात त्यामुळे अंगात काम करण्याचं बळ नसते.

अनेकदा आपले सगळ लक्ष त्या दुखण्यावर असत म्हणून ह्या सर्व दुखण्यावर एक सोप्या पद्धतीने केलेला उपाय आपण करणार आहोत. सांधेदुखी, कंबरदुखी व पाठीचा मणका व्यवस्थित रित्या करण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपण घरात उपलब्ध असणारे साहित्य वापरणार आहोत.

हे वाचा:   पोट झटपट साफ करण्यासाठी आताच करा हा उपाय, पोटातले गॅस सर्व नष्ट, एसिडिटी कधी होणारच नाही.!

तर सर्वात आधी आपल्याला दोन तीन तमालपत्र जे तुम्ही खाण्यात, मसाल्यात वापरता ते घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि ते एका छोट्या काचेच्या बरणीत भरून त्यात ऑलिव्ह ऑइल म्हणजेच जैतुन चे तेल घेऊन ते त्या तमालपत्र असलेल्या बरणीत टाकायचे आहे. आपल्याला महिना भर पुरेल इतकं तेल तयार करून ठेवायचे आहे म्हणून त्या सोयीनुसार आपल्याला तेल आणि तमालपत्र घ्यायचे आहे.

ते घेऊन झालं की गॅसवर एक कढई ठेवून त्यात एक नरम कापड ठेवून त्यात पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर ती तेलाची बरणी त्या पाण्यात ठेवून गॅस सुरू करून या तेलाला गरम करायचे आहे.
तेल गरम होत असताना मधे मधे चम्मच ने थोड फिरवून घ्यायचे आहे यामुळे ते छान मिसळून जाईल. थोडा वेळ गरम करून झाल्यानंतर त्याला थंड होऊन मग ते जिथे त्रास होतो म्हणजेच हात किंवा पायांना किंवा नसाना ते लावायचे आहे यांनी नक्की तुम्हाला आराम पडेल.

हे वाचा:   हे एक काम करा, उशीवर डोके ठेवल्याबरोबर शांत झोप लागेल.!

तर हा अगदी काही वेळात होणारा उपाय नक्की करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल म्हणजेच तितक्याच लवकर आराम मिळेल आणि तुम्ही रोज उत्साहाने काम कराल. यामुळे तुमचा रोजचा दिवस आरामात आणि आनंदात जाईल. कस आहे ना दुखणं दूर झालं की अंगात एक छान स्फूर्ती येते आणि आपण आणखी जोमाने काम करू लागतो, तर हे तेल नक्की करून बघा आणि लावून बघा काही दिवसात तुम्हाला नक्की आराम मिळेल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.