केस काळे करण्याचा खर्च मिटला.! एकदा हे एक छोटेसे काम केले तर वर्षभर बघायचे काम नाही.! डोक्यावर एकही सफेद केस उरणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो आपण एका समाजात राहतो आणि आपल्या आजू बाजूला ज्या प्रकारचे वातावरण असते त्या प्रमाणे आपल्याला राहावे लागते. सुंदर दिसण्यासाठी मानव आज काल आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे प्रयोग करत असतो. पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक गोष्टीत काही ना काही नाविण्य व इतरांना आकर्षित करणार्या गोष्टी असतात.

अश्या या सर्व परिवर्तनाच्या घटकांमध्ये जर तुम्ही तरुण असाल परंतू तुमचे केस पिकलेले तसेच सफेद झालेले असतील तर मात्र इतर लोकांपेक्षा तुम्ही वेगळे दिसू लागता. तरुण असून म्हातारे दिसू लागता. आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे व अयोग्य खाण-पानामुळे तसेच पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमच्या डोक्यावरचे केस लवकर सफेद होतात. आता ही एक सामान्य समस्या बनली आहे.

प्रत्येक घरात कोणी ना कोणी या त्रासाने ग्रस्त असल्याचे आपणास दिसून येते. केस काळे करण्यासाठी आज काल बाजारात अनेक उत्पादने मिळतात मात्र ही उत्पादने वापरणे आपल्या केसांकरिता व डोक्याच्या त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असू शकतात. बाजारात मिळणारे रंग हे अनेक वेग वेगळे केमिकल रासायनिक प्रक्रिया करुन तयार केले जातात. याच्या वापराने तुमचे केस काळे तर होतात मात्र याची सवय तुमच्या केसांना लागते.

प्रत्येक महिन्याला हा कलर तुमच्या केसांना लावावा लागतो. अश्या या समस्येवर समाधान म्हणून आम्ही हा आजचा लेख तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही तुमचे केस नैसर्गिक रित्या काळेभोर करु शकता. या साठी तुम्हाला अजिबात जास्त काही खर्च येणार नाही. हा उपाय आयुर्वेदात देखील नमूद केलेला आहे व नैसर्गिक असल्यामुळे याचा कोणत्या ही प्रकाराचा अपाय आपल्या केसांवर दिसून येत नाही.

हे वाचा:   खाजून खाजून त्वचा खराब करू नका.! गजकर्ण, नायटा, खरुज या एका उपायाने बरे केले आहेत.! कुठलाही खर्च नाही.!

चला तर जाणून घेऊया हा रामबाण उपाय. हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता असेल ती म्हणजे कॉफी पावडरची. कॉफीची पावडर तुमच्या केसांना रंग देईलच मात्र केसांना वाढ व मजबूत देखील प्रदान करेल. जर तुमचे सगळे केस सफेद झाले असतील तर दोन चमचे कॉफी पावडर घ्यायची आहे थोडसं टच अप करायचे असेल तर एक चमचा देखील तुम्ही घेवू शकता. या नंतरचा दुसरा घटक म्हणजे लिंबाचा रस.

लिंबू हे जीवनसत्व क ने मुबलक प्रमाणानात भरलेले असते. केसांमध्ये कोंडा झाला असेल अथवा खाज उठत असेल तर तुम्ही लिंबाचा रस नक्की लावा. लिंबाचा रस आपल्या केसांना वाढ देते सोबतच निस्तेज झालेले केस काळे भोर बनवण्यास देखील मदत करते. याच गुणकारी लिंबाचा तुम्हाला दोन चमचे ताजा रस काढून घ्यायचा आहे. तीसरा व शेवटचा घटक जो आपण या उपायासाठी समाविष्ट करायचा आहे तो म्हणजे खोबरेल तेल.

खोबरेल तेल आपण अनेक वर्षांपासून आपल्या केसांच्या निगे साठी वापरत आलो आहोत. खोबरेल तेल तुमच्या केसांना मुलायम बनवते. याच्या वापराने राठ व जाड केस मऊ होतात. खोबरेल तेल रात्री झोपताना केसांवर लावल्यास छान झोप येते डोकेदुखी होत असेल तर ती ही गायब होते. जर खोबर्याचे तेल नसेल तर तुम्ही राईचे तेल देखील वापरु शकता.

हे वाचा:   जो व्यक्ती आयुष्यात एकदा तरी हे फळे खातो त्याला कधीच शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.!

या उपायासाठी दोन चमचे एवढे तेल आपणास घ्यायचे आहे. आता कॉफीची पावडर, लिंबाचा रस व खोबरेल तेल अथवा राईचे तेल या सर्व घटकांना एकत्रित एका पात्रात छान मिक्स करुन घ्यावे. हे मिश्रित अश्या प्रकारे करा जेणे करुन हे मिश्रण जास्त पातळ पण नको आणि घट्ट पण. योग्य मापात मिश्रण करुन झाल्यावर हे ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळांपासून लावा. हा उपाय तुम्हाला महिन्यातून एकदाच करायचा आहे.

या उपायाने तुमचे केस काळेभोर तर होतीलच मात्र कोंडा व केसांच्या मुळांमधील कमजोरी यांसारख्या समस्या देखील गायब होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.