आता नाकावर तसले काळे डाग नाही राहणार.! व्हाइट आणि ब्लॅक हेड्स कायमचे काढून टाकायचे असेल तर हे एक काम तर करावेच लागणार.!

आरोग्य

सुंदर उजळलेला चमकदार चेहरा सगळ्यांना हवा असतो. भरपूर पैसा व सुंदर चेहरा हे आजच्या या युगाचे कटू सत्य आहे. जर तुम्हाला या संसारात टिकून रहायचे असेल तर पैसा व सुंदरता या दोन्ही गोष्टींचे मालक व्हावे लागेल. पैसा कमवण्यासाठी लागते बुद्धी व मेहनत तसेच सुंदर दिसण्यासाठी चांगले खाण-पान व सोबतच चेहरा सुंदर ठेवण्यासाठी काही नैसर्गिक साधने. आपल्या आस पास एक सामान्य समस्या आपल्याला प्रत्येक घरात आढळून येते ती म्हणजे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स.

हे चेहर्याच्या नाकावर व नाकाशेजारी भागांवर उठतात. कधी-कधी याचे पिंपल तयार होते मात्र कधी कधी पिंपल येवून गेल्यास हे हेड्स तयार होतात. या व्हाइट आणि ब्लॅक हेड्स मुळे तुमच्या चेहर्याचा नैसर्गिक निखार गायब होवू लागतो. बाजूने चेहरा किती ही सुंदर व बघण्या लायक असला तरी ही या व्हाइट आणि ब्लॅक हेड्स मुळे तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसता.

घामामुळे अथवा गरमीमुळे देखील ही समस्या तुमच्या चेहर्यावर उद्भवू शकते. आज काल बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम आणि लोशन मिळतात ज्या व्हाइट आणि ब्लॅक हेड्स गायब करण्याचा दावा करतात. मात्र या संपूर्ण रासायनीक केमिकल टाकून बनवलेल्या असतात. या टाॅक्सीक असतात. यांच्या वापराने तुमची त्वचा खराब होवू शकते. मात्र आता चिंता करण्याची काही गरज नाही.

आम्ही आमच्या या लेखात तुमच्या या समस्येचे समाधान घेवून आलो आहोत. हा असा एक आयुर्वेदीक रामबाण उपाय आहे ज्याच्या वापराने तुमचे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स गायब होतील व पुन्हा पुन्हा येणार नाहीत. चला तर जाणून घेवूया हा उपाय. व्हाइट आणि ब्लॅक हेड्स येण्याचे कारण म्हणजे चुकीचे खाण-पान होय. तुमच्या जेवणात खूप प्रमाणात तेलकट अथवा स्निग्ध पदार्थ असतील तर हे आपल्या चेहर्याच्या त्वचेत जावून तेलाचा एक थर तयार करतात.

हे वाचा:   हे पाच पदार्थ चहात टाका, चहाची चव दुप्पट वाढेल, पिणारा कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.!

जेव्हा हा तेलाचा थर आॅक्सीजनच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्या चेहर्यावर व्हाइट आणि ब्लॅक हेड्स बनण्यास सुरवात होते. तुम्ही दूध अथवा दूधापासून तयार झालेल्या गोष्टींचे सेवन भरपूर व नियमित करत असाल तर तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागेल. परंतू दही खाणे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून याचा वापर तुम्ही योग्य मात्रेत करु शकता.

चेहर्यावरचे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स काढून टाकण्यासाठी आता लोक मोठ्या प्रमाणात स्क्रबचा वापर करतात. हा स्क्रब तुमचे व्हाइट आणि ब्लाॅक हेड्स काही काळासाठी घालवतो मात्र मूळापासून नष्ट करत नाही आणि या मुळेच वारंवार ही समस्या आपल्या समोर उद्भवत असते. मध हा आपल्या सर्वांच्या ओळखीच घटक आहे. मध अनेक घटकांनी आणि जीवनसत्वांनी भरलेला आहे.

हा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो माणूस अद्याप तरी कृत्रिम पद्धतीने बनवू शकलेला नाही. 25 मि.ली. मध घ्यायचा आहे. या सोबतच दोन चमचे साखर देखील आपल्याला घ्यायची आहे. साखर आपल्या सर्वांच्या घरामध्ये सहजतेने मिळेल. साखरेत देखील सुक्रोस नावाचा घटक आहे जो आपले हे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स काढण्यास मदत करेल. या दोन्ही घटकांना एकत्रित करुन यांचे चांगले मिश्रण करुन घ्यायचे आहे.

हे वाचा:   जुण्यातले जुने चेहऱ्यावरचे डाग, धब्बे, पिंपल्स सर्व एका रात्रीत गायब होतील, जाणून घ्या कसे.!

हे मिश्रण आपल्या चेहर्यावर लावण्याच्या आधी चेहर्याला गरम पाण्याच्या मदतीने वाफ द्या. नंतर हे मिश्रण लावून पाच मिनिटांनी थंड पाण्याच्या मदतीने चेहरा धुवून घ्या. नंतर तुम्ही कोरफडीचे जेल चेहर्यावर 15 मिनिटांसाठी लावा व चेहरा धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे. याने तुमचे व्हाइट आणि ब्लॅक हेड्स समूळ गायब होतील

तुम्ही चारकोलचा देखील मास्क घरच्या घरी बनवू शकता. हा बनवण्यासाठी तुम्हाला फक्त जिलेटीन पावडर आणि चारकोल पावडर लागेल. या दोन्ही घटकांना गरम पाण्यात मिक्स करुन याची पेस्ट करुन घ्या व आपल्या चेहर्यावर अर्ध्या तासासाठी लावा. नंतर खालच्या बाजूने हळुहळू हे मास्क काढून टाका. हा उपाय देखील आठवड्यातून एकदाच करायचा आहे. हे दोन्ही उपाय वापरुन तुम्ही व्हाइट आणि ब्लॅक हेड्स या समस्येवर सहजतेने मात करु शकता.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.