अशा प्रकारे झोपणारे लोक शंभर वर्षाच्या वर जगतात.! आजच तुमच्या झोपेच्या पद्धतीत बदल करा आणि अनेक रोगापासून व्हा मुक्त.!

आरोग्य

लहानपणी जेव्हा आपल्याला अंगदुखी, सर्दी-खोकला जाणवायचा तेव्हा आपली आई आपल्याला थोडा वेळ झोप असे सांगायची व झोपून उठल्यानंतर आधी पेक्षा बरं वाटायचे किंवा या मागे देखील एक शास्त्रीय कारण आहे. कधी-कधी शरीराचे अवयव खूप थकतात आणि त्यांना आरामाची गरज असते. पण आपण विश्रांती न घेतल्यामुळे त्यांना त्रास होतो. कणकण वाटत आहे अशी तक्रार आपण करतो.

फक्त थोडा वेळ झोपल्याने परिस्थिती सुधारते. शारीरिक कसरतींमुळे दमलेल्या शरीराला आरामाची आवश्यकता असते. झोपल्यामुळे शरीराला आराम मिळतो. रात्री शांतपणे झोपून सकाळी उठल्यानंतर उत्साह वाढतो. पुरेशा विश्रांतीमुळे दिवसभर काम करण्यासाठीची ऊर्जा मिळते. प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल. जीवनक्रमामध्ये झालेल्या बदलांमुळे आपले निद्राचक्र बिघडले आहे.

अपुर्‍या झोपेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्मरणशक्तीवर परिणाम होतो. होय झोप पूर्ण न झाल्यास तुम्हाला गोष्टी विसरण्याची सवय होवू शकते. त्याच बरोबर आपण चिडचिड करु लागतो. आपल्या डोक्यावर कामाचा ताणतणाव वाढत जातो. आजार ग्रासल्याने थकवा येवू लागतो. आपण रोज करतो त्या कामामध्ये देखील आपला योग्य लक्ष्य लागत नाही. झोप न झाल्यास आळसपणा देखील येवू लागतो.

गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झोपणे हानिकारक असते. ज्याप्रमाणे झोप पूर्ण न झाल्याने नुकसान होते. तसेच जास्त वेळ झोपणे सुद्धा शरीरासाठी अयोग्य असते. परंतू आपले आरोग्य आपल्या झोपण्याच्या पद्धतीवर सुद्धा अवलंबून आहे. आज या लेखात आपण निरोगी व योग्य झोप मिळण्यासाठी नक्की कश्या पद्धतीने झोपणे गरजेचे आहे ते पाहणार आहोत.

हे वाचा:   लघवीच्या सर्व समस्यावर एकच उपाय पुरेसा, पुन्हा पुन्हा लघवी येणे, आग होणे, थेंब थेंब लघवी येणे, लघवी बंद पडणे कायमचे थांबेल.!

होय ज्या प्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्याचा एक नियम असतो तसेच झोपताना देखील काही नियम असतात. बरेच वेळा आपण कसे ही झोपतो व यानेच आपल्या शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही माहिती तुमचे डोळे उघडू शकते. म्हणून आमचा हा सदर लेख शेवत पर्यंत नक्कीच वाचा. मित्रांनो आपल्या शरीराला दिन दैनिक कार्य करण्यासाठी शक्तीची गरज असते व अन्नाच्या माध्यमातून ही गरज पुरवली जाते.

जेव्हा आपण रात्री अन्न ग्रहण करतो व काही काळाने झोपी जातो. परंतू रात्रीचे जेवण व झोप यांच्या मध्ये किमान दोन तासाचा गॅप द्यावा. हा आहे रात्री झोप घेण्याचा नियम क्रमांक एक. या नंतर तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा नेहमी तुमच्या डाव्या कुशीवर झोपत जा. याचे देखील एक मोठे वैद्यानिक कारण आहे. ग्रहण केलेले सर्व अन्न अन्ननलिकेतून खाली जावून जठर मध्ये जमा होते.

हे वाचा:   ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा तुम्हाला त्रास देत असेल तर, रोज रात्री हे एक काम करायचे तिसऱ्याच दिवशी मुतखडा पडणार.!

आपली पचन क्रियेची संस्था ही आपल्या शरीराच्या चांगल्या आरोग्याचा एक मूलभूत पाया मानली जाते. जर तुमचे पोट साफ असेल तर तुम्हाला कोणता ही आजार होणार नाही. जेव्हा तुम्ही जेवण ग्रहण करुन झोपता तेव्हा अन्न पचलेले नसते. आपल्या पचन संस्थेची रचना डाव्या बाजूला केली गेलेली असते. जेव्हा तुम्ही तुमच्या डाव्या कुशीवर झोपता तेव्हा गुरुत्वाकर्षणाने तुम्ही खाल्लेले अन्न हे योग्य रित्या पुढे जात राहते.

जर तुम्ही दुसर्या कोणत्या ही स्थितीत झोपलात तर तुम्हाला दुसर्या दिवशी अपचन तसेच मळमळण्याचा त्रास हा जाणवेलच. होय विज्ञान सांगते नेहमी डाव्या कुशीवर झोपणे हे आपल्या पचन क्रियेसाठी सगळ्यात फायदेशीर आहे. सोबतच आता वैद्यानिकांना अनेक पुरावे असे ही मिळाले आहेत की डाव्या कुशीवर झोपणे हे आपल्या मानवी हृदयासाठी देखील चांगलेच उपयोगी आहे.

म्हणूनच रात्री झोपताना नेहमी डाव्या कुशीवर झोपा व अनेक आजारांना शरीरावर हल्ला करण्यापासून थांबवा. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या