छातीतली घाण, कफ दोन मिनिटात मोकळा होतो.! त्यासाठी करावे लागते हे छोटेसे काम.! फक्त दिवसभरातून कधीही दोन वेळा प्यावे.!

आरोग्य

मित्रांनो आजकाल दिवस हे खूप बदलत चालले आहेत. दिवसेंदिवस मानवी आरोग्य बिघडत चालले आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मधुमेह, रक्तदाब, मुळव्याध, त्वचाविकार, केसांचे विकार, मानसिकविकार , दौर्बल्य, मूत्रपिंडाचे आजार यापैकी काहीना काही मुलींचा सामना करावाच लागतो. कफ वात पित्त या त्रिदोषांच संतुलन बिघडल्या स शरीरात अनेक गोष्टी उलटापालट होतात.

आम्ही तुम्हाला अनेक आजारांवर निरनिराळे घरगुती उपाय सुचवत असतो. हीच माहिती शृंखला पुढे नेत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जुनाट कफ असेल तर तो घालवण्यासाठी एक घरगुती उपाय. कधी कधी छातीत खूप कफ साठलेला असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही. खोकून खोकून बरगडय़ा-पोटात दुखायला लागते, दम लागतो.

सर्दी, पडसे, कफ इत्यादी कफप्रधान विकारांत दही, दह्याचे पदार्थ, फ्रिजमधील थंड पाणी, घरी ऑफिसमध्ये सतत एसी चालू असणे हे काहीसे कारणीभूत ठरतात. तेव्हा आंबट खाणे टाळावे, थंड पाणी पिऊ नये, एसी टाळावा, रोज सकाळ संध्याकाळ रोज 10 मिनिटे दीर्घ श्‍वसनाचा प्राणायामाचा अभ्यास करावा. या होत्या छोट्या टिप्स चला तर मग आता पाहूयात आपला मुख्य उपाय..

हे वाचा:   चष्मा कायमचा निघणार आहे कारण, डोळ्यांची रोशनी वाढवणारा उपाय सापडला आहे.!

जुनाट कफामुळे छातीत इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यासाठी एक सोपा आणि अत्यंत फायदेशीर असा उपाय बघू या. जो बनवायला देखील सोपा आहे आणि जास्त बनवून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र. एका आठवड्याभराच्या उपायासाठी तुम्हाला मध्यम आकाराची सहा पानं घ्या. ती तोडून घ्या. यासोबत आपल्याला लागणार आहे दोन मध्यम आकाराचे साल काढलेल आलं.

आलं बारीक कापून घ्या. आलं आपल्याला सर्दी, कफ, खोकला, गळा दुखणे, डोकेदुखी, पोट साफ होणे यामध्ये देखील मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी, झिंक, कॉपर, फॉस्फरस असे पोषक तत्व असतात. तमालपत्र आणि आलं दोन्ही गोष्टी आपल्याला बॅक्टेरिया, फंगस आणि इन्फेक्शन पासून लढण्यास मदत करते.

सात दिवसाच्या उपायासाठी कमीत कमी अर्धा लिटर पाणी घ्यावे. गरम पाणी करायला ठेवा. यात आलं घाला. तमालपत्र धुवून घ्या मगच यात टाका. यात अजून आपण एक गोष्ट घालणार आहोत. याला उकळी आल्यावर गॅस कमी करून यात सात लवंग घाला. तमालपत्र तळाला बसेल इतके शिजवा हे पाणी. यानंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर हे गाळून घ्या.

हे वाचा:   जेवल्यानंतर शतपावली आहे गरजेची, जेवल्यावर लगेच झोपणाऱ्या लोकांनी एकदा नक्कीच वाचावे.!

यात चार चमचे मध घाला. हे तुम्ही साठवून ठेवू शकता. पिते वेळी कोमटसर पाणी करून घ्या. यामध्ये दोन चमचा हे पेय घाला. मिक्स करा. हवं असल्यास अर्ध लिंबू घाला. शुगर असल्यास मधा वीना प्या. झाले आपले पेय तयार. सकाळी रिकाम्या पोटी हे पेय घ्यावे. आशा आहे हा उपाय तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.