या एका फुलाने कामालाच केली.! मरेपर्यंत पित्त, ऍसिडिटी, जळजळ होणार नाही.! काहीही आणि कितीही खाल्ले तरी आरामात पचले जाईल.!

आरोग्य

आपल्या परिसरात अनेक पाने फुले असतात. काही छोटी काही तर काही मोठी काही सुवासिक काही बिनवासी तर काही औषधी. अनेकांना माहित नसते परंतू आपल्या परिसरातील अनेक फुले ही औषधी गुणधर्म असलेली असतात. आपले अनेक विकारी ठीक करण्याची शक्ती या फुलांमध्ये असते. या फुलांच्या मदतीने आपण विकाराला तोडणारा उपाय तयार करु शकतो. त्यातीलच एक फुल म्हणजे जास्वंद.

जास्वंदाच्या फळाला धार्मिक महत्व देखील लाभले आहे. त्यासोबत आयुर्वेदात देखील याला उच्च स्थान दिले गेले आहे. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपाच्या स्वरूपात असते. जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणाऱ्यांत ‘हिबिस्कस कॅनाबिनस’ ही जात असून ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे.

जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. जास्वंदीचे हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही.

सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जापाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. आता शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक म्हणजेच मू’त्रल म्हणून वापरतात.

हे वाचा:   एक्सपायर झालेल्या गोळ्या औषधे खाल्ल्यानंतर काय होते वाचा.? अनेक लोकांना माहिती नसेल ही गोष्ट.! खूपच भयंकर आहे...!

इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. पोट साफ करण्यासाठी तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जेलीसारख्य नायजेरियात खाद्य पदार्थांमध्येही वापरतात. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो.

आपल्या घरी अनेकांना बाहेरचे फास्ट फूड तसेच तेलकट व तिखट पदार्थ खायला आवडतात. अश्याने पित्त, गॅस व अपचन या समस्ये उद्भवतात. पित्त झाले की आपण त्वरित जावून मेडिकल मधून गोळ्या किंवा औषध आणतो. परंतू या गोळ्या औषधे जास्त प्रमाणात खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. पित्ताच्या व अपचनाच्या या समस्येसाठी आज आम्ही याच जास्वंदीच्या फुलापासून तयार होणार एक रामबाण उपाय सांगणार आहोत.

होय हा नैसर्गिक उपाय कोणती ही मेहनत अथवा पैसे खर्च न करता तयार केला जावू शकतो. हा एक साधा सरळ मात्र खूपच उपयुक्त उपाय आहे. चला तर विलंब न करता पाहूया हा उपाय. पित्त व गॅस झाल्यास शरीर अस्वस्थ होते. सारखे पोटात दुखत राहते अश्या वेळी तुम्ही जेव्हा ही काही अती मसालेदार अथवा तुम्ही हा उपाय रोज केलात तरी हरकत नाही. रात्री हे बहुगुणी जास्वंदीचे फुल एक काचेच्या भांड्यात पाण्यामध्ये बुडवून ठेवा.

हे वाचा:   बोटे मोडणे योग्य की अयोग्य.? तुम्ही रोज हाताची किंवा पायाची बोटे मोडत असाल तर एकदा नक्की वाचा.!

याने जास्वंदीच्या फूलात असणारे सर्व गुणधर्म पाण्यात उतरतील. सकाळी उठल्यावर काही ही न खाता उपाशी पोटीच या पाण्याचे सेवन करायचे आहे. आपली सकाळची लाळ आपल्या शरीरासाठी पौष्टिक मानली जाते म्हणूनच उपाशी पोटी या पाण्याचे सेवन करा याने तुम्हाला कधीच पित्त, गॅस व अपचन यांसारख्या समस्या होणार नाहीत.

या सोबतच ज्या महिलांना मासिक पा’ळी उशिरा येते या महिलांनी देखील या पाण्यात मध घालून प्यायल्यास तुमची समस्या काहीच दिवसात नाहीशी झालेली दिसून येईल. बाजारातील कृत्रिम गोळ्या-औषधं शरीराला अपाय करतात म्हणूनच आज आम्ही सांगितलेल नैसर्गिक उपाय नक्कीच करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.