सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ही एक जडीबुटी.! ज्यांना ज्यांना आला आहे अनुभव त्यांनी तर मानले आहे देवच.! एकदा याचे चमत्कार नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या परिसरात अनेक झाडे-झुडपे असतात. परंतू अनेक वेळा त्यांना निरुपयोगी समजून त्यांच्या कडे लक्ष्य देत नाही. परंतू असे करणे योग्य नाही. अनेक विकारांवर तसेच समस्यांवर समाधान आहेत या वनस्पती. गरूड पुराण व आयुर्वेदात देखील या वनस्पतीं बाबत विस्तारात लिखाण करुन ठेवले आहे. आज या लेखात आपण अश्याच एक अज्ञात वनस्पतीबद्दल थोडी माहिती घेणार आहोत.

या वनस्पतीच्या फायदे हे प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजेत. ही आपल्या परिसरातच वाढत असणारी एक चमत्कारिक व औषधी वनस्पती आहे. मात्र आता प्रत्येकालाच लॅबमध्ये तयार होणारी कृत्रिम गोळ्या-औषधे खाणे जास्त पसंत आहेत. आयुर्वेदीक औषधांवर अनेक जण अविश्वास दाखवतात. आपले शरीर हा एक नैसर्गिक व नाशवंत घटक आहे. याला बरे करण्यासाठी देखील एक नैसर्गिकच उपाय केला गेला पाहिजे.

कृत्रिम गोळ्या व औषधे रोज सेवन केल्यास याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे कृत्रिम औषधे कमित-कमी ग्रहण करावेत. आज आपण बोलणार आहोत अघाडा या वनस्पती बाबत. चला आता वेल न घालवता या वनस्पतीचे फायदे पाहूया. अघाडा या वनस्पतीला चिरचिटा देखील म्हणतात. वेग-वेगळ्या ठिकाणी याला निर-निराळ्या नावाने संबोधले जाते.

आघाडा ही वनस्पती पावसाळ्यात उगवते आणि अगदी रस्त्याच्या कडेला सहजपणे उपलब्ध होते. हे झुडूप एक ते तीन फूट उंचीपर्यंत वाढते. त्याचे खोड ताठ असून त्याला थोड्या परंतु लहान फांद्या फुटतात. पाने एक ते दोन इंच लांब व एक ते पाऊण इंच रुंद असतात. त्याला फिकट हिरव्या रंगाची पुष्कळ फुले येतात. फुलाचा दांडा सुरुवातीला आखूड असतो. परंतु तो वीस इंचांपर्यंत वाढू शकतो. फळांना लहान लहान काटे असल्यामुळे ते जनावरांच्या अंगाला चिकटतात व दूरवर पसरतात.

हे वाचा:   त्वचारोगावर रामबाण उपाय, पित्त, खाज, खरूज दोन दिवसात गायब, जाणून चकित व्हाल...!

त्यामुळे बहुतेक ठिकाणी ह्या वनस्पतीचा प्रसार होतो. आघाड्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत. या वनस्पतीच्या पानांचा मंगळागौरीच्या पूजेतील पत्रींमध्ये समावेश असतो. एकेकाळी पुण्यासारख्या शहरांत श्रावण महिन्यात रस्त्यावरून आघाडा, पत्री, फुले अशा आरोळ्या देत आदिवासी विक्रेत्या स्त्रिया हिंडत असतात. मित्रांनो दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर आघाडा एक गुणकारी औषधी आहे.

ही वनस्पती एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. सोबतच दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात व पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात. शरीरात पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे देखील श्रेयस्कर असते.

खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली थोडी थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो. खोकला झाल्यास आघाड्याचे चूर्ण व मिरी समभाग घेऊन मधातून चाटण देतात. खोकला व कफ यामुळे ताप आला असेल तर आघाड्याच्या पंचांगाचा काढा मधातून देतात.

हे वाचा:   केसांना दुप्पट करण्यासाठी काय करायला हवे.? माहिती आहे का.? या उपायाने अनेक महिला झाल्या आहे खुश.!

सर्दीमुळे खोकला, पडसे झाल्यास, नाक चोंदल्यास, नाकाची आग होत असल्यास, नाकाचे हाड वाढल्यास आघाड्याचे बी घेऊन त्यात सैंधव मीठ व मेहंदीचा पाला व जाईचा पाला समभाग घालून वाटतात. त्यात त्याच्या अर्ध्या प्रमाणात तिळाचे तेल घालून ते निम्मे आटवतात. हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा नाकात घातल्यास सर्दी आटोक्यात येते. मानवी शरीरातील मू’त्रवाहिनी, मू’त्रपिंड यामध्ये बारीक काटे असणारे मुतखडे म्हणजेच युरिनरी स्टोन निर्माण होतात.

त्यामुळे संबंधित रुग्णास पाठीत व कंबरेच्या भागात विलक्षण वेदना होतात. अशा वेळेस आघाड्याच्या पानांचा रस प्राशन केल्यास एक-दोन दिवसांत मु’तखड्याचे बारीक कण विनासायास बाहेर पडतात आणि रुग्णाला बरे वाटते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.