रात्री झोपताना दोन लवंगा खाऊन झोपले, असे जर तुम्ही पंधरा दिवस केले तर शरीरात नेमका काय परिणाम होईल एकदा नक्की बघा.!

आरोग्य

मानवाला काळासोबत असे काही आजार देखील झाले आहेत ज्यांचे उपाय खूप दुर्मिळ आहेत. आधुनिक उपयाने थोड्या वेळा करिता आराम मिळतो मात्र कायम स्वरूपासाठी याचा बंदोबस्त केला जावू शकत नाही. आयुर्वेदात अनेक अशा आजारांवर उपाय लिहून ठेवले गेले आहेत. सोबतच आपल्या स्वयंपाकघरातच अनेक अशा औषधी वस्तू सापडतील ज्याच्या मदतीने आपण आजारांचे समाधान शोधू शकता.

आज आपण आमच्या या लेखात अश्याच एका पदार्था बद्दल थोडी माहिती देणार आहोत ही माहित तुम्ही कधी ही ऐकली नसेल व याने होणारे फायदे जाणून तुम्ही थक्कच होवून जाल. चला तर जाणून घेऊया ही माहिती. लवंग भारतीय स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध होतो. प्राचीन काळापासून भारतात लवंगचा उपयोग मसाल्यांमध्ये केला जातो तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये भरपूर केला गेला आहे. आयुर्वेदातही लवंग औषधासाठी वापरली जाते.

लवंगमध्‍ये अ‍ॅण्टी-ऑक्सिडंट आणि वेदनाशामक गुणधर्म तसेच विटामीन व खनिजे असतात व इतर पौष्टिक घटक आढळतात जे शरीराला अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. पोट फुगणे, गॅस, अपचन, मळमळ, जुलाब आणि उलट्या या पचनाच्या समस्यांमध्ये लवंग फायदेशीर मानली जाते. लवंगामध्ये आढळणारे गुणधर्म पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. सकाळी लवंग खाल्ल्याने पचनाच्या कोणत्याही समस्यांवर उपचार करण्यास मदत होते.

लवंग पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढवते ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पाचक विकारांचा प्रतिबंधित करते. लवंग फायबरने भरलेले असते जे तुमच्या पाचक आरोग्यासाठी चांगले असते. लवंग त्यांच्या दाहक-विरोधी प्रभावांसाठी ओळखल्या जातात. काही अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज लवंग खाल्ल्याने मोठे मोठे फायदे होऊ शकतात आणि तज्ञ संधिवातपासून मुक्ती मिळवण्यात मदत देखील होते.

हे वाचा:   केसांचे आयुष्य कांद्यामुळे होईल दुप्पट, आज पासून एकही केस गळणार नाही फक्त अशाप्रकारे करा उपयोग.!

लवंगाचे तेल लोशन म्हणून वापरा संधिवात आणि सांध्यामध्ये होणारी वेदना आणि सूज कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरू शकते. लवंगात फ्लेव्होनॉइड आढळतात, लवंगाच्या तेलाची मालिश केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. लवंगात वेदनाशामक गुणधर्म असल्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. लवंग तुमच्या वरच्या आणि खालच्या दातांमध्ये धरा किंवा लवंगाची पेस्ट बनवा आणि त्यात काही थेंब ऑलिव्ह ऑईल टाका.

ही पेस्ट थेट दाताला लावा याने दातदुखी आणि हिरड्यांची जळजळ कमी करण्यासाठी लवंग अत्यंत गुणकारी आहे. लवंगात लठ्ठपणा विरोधी प्रभाव असतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही लवंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता. सकाळी एक ग्लास पाणी दोन-तीन लवंग टाकून उकळून घ्या थोडा थंड झाल्यावर त्याचे सेवन करा. या उपायाचा वापर करून तुम्ही तुमचा वजन नक्कीच कमी करू शकता.

छातीत कफ असल्यास अथवा खोकला असल्यास तुम्ही या गुणकारी लवंगीच्या फुलपासून काढा तयार करु शकता. होय लवंगी सोबत तुम्ही चार-पाच पाने तुळसीची व एक तुकडा गुळाचा देखील टाकू शकता. तुळसीची पाने खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे. तुळसीच्या पानाच्या सेवनाने श्वसनाचे विकार बरे होतात म्हणूनच या तुळ्सीच्या पानांचा वापर देखील तुम्ही काढा बनवण्यासाठी करु शकता.

हे वाचा:   आयुष्यभरासाठी डाय करणे विसरून जाल, नारळाच्या सालीने केस बनवा काळेभोर.! शून्य रुपयात करा उपाय.!

गुळाच्या तुकड्याने या काढ्याला एक वेगळीच चव येईल थोडासा गोडवा येईल म्हणून तुम्ही याचा वापर करु शकता. तसेच गुळ आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतो. हा काढा बनवण्यासाठी लवंगीची सात-आठ फुले तुळसीची पाच-सहा पाने व गुळाचा बरीक तुकडा एक लिटर एवढ्या पाण्यात घ्या व मंद वाफेवर गरम होवू द्या. अर्ध्या तासा भराने याला चांगली उकळी येईल मग तुम्ही हा काढा थंड होवू द्या.

थंड झाल्यास गाळणीने गाळून घेतल्यावर रात्री झोपण्या आधी हा काढा प्या सकाळी तुम्हाला होणार खोकला व कफ गायब होवून जाईल. हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे व निर्धोक आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.