हा एक पदार्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीत सोडायचा.! हिवाळ्यात होणारे हे त्वचा विकार तसे अनेक आजार कायमचे नष्ट होतील.! एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो आता हिवाळा सुरु झाला आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद घ्यायला आपल्याला सर्वांनाच आवडते. हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात आणि अश्या परिस्थीती मध्ये त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. या काळात अनेकांना त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात नेमकी त्वचेची काळजी कशी घ्यावी हे अनेकांना माहित नसते.

या काळात आपल्या शरीराची त्वचा कोरडी पडते व राठ होवून भेगा देखील पडू लागतात. यासाठी लोक अनेक प्रकारच्या बाजारात मिळ्णार्या क्रीम वापरतात किंवा अनेक उपाय ही करतात. परंतू ही कृत्रिम उत्पादने आपल्या शरीरासाठी अपाय कारक देखील ठरू शकतात. आपण आपल्या शरीराकडे जितके लक्ष देतो तितके लक्ष आपण त्वचेकडे देत नाहीत. आपल्या परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेचे मोठे नुकसान होत आहे.

चेहऱ्यासोबतच शरीराच्या त्वचेची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला तुमच्या शरीराची त्वचा चांगली व चमकदार ठेवण्याचे काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करुन तुम्ही हिवाळ्यात देखील शरीराची त्वचा सुंदर बनवू शकता. चला आता वेळ न दवडता पाहूया नक्की कोणते आहेत हे उपाय. जास्त गरम पाण्याऐवजी रोज उबदार अंघोळ करा.

म्हणजेच हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने आपली त्वचा कोरडी व निर्जीव दिसते. यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. पाणी कोमट झाल्यावर नेहमी शॉवर घ्या. यामुळे तुमची त्वचा मऊ राहील. या सोबतच जेव्हा त्वचेची काळजी येते तेव्हा क्लिनिंग ही सर्वात महत्वाची गोष्ट असते.

हे वाचा:   आरोग्यासाठी वरदान आहे ही एक वनस्पती, फक्त एकच पान करील कमाल, जीवन संजीवनी आहे ही वनस्पती.!

त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात चण्याच्या डाळीचे पीठ व एक चमचे हळद आणि दोन चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा आता ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल. त्वचेतून काळे डाग काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे खूप महत्वाचे आहे. स्क्रबिंग आपली मृ’त त्वचा काढून टाकते. नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी आपण कॉफी, नारळ तेल आणि मध वापरू शकता.

आठवड्यातून दोनदा हे स्क्रब लावल्याने मृत त्वचा दूर होईल. हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात विशेषता बेरीज स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटि ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा.

हे वाचा:   स्वतः च्या शरीराची टेस्ट तुम्ही स्वतः करा.! फक्त नऊ मिनिटात समजेल शरिराची हालत.! याकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात.!

यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल. या सोबतच एक साधा सोपा नैसर्गिक उपाय करुन देखील तुम्ही तुमची त्वचा चमकदार व टवटवीत बनवू शकता. या उपाया बाबतचा संदर्भ आपल्या भारतीय वैद्य शास्त्र म्हणजेच आयुर्वेदात देखील नमूद केलेले आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त खोबरेल तेल तुमच्या नाभित सोडायचे आहे. खोबरेल तेल हे आपल्या प्रत्येकाच्या घरात अगदी सहज उपलब्ध होते.

हिवाळा सुरु झाला आहे आता रोज रात्री झोपण्या आधी खोबरेल तेल तुमच्या नाभित म्हणजेच बेंबीत सोडा. असे केल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राहिल. या सोबतच कधी कधी पोटात गाठ झाल्यास दुखते त्याला सामान्य भाषेत वाट सरकणे म्हणतात. अश्या वेळी बेंबीत खोबर्याचे तेल सोडणे खूप उपयुक्त ठरू शकते. अश्या प्रकारे हिवाळ्यात तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.