हेडफोन्सचा जास्त वापर जिवाशी बेतू शकतो.! अशा लोकांनी व्हायला हवे आजच सावध अन्यथा मेंदूत होऊ शकतात असे भयंकर विकार.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तरुणाई आजकाल एका गोष्टीची वेडापिसा झाली आहे. आजकाल हेडफोन, लीड, earbud पण अगदी सर्वसाधारण बाब आहे. प्रत्येकाकडेच मोबाईल किंवा लॅपटॉप आहेत. अर्थातच सोबत हेडफोन earbud आलेच. आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री झोपताना देखील नियमितपणे गाणे ऐकण्याची सवय असते. काही लोकांचा कानात तर सतत तुम्हाला Earbud बघायला मिळतील.

आज कालच्या ऑनलाइन वर्क फ्रॉम होम च्या जमान्यात अनेकांना व्हिडिओ कॉल देखील हेडफोनच्या मदतीनेच करावे लागतात. परंतु काय तुम्हाला माहित आहे का, ज्या हेडफोन चा वापर आज आपण आपल्या फायद्यासाठी करत आहोत ते उद्या आपले बहिरेपणाचे कारण बनू शकते. फक्त एवढेच नाही तर याचा परिणाम आपल्या मेंदूवर देखील होतो.

हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. ही माहिती पूर्ण वाचल्यावर कदाचित तुम्हाला याचे महत्त्व कळेल आणि तुम्ही त्याचा वापर कमी कराल. आपला कान तीन भागाने बनलेला आहे. तिघे एकत्र मिळून काम करतात जे ध्वनी लहरी प्रक्रिया करतात. हे तीन पार्ट म्हणजे आउटर, इनर आणि मिडल इयर होय. इनर इयर मध्ये छोटे छोटे हेअर सेल असतात.

हे वाचा:   डायबिटीज असणाऱ्या पेशंटसाठी वरदान आहे असाल लसूण, फक्त करावे लागेल असे सेवन.!

हे सेल आपल्या मेंदूला ध्वनि च्या रूपात संदेश देतात. तेव्हा कोणताही ध्वनी आपल्या कानात शिरतो तेंव्हा तो इयर ड्रम मध्ये लहरी निर्माण करतो. या लहरी मिडल इयर पासून इनर इयर पर्यंत पास होत जातात. इनर इयर हा एक प्रकारचा लिक्विड चेंबर आहे. ज्यात छोटे केस असतात. त्यातूनच हा ध्वनींच्या लहरी आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवला जातात आणि त्याच मदतीने आपण ऐकू शकतो. ही आहे कानाने ऐकण्याची पद्धत.

परंतु ज्यावेळी आपण एखाद्या मोठ्या आवाजामध्ये काही ऐकतो त्यावेळी ध्वनी लहरींची फ्रिक्वेन्सी वाढते. आणि इनर इयर मध्ये असलेले केसं तेजीने हलू लागतात. जर तुम्ही सलग मोठ्या आवाजात ऐकत असाल तर हे हेयर सेल damage होतात ज्याचा परिणाम सलग तुमच्या श्रवणशक्ती वर होतो. इतकेच काय तर तुम्हाला बहिरेपणा येऊ शकतो. 70DVA हे एक ध्वनी लहरी मोजण्याचे मापक आहे.

याच मर्यादेपर्यंत तुम्ही एकावे. यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेले ध्वनी तुम्ही ऐकले तर तुमच्या कानाला इजा पोहोचू शकते. हेडफोन कानामध्ये घातल्याने आणखी एक तोटा होतो तो म्हणजे कानामध्ये हवा पोहोचू शकत नाही. त्यामुळे एअर कॅनल सादळतो. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस चा धोका होतो. ज्यामुळे कानात इन्फेक्शन होते. साठ बाय साठ चा नियम जर तुम्ही पाळत असाल तर तुमचा कान सुरक्षित आहे असे समजावे.

हे वाचा:   उन्हाळ्यात भूक न लागणे.! जेवण न पचणे.! सर्व समस्या या एका उपायाने गायब होतील.!

म्हणजेच जास्तीत जास्त आवाज आहे त्याचा अर्धा किंवा 0.1% जास्त आवाज तुम्हाला ऐकताना करायचा आहे. शिवाय साठ मिनिटांनी कानातून हेडफोन काढून काला ना आराम दिला तर हा नियम अगदी नीट काम करेल. लक्षात ठेवा 60 टक्के आवाजात ऐका आणि 60 मिनिटानंतर सुमारे पंधरा मिनिटे कानाला आराम द्या. वर सांगितल्याप्रमाणेच हेडफोन वापरा, शक्य असेल तिकडे स्पीकरने ऐका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.