हातापायांना येत असतील मुंग्या तर अशावेळी करावे लागते हे एक साधे सोपे काम.! त्यामागे असते हे मुख्य आणि प्रमुख कारण.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो, आपल्याला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत असते. साधारण हात, पाय किंवा खांद्याला अधिक वेळा मुंग्या येतात. त्याचं कारण झोपताना बसताना किंवा उभे राहताना शरीराच्या याच भागावर सर्वात जास्त ताण येतो. बऱ्याच वेळ पाय दुमडून बसल्याने किंवा एका स्थितीमध्ये जास्त वेळ बसल्याने, हाता पायाच्या शिरेवर दाब येतो. आणि त्या ठिकाणी मुंग्या येतात. हा त्रास आपल्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी अनुभवला असेल.

हाता पायाला मुंग्या येणे ही अगदी सर्वसाधारण बाब असली तरीही वारंवार हा त्रास होत असल्यास त्यावर योग्य उपचार करणे हे महत्त्वाचे आहे. अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास शरीरातील काही भागांचा रक्तप्रवाह थांबल्यामुळे शरीराच्या त्या भागाला मुंग्या येतात. आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत मुंग्या येण्याची काही कारणे आणि त्याचे सोपे घरगुती उपाय.

वारंवार हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे : प्रामुख्याने एकाच स्थितीमध्ये सलग खूप वेळ बसल्याने हा त्रास होऊ शकतो. थायरॉइडचा त्रास असलेल्यांना देखील हा त्रास होऊ शकतो. शरीरामध्ये विटामिन B12 ची कमतरता असल्यास देखील हातापायांना मुंग्या येतात. त्यामुळे वारंवार थकल्यासारखे वाटणे सतत कंटाळा येणे अशी लक्षणे दिसू लागतात. कॉम्प्युटर वर मोबाइलवर सतत टायपिंग केल्यामुळे देखील मनगटाच्या नसा आकुंचित झाल्याने हाताला मुंग्या येऊ शकतात.

हे वाचा:   काळेभोर केस हवे असतील तर बाहेरचे शाम्पू आजच फेकून द्या आणि घरीच बनवा असा शाम्पू.! केस वाढतच जातील.!

सतत मोबाईल हाताळल्याने देखील हा त्रास उद्भवतो. याला कार्पेट सिंड्रॉम असेही म्हणतात. मानेची नस आखडले गेल्यावरती मानेपासून कमरेपर्यंत दुखून हाताला मुंग्या येतात. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे देखील मानेची नस आखडली जाते. रक्तात असलेले साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते. त्यामुळे हातापायाला मुंग्या येतात. मुंग्या येण्या सोबत जर तुम्हाला सतत तहान लागत असेल किंवा सतत भूक लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

हातापायांना मुंग्या येऊ नयेत किंवा जर मुंग्या आल्या असतील तर कशी काळजी घ्यावी? लसुन आणि सुंठ : तुम्हाला जर नेहमी हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास होत असेल तर सुंठ पावडर आणि लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. त्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल कारण या पदार्थांच्या सेवनाने रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

पिंपळाचे पाने : पिंपळाचे झाड फारच गुणकारी मानले जाते. या वनस्पतीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे एंटीऑक्सीडेंट आणि मिनरल असतात. पिंपळाच्या पानांवर मोहरीचे तेल लावून ती पाने गरम करून मुंग्या येणाऱ्या जागेवरती लावू शकता.

तूप : तूप सुद्धा मुंग्या येणे यावर गुणकारी रित्या काम करते. रात्री झोपताना तळपायाला तुपाने हलक्या हाताने मालिश केली असता मुंग्या येण्याच्या समस्या मध्ये तुम्हाला आराम मिळतो. योग्य सकस आहार घ्या : रोजच्या आहारात विटामिन बी आणि प्रथिनांचा समावेश नक्कीच असावा. दूध, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, मासे यामध्ये विटामिन B12 चे प्रमाण भरपूर असते.

हे वाचा:   एकदा उपाय केल्यावर चेहऱ्यावर मरेपर्यंत केस उगणार नाही, छोटासा उपाय देईल मोठा फायदा.!

तसेच आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळ भाज्या, मोड आलेली कडधान्य व विविध फळे यांचा समावेश नक्कीच असावा. खोबरेल तेल : मुंग्या आलेल्या जागेवर ती खोबरेल तेलाने हलक्या हाताने मसाज करावा. असं केल्याने त्या जागेवरील रक्तप्रवाह सुधारून हा त्रास कमी होतो. गरम पाण्याचा शेक घेणे : गरम पाण्याने तो भाग शेकल्याने देखील त्या जागेवरील रक्तप्रवाह वाढून त्या ठिकाणी मुंग्या येण्याची समस्या दूर होते.

दालचिनी : कप भर पाण्यामध्ये एक चमचा दालचिनी पावडर घेऊन ते मिश्रण प्यावे. दालचिनीमध्ये पोटाशियम व इतर पोषक तत्वे भरपूर असतात त्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. वारंवार हाता पायाला मुंग्या येत असतील आणि घरगुती उपाय करुन देखील फरक पडत नसेल तर तुम्ही तज्ञांचा/ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण दिसायला वाटत नसला तरीही हा कठीण आजार होय.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.