घसा खवखवत असेल किंवा सुजला असेल तर यासाठी करायला हवे हे एक काम.! घरच्या घरी पाच मिनिटे करा हे एक काम, घसा होईल एकदम ताजा तवाना.!

आरोग्य

बोलण्यासाठी अथवा खाल्लेले अन्न गिळण्यासाठी आपण आपल्या घश्याचा वापर करतो. आपला आवाज हा आपल्या घश्यातूनच बाहेर येतो. परंतू अनेक वेळा आपला घसा दुखतो. अन्न गिळताना तसेच काही बोलताना आपल्याला त्रास जाणवतो. गायक व वक्ते यांचे तर अस्त्रच गळा असतो त्यामुळे घश्याचा जास्त वापर करुन देखील काही समस्या उद्भवू लागतात व आपल्याला या संबंधीत अनेक तक्रारी जाणवू लागतात.

मित्रांनो आज आम्ही आमच्या या सदर लेखात तुम्हाला आपल्या घश्याच्या चांगल्या आरोग्याच्या संबंधीत काही माहिती देणार आहोत तर हा आमचा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा. सर्व प्रथम जाणून घेऊया आपल्या घश्या संबंधीत या समस्या का निर्माण होतात. सध्याच्या या मॉर्डन जीवनशैलीमुळे माणसाला स्वतः साठी मुळीच वेळ नसतो. त्याचा आपल्या आहाराकडे देखील लक्ष्य नसतो.

अश्या वेली जंक फूड व बाहेरचे त्वरित तयार होणारे तेलकट तिखट फास्ट फूड खाणे आता वाढले आहे आणि याच्या नियमित सेवनाने आपल्या घश्याला त्रास होतो. त्याच बरोबर सर्दी, ताप अथवा खोकला झाल्यास आपला गळा खराब होवू शकतो. शरीराचे तापमान जर गरजे पेक्षा वाढले अथवा कमी झाले तर याचा इफेक्ट त्वरित तुमच्या घश्यावर होतो व गळा दुखणे व आवज बसणे अश्या समस्या निर्माण होतात.

हे वाचा:   पंधरा दिवसातून एकदा किडनीची साफसफाई करणे आवश्यक आहे, अशी करायला हवी किडनीची साफसफाई.!

जोर जोरात बोलणे अथवा दिवसभर बोलण्याचे काम असल्यास जसे शिक्षकी पेशा अश्या वेळी देखील आराम न मिळाल्याने घश्या संबंधीत तक्रारी होवू शकतात. आता पाहूया ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करु शकता. गळ्याच्या निगडीत कोणती ही समस्या उद्भवताना दिसल्यास सर्व प्रथम आपल्या आहारात बदल करा. अश्या वेळी फक्त हलके अन्न ग्रहण करा.

चिकन व मासे त्याच बरोबर दुधा पासून तयार झालेले सर्व पदार्थ टाळा. पापड, लोणचे सोबतच तळलेले पदार्थ म्हणजेच भजी, वडापाव असे तेलकट पदार्थ देखील आहारात वर्ज करा. घश्याच्या तक्रारीत गरम पाणी पीणे योग्य आहे परंतू जेवण मात्र थंड करुन घ्या. शक्यतो डाळ व भात खाणेच योग्य त्याच सोबत दही खावू शकत. दह्यात असणारे चांगले बॅक्टेरीया गळ्या भोवतालच्या वाईट बॅक्टेरीयाला संपवतो.

या सोबतच एक घरगुती व पिढ्या न पिढ्या चालत आलेला उपाय म्हणजे मीठाच्या पाण्याच्या गुर्ळ्या करणे. घसा बसल्यावर अगदी सुरवाती पासूनच हा एक उत्तम व फायदेशीर उपाय मानला जातो. कोमट पाण्यात दोन चमचे मीठ टाका व सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा मीठाच्या पाण्याच्या गुर्ळ्या केल्यास घसा साफ होईल व तुम्ही या समस्येतून मुक्त होवून जाल.

हे वाचा:   फारच कमी लोकांकडे असेल ही अशी वनस्पती, आरोग्यासाठी आहे एक प्रकारचे वरदानच.!

त्याच बरोबर अनेक वेळा घश्याला सूज येते व घसा खवखवतो अश्या वेळी तुम्ही एका भांड्यात एक ते दोन तांबे कोमट पाणी घ्या त्यात एक चमचा हळद टाका. हळद सुद्धा घश्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरवातीपासूनच एक रामबाण उपाय मानला जातो. त्या नंतर यात दोन चमचे त्रिफळा चूर्ण. हे चूर्ण तुम्हाला कोणत्या ही मेडिकल स्टोरमध्ये आरामात मिळेल व एक चमचा मीठ टाका.

आता या पाण्याच्या सकाळ व संध्याकाळ असे दोन दिवस गुर्ळ्या करा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. हळद व मध याचे चाटण बनवून सकाळी च रात्री झोपण्यापूर्वी खाणे हा देखील घश्याच्या समस्या दूर करण्यासाठी एक घरगुती रामबाण उपाय आहे. हळद व मध हे दोन्ही नैसर्गिक घटक आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला घश्याच्या संबंधीत असणार्या सर्व तक्रारी त्वरित दूर होतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.