खोबऱ्याची एक वाटी तुमच्या गुडघ्याच्या वाटीसाठी खूप अनमोल ठरेल.! असा उपाय डॉक्टर सुद्धा सांगणार नाही.!

आरोग्य

आपले शरीर एक यंत्र आहे. जास्त वेळ काम केल्याने अथवा सतत आराम न करता काम केल्यास आपले शरीराचे अवयव ठिसूळ होतात. सांध्यां मधून कटकट आवाज येणे व दुखणे अथवा थोडेसे जरी चालले तरी पायांमध्ये वेदना होणे अश्या समस्या आज काल आपल्या परिसरात सामान्य होत चालल्या आहेत आणि आज काल आपण आपल्या आजुबाजूला अनेक लोक विविध प्रकारच्या दुखण्याने ग्रस्त असलेले पाहतो.

रोज-रोज दर्द शमाक गोळ्या घेऊन दिवस काढणारे लोक सुद्धा हा समाजात खूप आहेत. शरीरातील काही घटक कमी झाल्यास अवयवाची आतल्या आत झिज होण्यास सुरवात होते व काही कालावधीने दुखणे सुरु होते. या गोळ्या व औषधे आपल्या शरीराला इजा पोहचवू शकतात. म्हणून शक्यतो या गोळ्यांचा वापर टाळावा. तुम्ही देखील अश्या समस्येने त्रासलेले आहात का ..? आणि यावर एक कायम स्वरूपी तोडगा शोधत आहात का ..?

तर हा लेख अगदी तुमच्यासाठी आहे. अश्या या जुनाट दुखण्यावर आम्ही आज आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहे. हा उपाय करताच तुम्हाला होणारे सर्व दुखणी दूर होवून जातील. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे त्यामुळे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. सोबतच हा एक नैसर्गिक रामबाण उपाय आहे. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे घरातील सामग्रीचा वापर करून हा तुम्ही तुमच्या घरच्या घरी देखील तयार करू शकता.

हे वाचा:   चांदीचे काळे पडलेले दागिने मिनिटभरात होतील पांढरेशुभ्र अगदी नवे घेतले तसे.!

हा उपाय हा साधा सरळ व सोपा उपाय आहे त्यामुळे यासाठी तुम्हाला जास्त काही पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. हा रामबाण उपाय अगदी सर्व सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते कारण याचा प्रत्येक भाग हा वापरला जावू शकतो. नारळाचे फळ देखील खाण्यास मधुर असते. बाहेरून कठोर मात्र आत गोड पाणी व चविष्ट खोबरे आपणास मिळते.

खोबऱ्याच्या सेवनाने शरीरातील सर्व थकवा दूर होतो. अनेक खेळाडू व व्यायाम करणारे लोक त्यांची तब्येत चांगली बनवण्यासाठी नारळाचे पाणी आवर्जून पितात. या सोबतच खाद्य पदार्थां मध्ये देखील नारळाचे खोबरे टाकले जाते. याच सुक्या नारळाच्या खोबऱ्याचा वापर आपल्याला आजचा हा उपाय तयार करण्यासाठी करायचा आहे. सुके खोबरे आपण मुख्यतः मसाल्यांमध्ये वापरतो. गोडा मसाला तयार करण्यासाठी या सुक्या खोबऱ्याचा वापर आपल्या भारतात केला जातो.

हे वाचा:   रात्री झोपताना केसांना लावा सकाळी उठून बघाल तर आनंदाने नाचू लागाल.! केसांसाठी सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय.!

या उपायासाठी एका सुक्या खोबऱ्याच्या
वाटीला किसून घ्या. आता दुसरा घटक जो आपल्याला हा रामबाण उपाय तयार करण्यासाठी हवा असेल तो म्हणजे काळा गूळ. गूळ हा पदार्थ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. गूळ आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे. शरीराला नैसर्गिक ऊर्जा प्रदान करण्यात गूळ खाणे ही एक उत्तम सवय मानली जाते. शरीरातील थकवा अशक्तपणा शीण हा सर्व याच्या सेवनाने गायब होईल. या उपायासाठी गूळ बारीक करून घ्या.

आता किसलेले खोबरे व गूळ या दोन्ही घटकांना एकत्र एका भांड्यात मिक्स करून घ्या. रोज सकाळी उपाशी पोटी या मिश्रणाचे सेवन तुम्ही करा याने तुमच्या शरीरात असणारी दुखणी ही काही दिवसातच गायब होतील. शरीरात नवीन ऊर्जा प्रस्थापित होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.