नमस्कार मित्रांनो, आजकाल बाजारात अनेक गोष्टी साठी रासायनिक पदार्थांचा वापर करतात पण कोणतेही रासायनिक प्रसाधनं वापरता शरीरावरील नको असलेले केस आता तुम्ही हटवू शकता. तुमची त्वचा दिसायला कितीही छान असली तरीही चेहऱ्यावरील नको असलेले केसं तुमची सुंदरता खराब करतात. काही प्रमाणात चेहरादेखील काळा दिसतो. शरीरावर केस येणे ही सर्वसाधारण बाब आहे. बाजारात मिळणारे असंख्य उत्पादनं ज्यांनी आपण आपले नको असलेले केसं हटवण्याचा प्रयत्न करतो ते आपल्या त्वचेसाठी हानिकारक असते.
झोपण्यापूर्वी पंधरा मिनिट शरीरावरील नको असलेल्या केसांवरती लावा सकाळी केसं पूर्णपणे साफ होतील. दीर्घकाळासाठी जर तुम्ही आपल्या शरीरावरील नको असलेले केसांपासून सुटकारा मिळू इच्छिता तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. हा उपाय बनवण्यासाठी काय लागणार आहे? कसे बनवायचे? याबद्दल विस्तारित पणे माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा उपाय बनवण्यासाठी अत्यंत सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे बेकिंग सोडा..
लक्षात ठेवा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा आहे. एक चमचा बेकिंग सोडा वाटी मध्ये घ्या आणि यामध्ये वाटी भरेल इतके गरम पाणी घाला. छोटे-छोटे बबल्स वर जमा होतील. बेकिंग सोडा असे अनेक हेल्थ बेनिफिट आहेत. नको असलेले केस घालवण्यासाठी बेकिंग सोडा याचा उत्तम फायदा होतो शिवाय त्वचेवर कोणत्याही प्रकारचे काळे डाग राहत नाहीत.
हे मिश्रण थंड होण्यासाठी तसेच ठेवा. तोपर्यंत ही दुसरी गोष्ट बनवायला घ्या. या साठी आपल्यला हळद लागणार आहे तुम्हाला आंबेहळद उपलब्ध झाल्यास उत्तमच.. ⅓ चमचा हळद वाटीमध्ये घ्या. त्यात अर्धा चमचा व्हॅसलीन जेली घाला. यात दोन चमचे कच्च निरसं दूध घाला. यामुळे केस काढल्यानंतर त्वचा लाल होते किंवा येते असे काहीही होणार नाही. तुमची त्वचा मॉइस्चराइज होईल. हे मिश्रण मिक्स करा.
व्हॅसलीन नीट मिक्स होऊन एक छान घट्ट पेस्ट बनवा. कसे वापरावे. स्टेप 1: बेकिंग सोडा व पाणी थंड झालेले मिश्रणाची वाटी घ्या. हे मिश्रण कापसाच्या मदतीने नको असलेले केसांवरती लावा. शरीरातील कोणत्याही भागावर तुम्ही हा प्रयोग करा परंतु हे पाणी चेहऱ्यावर लावू नका. तेल लावल्यानंतर तुमच्या केसांची मुळं कमजोर होऊन हळूहळू नको असलेले केस गळून जातील. ते लावल्यानंतर कोणत्या पेपर किंवा पॉलिथिन बॅगने कव्हर करा. ते वीस मिनिटं तसेच ठेवा नंतर पाण्याने साफ करा.
स्टेप 2: वरील प्रमाणेच कापसाच्या मदतीने हे तुम्ही लावू शकता. स्टेप 2 तुम्ही चेहऱ्यावरही लावू शकता. हे सुकू द्या. सुकल्यानंतर केसांच्या मुलांच्या उलट्या दिशेने हळूहळू चोळूनहे काढा. त्यामुळे हळूहळू केस निघत असे दिसेल. आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तीन ते चार वेळेस हा प्रयोग केल्याने तुम्हाला 60-70% परिणाम बघायला मिळेल. सलग उपाय केल्याने असलेले केसं जाऊन त्वचा साफ होऊन चमकदार होईल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.