मित्रांनो आपल्या घरात रोजच्या अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपणच निरुपयोगी समजून टाकून देतो. मात्र अश्या या टाकावू वस्तूं पासून आपण टिकवू कलाकृती तयार करू शकतो. आजचा हा लेख आमचा याच मुद्यावर आधारित आहे. या लेखात आपण अनेक अश्या रंजक कलाकृती पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या घरच्या घरीच तयार करू शकतो.
या साठी ना मेहनत लागते ना जास्त वेळ काहीच मिनिटात तयार करू शकता. घरच्या वापरातील वस्तू ज्या आपण रोज वापरुन टाकून देतो. त्याच वस्तूं पासून आपण घरत सुशोभीकरण करण्याच्या गोष्टी देखील तयार करू शकतो. चला आता वेळ नंतर दवडता पाहूया नक्की कोणत्या गोष्टी आपण तयार करू शकतो. आपल्या सर्वांना फळे खूप आवडतात. फळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा देतात.
अगदी लहानां पासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फळे खातात. मात्र काही फळे जसेच्या की बोर अथवा द्राक्षे आपण जाळीच्या पिशवीतून आणतो. फळे खराब होवू नयेत किंवा त्यात हवा खेळती रहावी म्हणून ही जाळीच्या पिशवीचा वापर फळ विक्रेते जास्त करतात. तुम्ही देखील या पिशवीतून फळे आणत असाल. नंतर निरुपयोगी समजून पिशवी टाकून देत असाल. मात्र या पिशवीचा वापर तुम्ही भांडी घालण्यासाठी करू शकता.
ज्या भांड्याला तेल लागले आहे व तेल निघत नसेल तर अश्या वेळी या जाळीच्या पिशवीचे हे भांडे घासा काही मिनिटांत हे भांडे चांगले साफ होईल. त्याच बरोबर तुटलेला साबण देखील आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. याचा देखील आपण पुन्हा वापर करून पैश्याची बचत करू शकतो. ते कसे पहा, जुने मोजे घरात असतीलच आता हा साबण हा मोजे मध्ये टाका आणि घरातील बेसिन अथवा लादी साफ करण्यासाठी वापरू शकता. तसेच मटका कुल्फी तुम्ही खाल्लीच असेल.
उन्हाळ्याच्या दिवसात हे आपल्या जीवाला थंडावा देतात. खावून झाल्यानंतर आपण ही मटकी टाकून देतो. परंतू या छोट्या छोट्या मटक्यात तुम्ही पुन्हा कुल्फी बनवू शकता अथवा यात दही नाही तर दुधाचे पदार्थ ठेवू शकता. नारळाच्या करवंटी काम झाल्यावर आपण टाकून देतो. मात्र या करवंटीच्या मदतीने आपण अनेक सुशोभीकरनाच्या गोष्टी तयार करू शकता. सोबतच यातून तुम्ही इंधन देखील तयार करू शकता. आपण बाजारातून थंड पेय आणतो. या सोबतच आपण प्लास्टिकच्या बाटल्या देखील ठेवतो.
जुन्या बाटल्यांचा देखील काही फायदा नाही असे समजून आपण त्यांना टाकून देतो. मात्र या बाटल्याना आपण मधून कापा व या बाटल्यां मध्ये झाडे लावू शकतो. म्हणजेच मनी प्लांट अथवा छोट्या छोट्या वेली आपण या बाटल्यां मध्ये लावून घरात बाग तयार करू शकता. याच्या सोबतच तुम्ही अनेक वेळा गॅस खालून साफ करायला थोडी कसरत करावी लागते. गॅसच्या पायाची उंची कमी असल्या कारणाने आपल्याला ही अशी कसरत करावी लागते.
मात्र या बाटल्या तुम्ही तोंडाच्या बाजूस कापा. आता जी कापलेली तोंडाची बाजू आहे ती उलटी गॅसच्या पाया खाली टाका. अश्या चार ही बाजूस हा कापलेल्या बाटल्यांची तोंडे ठेवा अश्याने गॅसची उंची वाढेल व तुम्हाला त्याची साफ सफाई करणे अगदी सोपे जाईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.